पवनकुमार शिंदे
कम्युनिस्टस बाबासाहेब आंबेडकरांची आणि आंबेडकरवाद्यांची जाहीर माफी कधी मागणार आहेत ?
1948 ला दुसऱ्या राष्ट्रीय सभेत कम्युनिस्टांनि, ‘Political Thesis’ प्रकाशित केला होता. ही थेसिस प्रकाशित करण्याची या टोळीची पूर्व परंपरा आहे. तो एक प्रकारचा ठरावच असतो. आणि सर्वानुमते पारित होतो.
सदर पॉलिटिकल थेसिस मध्ये कम्युनिस्टांनी लिहिलं होतं की,
“This task will have to be carried out by a relentless struggle against the bourgeoisie of the upper castes as well against the opportunist and separatist leaders of the untouchables themselves. We have to expose these leaders, tear away the untouchable masses from their influence, and convince them that their interest lies in joining hands with the other exploited sections…”
मराठी अनुवाद– ” उच्च जाती च्या बुर्जुआ तसेच अस्पृश्यांचे संधीसाधू आणि फुटपाडे पुढारी यांच्या विरोधात सदर कार्य हे अदम्य संघर्ष करून चालवावे लागणार आहे. आपल्याला या पुढाऱ्यांना उघडे पाडून, त्याचा अस्पृश्य वर्गावर असलेला प्रभाव तोडून,सदर वर्गाला इतर शोषित वर्गासोबत हातमिळवणी करण्यासाठी पटवून द्यावे लागणार आहे…”
सदर ठरावात ‘अस्पृश्यांचे संधीसाधू आणि फुटपाडे पुढारी’ हे शेलकी वाक्ये कम्युनिस्ट टोळीने बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल लिहिली होती.
गेल ओमवेट लिहितात,
“Ambedkar was specifically named as a ‘reformist and separatist leader’..”
(Gail Omvedt 2013: 255)
कम्युनिस्टांनी बाबासाहेब आंबेडकर हे फुटपाडे आणि संधीसाधू म्हणून हा ठराव 1948 ला पारित केला होता तो रद्द केला का ?
उपरती येऊन जाहीर माफी मागितली का ?
जाहीर माफी मागणार आहेत का ?
स्वतःस एकीकडे आंबेडकरवादि व लगेच दुसरीकडे मार्क्सवादी म्हणवून घेणाऱ्यांनी या ठरावाबद्दल ब्र देखील का काढला नाही ?
त्यांनी कम्युनिस्ट टोळीच्या उपरोक्त ठरावास मूक संमती दिली आहे की काय ?
असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.
ते काहीही असो, मूळ मुद्दा असा की उपरोक्त ठराव, जो फाजील आणि बदमाशी पूर्ण शब्दांनी भरलेला आहे, तो रद्द करून कम्युनिस्टांनी बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरवादी समूहाची जाहीर माफी मागावी.
(टीप– इतिहासातील गडे मुर्दे का खोदताय ? असा साळसूदपणाचा सल्ला देण्याची लटपट करू नये. कारण स्पष्ट आहे. भूतकाळातील आरोप प्रत्यारोप खोडून काढले नाही तर तो एकप्रकारे historical fact बनून जातो.)
पवनकुमार शिंदे
लेखक ‘प्रज्ञासूर्याच्या प्रखर तेजाकडे – चला बाबासाहेबांच्या मूळ ग्रंथाकडे महाअभियान’, राष्ट्र हितकारिणी सभा, परभणी चे संकल्पक – प्रवर्तक आहेत.
- “पोलीस स्टेट” चा फायदा कोण उपटतो? - November 21, 2021
- पुणे तहाची (कराराची) ८९ वर्ष! – भाग १ - September 24, 2021
- कॉ.शरद पाटील यांचे फुले – बाबासाहेबांवरील अबौध्दिक आरोप आणि सत्यता – भाग २ - September 21, 2021
Leave a Reply