रोहित वेमुला प्रकरण आणि दलित संकल्पनेच बाजारीकरण (commodification)

गौरव सोमवंशी

मला जमायचे नाही, रोहित.
एका तेजाचा प्रकाशण्यापूर्वीच झालेला अंत
मी लपवणार नाही तुला शहिद घोषित करून
एका लाजिरवाण्या देशाची दुःखद बाजू नाही लपवणार
तुझ्या दुःखाचा जयजयघोष करून
तुला पाहून मला अजून काही वाटते तर ती आहे भीती,
की तुझ्यासारखा कोणी जर हा मार्ग पत्करायला भाग
पाडला जावू शकतो,
तर मग आम्हा इतरांनी काय करायचं?
तुला बघून अजून काही वाटते तर ती आहे जिद्द,
की जे झालं त्याची पुनरावृत्ती नाही होऊ द्यायची
एक मेलेला दलित प्रत्येकाला सोयीचा वाटतोच,
सगळे त्यास जवळ घेतात,
जिवंतपणी तू ज्यांचा विरोध केला अगदी ते सुद्धा आलेत
बेहती गंगा मध्ये हात धुतल्यावणी
चार अश्रू गाळून झाले मोकळे जबाबदारीपासून
हा प्रेमवर्षाव जिवंतपणी दाखवल्यास
बरेच रोहित टाळले जातील
हे मी तोंड खाली करून शिकलोच…

मेनस्ट्रीम (किंवा कुफिर म्हणतात तसे “मनू”स्ट्रीम) माध्यम, मग ते रिपब्लिक असो किंवा कोणी तथाकथित पुरोगामी, यांच्याकडून अपेक्षा ठेवणं किती चुकीचं आहे ते तुम्हाला रोहित वेमुलाच्या उदाहरणावरून सांगतो.

3 ऑगस्ट 2015 ला ASA (आंबेडकर स्टुडंट असोसिएशन) आणि अ.भा.वि.प. मध्ये एका डॉक्युमेंटरी चित्रित करण्यावरून बाचाबाची झाली, पण त्यामुळे निलंबन आणि बहिष्कार फक्त ASA च्या 5 दलित स्कॉलर वरच आलं.

तर या विषयावर 10 ऑगस्टला राउंड टेबल इंडियावर पाहिलं लेख आला. तेव्हा पासून ते रोहित वेमुलाच्या मृत्यू पर्यंत किमान 8 लेख ASA कडून पाठवण्यात आले (या पोस्टच्या शेवटी टाकतोय सगळे). या मध्ये त्यांनी त्यांना होणारा त्रास आणि अन्याय एकदम सविस्तर मांडलं आहे. पण तेव्हा त्याची काही “बातमी” बनली नाही.


17 जानेवारी 2016 पासून मात्र जसाजसा सामाजिक आक्रोश वाढत गेला तसेच ही मनूस्ट्रीम माध्यमे तितकी उड्या मारायला लागली.

विषय इथे संपत नाही. मृत दलित ही एक कमोडिटी (commodity) बनली आहे थेऱ्या बनवायला, फंडिंग मिळवायला, रिसर्च पेपर काढायला. तुम्ही काय बोलता ते जाऊ द्या बाजूला, तुमच्यावर आम्ही काय बोलू ते अधिक महत्वाचं असं यांचं धोरण.

सांगू कसं? त्यासाठी एक उदाहरण सांगतो, रोहितचच रोहितच्या फेसबुक प्रोफाईल वर जाऊन त्याचा एक डीपी बघा, एका मध्ये त्याने हातात ‘हेट्रेड इन द बेली’ हे पुस्तक ठेवलं आहे. ते पुस्तक हैदराबादवरून पब्लिश झालं होतं आणि सोशल मीडियावर त्याचा फोटो टाकणारा रोहित पहिलाच होता. आनंद अय्यंगार (तो एस आनंद म्हणून वावरतो, नवयान चा पब्लिशर) आणि अरुंधती रॉय यांच्या बाबासाहेबांवर केलेल्या अप्रोप्रियेशनच्या फालतू प्रयत्नांवर केलेली ती टीका होती, ज्यामध्ये पस्तीसच्यावर लेखकांनी आपली मते मांडली होती. या पुस्तकाचे छोटे-मोठे लाँच काही शहरात झाले, पण हैदराबाद मधेच नाही झाले कारण तसे करायचे काम रोहित ने स्वतःवर घेतले होते, पण नंतर निलंबनामुळे ते सध्या जमणार नाही हे त्याने जेम्स मायकल याला सांगितले.

तर जिवंतपणे जरी रोहितने त्या सवर्ण डाव्यांच्या कारस्थानावर टीका केली, पण त्याच्या मृत्यूनंतर लगेच या आनंद अय्यंगार ने ‘Outlook’ मासिकामध्ये “मी रोहित वेमुलाला कसे मारले” या शिर्षकाने एक लेख लिहून मस्त मोकळा झाला. जास्त भारावून जाऊ नका, लेखामध्ये स्वतःबद्दल किंवा रोहितच्या विचारांबद्दल काही नाही लिहिले, फक्त मी इतरांपेक्षा किती सरस पुरोगामी हे दाखवायची धडपड आहे बस (लिंक: https://www.outlookindia.com/magazine/story/how-i-killed-rohith-vemula/296478 )

तर यावरून थोडं ओळखून घ्या की तुम्हाला तुमचा मीडिया स्वतःच बनायचं आहे. जिवंतपणे विचारांशी एकनिष्ठ राहतांना ‘वरून’ काही मिळेल याची जास्त अपेक्षा पण ठेऊ नका.

17 जानेवारी 2016 पूर्वी आलेले 8 लेख:

Following is a list of articles published at RoundTableIndia before 17th of January, 2016, the date of Rohith’s death.

1) http://roundtableindia.co.in/index.php?option=com_content&view=article&id=8314:why-upper-caste-brahminists-fear-forward-thinking-of-dalits-2&catid=129:events-and-activism&Itemid=195 by PV Vijay Kumar 10th August, 2015 Documenting the attack on the screening of the documentary ‘Muzzaffarnagar baaki hain’

2) Condemn arbitrary suspension of 5 Dalits students in University of Hyderabad! http://roundtableindia.co.in/index.php?option=com_content&view=article&id=8351:condemn-arbitrary-suspension-of-5-dalits-students-in-university-of-hyderabad&catid=129:events-and-activism&Itemid=195 submitted by Ambedkar Student’s Association, ASA


3) Injustice In University of Hyderabad: Social Boycott of 5 Dalit Research Scholars http://roundtableindia.co.in/index.php?option=com_content&view=article&id=8419:injustice-and-social-boycott-against-5-dalit-research-scholars-at-university-of-hyderabad&catid=129:events-and-activism&Itemid=195 date: 20th December, 2015 submitted by: ASA, with Screenshots of the University’s order of social boycott

4) Social Boycott of Dalit Scholars: Locating caste in Modern context http://roundtableindia.co.in/index.php?option=com_content&view=article&id=8428:social-boycott-of-dalit-scholars-locating-caste-in-modern-context&catid=119&Itemid=132 submitted by: Agnes Amala date: 5th January, 2016

5) Suspension of 5 Dalit Scholars: The Brahminical Conspiracy of BJP Unravelled http://roundtableindia.co.in/index.php?option=com_content&view=article&id=8429:suspension-of-5-dalit-scholars-the-brahminical-conspiracy-of-bjp-unravelled&catid=119:feature&Itemid=132 by Joint Action Committee for social justice (UoH) date: 7th January, 2016 with screenshot of letter written to Smriti Irani by Bandaru Dattatray

6) Fact finding report: Violation of Constitutional Rights of 5 Dalit scholars By University of Hyderabad administration http://roundtableindia.co.in/index.php?option=com_content&view=article&id=8432:violation-of-constitutional-rights-of-5-dalit-scholars-by-university-of-hyderabad-administration-fact-finding-report&catid=119:feature&Itemid=132 by Jhansi Geddam, National Convener, Dalit Sthree Sakthi Date: 11th January, 2016

7) An article enlisting all previous articles published until 14th January, 2016 regarding ASA Social Boycott in UoH: The modern university as a caste enforcer http://roundtableindia.co.in/index.php?option=com_content&view=article&id=8433:the-system-of-graded-inequality-is-not-merely-notional-it-is-legal-and-penal&catid=129:events-and-activism&Itemid=195 date: 14th January, 2016

8. An appeal to the struggling masses by Joint Action Committee http://roundtableindia.co.in/index.php?option=com_content&view=article&id=8438:an-appeal-to-the-struggling-masses&catid=119:feature&Itemid=132 date: 16th January, 2016

गौरव सोमवंशी

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच ते खालील इतर संस्थांशी संलग्न आहेत.
Fellow – Royal Academy of Engineering, London, Future Leader – British Council, Dalai Lama fellow – Virginia University, Member – African Blockchain Alliance

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*