रोहित वेमुलाच्या शहीद दिनी आंबेडकरी तरुणांनी नेतृत्वाचा निर्धार करणे गरजेचं

ॲड विशाल शाम वाघमारे

डॉ. रोहित वेमुला शहादत दिन १७ जानेवारी

संस्थात्मक हत्या होऊनही न्यायाला मुकलेल्या डॉ. रोहित वेमुला यांना शहादत दिनी विनम्र अभिवादन.

आम्हीच तुझे मारेकरी आहोत होय आम्हीच. आम्हीच संविधान लागू होऊन 7 दशके झाली तरी संवैधानिक व्यवस्थेची अंमलबजावणी करू शकलो नाही. इथला जातीवाद, बामनवाद, विषमतावाद, सनातनवाद इथल्या समतेच्या बुरुजाला सुरुंग लावत आहेत. अन त्यात ते यशस्वी सुध्दा झालेत अन आम्ही आजही लाचार.

आदरणीय डॉ. रोहित वेमुला आम्ही तुझे गुन्हेगार आहोत. तुझी हत्या झाली अन इथल्या चळवळीने कोण कुठला तो भूमिहार बामन कन्हैया ला विद्यार्थी चळवळींचा शिलेदार बनवले. तू बोलत होतास ‘No Left No Right Only Ambedkarite’ पण तरीही आम्ही कन्हैया, जिग्नेश यांसारख्या आंबेडकरी विचारांचा मागमूस ही नसलेल्या बिनडोक तरूणांना हिरो बनवले. अगदी आमच्या आंबेडकरी नेत्यांनी ही तुझ्या शहादत नंतर यांना मोठे मंच दिले. आम्ही आंबेडकरी विद्यार्थी ओरडून सांगत होतो कन्हैया आणि इतर बाजारबूनगे हे कम्युनिस्ट मुंगळे आहेत. आपल्या कोणत्याही आंबेडकरी विद्यार्थ्यांसमोर उभे राहून ५ मिनिट डिबेट करण्याची यांची लायकी नाही. पण नुसतं भाषणबाजी मुळे यांनाच तुझा वारस ठरवले. मी तर सरळ आव्हान केले होते की कन्हैया ये समोर अन होऊन जाऊदे डिबेट कोणत्याही विषयावर पण मी एक साधारण विद्यार्थी अन तो एक व्यवस्थेने पद्धतशीरपणे तरुणांवर लादलेले तकलादू, अन बामणी विद्यार्थी नेतृत्व. अन तेही कम्युनिस्ट चळवळीच्या नावाने प्रसिद्ध केलेलं. असो मुद्यावर येऊया. डॉ. रोहित वेमुला परिस्थिती शी लढत असताना एकटेच होते. आज त्यांच्याच नावाने पोळी भाजणारे अनेक आहेत.

आजही तुझ्यासारखे अनेक रोहित शहीद होत आहेत. संस्थानांचे, हुकूमशाही चे बळी पडत आहेत पण इथे कोणाला त्याची वाणवा नाही. आंबेडकरी, समतावादी, मानवतावादी विद्यार्थी इथल्या नेत्यांना का नकोत? त्यांना कधी स्कोप मिळालाच नाही. त्यांना मंच कधी मिळणार?

तसेही कोण्या नेत्याचे मौताज नाहीत आंबेडकरी तरुण विद्यार्थी ते स्वता स्वतःचा मंच बनवतील, संघटित नेतृत्व पद्धत अवलंबून चळवळ यशस्वी करतील. पण त्यात खो घालणारे अनेक आहेत. त्यांचा बंदोबस्त आंबेडकरी, समतावादी, संविधानाचे पाईक असणाऱ्या नेत्यांनी करायला हवा. लोकशाही टिकवण्यासाठी एवढे तरी कराल हीच काय ती अपेक्षा तुमच्याकडून. या भारतात विद्यार्थी चळवळी कम्युनिस्ट लाल मुंगळ्यांनी व्यापल्यात त्यांना जर वेळीच नाही रोखले तर देशातून लोकशाही हद्दपार होईल लवकरच.

डॉ. बाबासाहेब म्हणत होते विद्यापीठे ही उत्तम नागरिक बनवण्याचा कारखाना आहेत पण इथे शैक्षणिक संस्थानेच दलालांची आहेत तिथे काय तो लोकशाही च संवर्धन करणारा विद्यार्थी घडणार. इथे बामनवाद, हुकूमशाही, सनातनी धर्म, भांडवलशाही, जातीवाद, प्रांतवाद, भाषावाद कुटून कुटून भरलाय तिथे विद्यार्थी लोकशाही च व्याकरण शिकू शकेल काय?

आज सर्व भारतीय नागरिक, तरुण, विद्यार्थी ज्यांना वाटते की या भारतात लोकशाही टिकवणे खूप महत्त्वाचे आहे त्या सर्वांनी मिळून लोकशाही वाचवण्यासाठी आणि या लोकशाही विरुद्ध शक्तींना नेस्तनाबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न करायला हवेत.

उच्च शिक्षित तरुणांनी विशेषता आंबेडकरी तरुणांनी याकामी पुढाकार घ्यायला हवा. तरच येणाऱ्या पिढ्या लोकशाहीयुक्त उत्तम जीवन जगतील.

इथे दोन संस्कृती नांदत आहेत एक बामणी तर दुसरी मानवतावादी, अन डॉ. रोहित वेमुला याच बामणी संस्कृतीचा बळी ठरला, शहीद झाला. आपण सर्व यासाठी जबाबदार आहोत. प्रत्येकाने ही बामणी संस्कृती नेस्तनाबूत करण्यासाठी पुढाकार घेऊन संघटित प्रयत्न करायला हवेत.

जो विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन, आधुनिक विज्ञान क्षेत्रात संशोधन करून मोठा वैज्ञानिक होण्याच्या मार्गावर असतो त्याला इथे जात, धर्म आणि व्यवस्थेच्या नावावर मारले जाते, बळी दिला जातो. ही अशी गांडू व्यवस्था या लोकशाही देशात का ठाण मांडून बसले, यावर पाबंदी कधी येणार? ही अशी विषमतावादी व्यवस्था अजून किती विद्यार्थ्यांचे बळी घेणार?

संस्थानातील जातीवाद, सनातनी वृत्ती कधी संपतील असे एक ना अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. या अशा जातीवादी व्यवस्थेवर थुंकले तरी त्या थुंकीचा अपमान होईल एवढी अघोरी आणि भयाण व्यवस्था आहे ही. या व्यवस्थेला खिंडार पाडावेच लागेल. संवैधानिक मार्गाने असंवैधानिक शक्तींचा बिमोड करायलाच हवा.

सध्या भारतात आणीबाणी सुरूच आहे. लोकशाही वेशीवर टांगत आहेत. संघ, भाजपा, अभाविप सारख्या जातीवादी, सनातन मुजोर संघटना देश हुकूमशाही कडे, बेबंदशाही कडे घेऊन चालल्या आहेत. यांना जर रोखायचे असेल तर तुम्हाला संविधानाची कास धरावीच लागेल पण तेवढ्याने भागणार नाही. एकजूट राहून संघटितपणे प्रत्येक आघाड्यांवर यांना चारी मुंड्या चित करायला हवे. आर्थिक, सामाजिक क्षेत्र तर दूर राहिले पण शिक्षण क्षेत्रातील या बामनवाद्यांची एकाधिकारशाही कधी संपणार, आपण त्यासाठी संघटित यशस्वी प्रयत्न कधी करणार. डॉ. रोहित वेमुला ला तर आपण अजूनही न्याय नाही देऊ शकलो. आजही कित्येक विद्यार्थी संस्थानांच्या मुजोर कारभाराचे, जातिवादाचे बळी पडत आहेत. डॉ. रोहित वेमुला यांनी आवाज उठवला तर त्यांचा संस्थानात्मक खून, हत्या करण्यात आली. देशाचे संविधान धोक्यात आहे, इथवरच नाही तर आता संघाच्या सनातनी अजेंड्यामुळे मानवता सुद्धा धोक्यात आहे. प्रचंड कोलाहल आहे.

आंबेडकरी विद्यार्थी एकसंघ व्हायला हवा, सुशिक्षित तरुणांनी आता पुढाकार घ्यायला हवा. डॉ. बाबासाहेब यांना वाचून, समजून त्याच मार्गाने मार्गक्रमण करायला हवे, तरच या देशात विद्यार्थी टिकेल, लोकशाही टिकेल. इथे कम्युनिस्ट बांडगूळ पण आपल्यात शिरलेत त्यांचा बंदोबस्त लोकशाही मार्गाने करायलाच हवा. हे डावे उजवे खरे भाडखावू आहेत. शत्रू बाजूला राहतो अन हेच आपल्यात शिरून आपल्या चळवळी पोखरत आहेत. या अस्तणीच्या सापाला ओळखा मित्रांनो. यांना वेळीच बाजूला सारा. देश अराजकतेकडे चालला आहे. या देशाला तारणारा असा एकच वर्ग आहे तो म्हणजे येथील विद्यार्थी वर्ग. या वर्गाने आता तन मन धनाने, आंबेडकरी विचारधारा आत्मसात करून त्यानुसार कृतिकार्यक्रम करायला हवेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक असे विद्यार्थी आहेत जे आजही विश्वातील सर्व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, तारणहार आहेत. आज जर डॉ. रोहित यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपण विद्यार्थीदशेतच गगनभरारी घ्यायला हवी. विद्यार्थीदशेतच आपली लायकी वाढवायला हवी जे प्रकर्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वर्गाला उद्देशून आवाहन करतात.


विद्यार्थी संभ्रमात आहेत. शिक्षणाचे नुसते बाजारीकरण झालेय, शिक्षण क्षेत्रातील खाजगीकरणाने शिक्षणातील गुणवत्ता तर संपवलीच आहे पण लायक विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान सुद्धा केले आहे अन हे अजूनही चालूच आहे. CAA NRC विरोधी आंदोलनात विद्यार्थी मोठया संख्येने सामील झाले पण तिथे पण डाव्या, मार्क्सवादी संघटना अन त्यांच्या म्होरक्या, paid विद्यार्थी यांनी स्वताला आंबेडकरी विद्यार्थी म्हणून लोकांना गंडवले.  अरे कम्युनिस्ट बांडगुळानो मार्क्सवाद तर युरोप नेही नाकारला, रशिया, चीन मध्ये पण नाकारला जातोय अन तुमचं घोंगड कुठे भिजतंय? आंबेडकरी विद्यार्थ्यांनी कम्युनिस्ट, बामनवादी शक्तींविरोधात खुले आंदोलन छेडणे क्रमप्राप्त आहे. मोक्याच्या जागा मिळवाव्याच लागतील आपल्याला अन त्याचसोबत मैदानात ग्राऊंड लेवल वर सुद्धा त्याच तोडीचे आंदोलन उभे करावे लागेल. जातीचा बिमोड करण्यासाठी विद्यार्थी वर्गच पुढे आला पाहिजे कारण हेच उद्या संविधानाचे रक्षणकर्ते असणार आहेत. आपल्याला राजकीय प्राबल्य मिळवावेच लागेल. प्रशासकीय यंत्रणेमध्ये मोक्याच्या जागेवर आपले मानवतावादी लोक असायला हवेत. EVM सारख्या आधुनिक शस्त्रांनी लोकशाहीचा खून केलाय. या EVM ला संपविण्यासाठी Result Oriented आंदोलन उभे करावे लागेल. डॉ. रोहित यांना आंबेडकरी नेते म्हणवून घेणाऱ्यांनी सुद्धा न्यायापासून दूरच ठेवले. आपल्याला या न्यायासाठी उच्च शिक्षित तरुण संसदेत, कार्यपालिका मध्ये पाठवावेच लागतील. त्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखून त्यावर अंमल करायलाच हवा. अन हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इथला विद्यार्थी हा देशोधडीला लागलेलाच दिसेल. तरुणांना संधी देऊन त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या द्याव्या लागतील. तरूणांनी सुद्धा स्वताला सिद्ध करावे लागेल. सत्ता असल्याशिवाय न्याय मिळणार नाही. न्यायासाठी सत्ता असणे हाच जालीम उपाय आहे. सत्ता यायला उशीर लागेल पण निदान आपले प्रतिनिधी तरी संसदेत पाठवायला हवेत. आंबेडकरी जनतेने याकामी स्वताला वाहून घ्यायला हवेच त्याशिवाय गत्यंतर नाही.


आज डॉ. रोहित वेमुला यांच्या शहादत दिनी त्यांनी जी परिस्थिती सहन केली, जो अन्याय, अत्याचार सहन केला, व्यवस्थेने त्यांची हत्या घडवली ही अशी व्यवस्था पूर्णता बदलून चालणार नाही तर त्याजागी समानतेची संवैधानिक शिक्षण व्यवस्था जी संविधानात पुरस्कृत आहे ती साकारायला हवी. अन हीच डॉ. रोहित वेमुला यांना खरी आदरांजली असेल.

डॉ. रोहित वेमुला शहादत दिनी त्यांना कोणत्या तोंडाने अभिवादन तरी करायचे हाही प्रश्न भेडसावत आहे. तरीही आपण तरुणांनी पुढाकार घेऊन समतेचा हा रथ पुढेच न्यायला कंबर कसली पाहिजे. विषमतावादी शक्ती अन विषमताच संपवली पाहिजे. यासाठी डॉ. रोहित वेमुला यांच्या शहादत दिनी हे कार्य करण्याची प्रतिज्ञा करूया आणि कामाला लागूया.

डॉ. रोहित वेमुला यांना त्यांच्या शहादत दिनी विनम्र अभिवादन

Rising from Shadows to Stars

5 years of Martyrdom

#RohitVemulaShahadatDin

ॲड विशाल शाम वाघमारे

लेखक आंबेडकरी चळवळीतील वैचारिक विद्यार्थी, मुंबई उच्च न्यायालयात वकील आणि Constitutional Law विषयात मुंबई विद्यापीठात पदव्युत्तर पदवी चे शिक्षण घेत आहेत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*