प्रजासत्ताक दिन की लोकसत्ताक दिन?

ॲड सोनिया अमृत गजभिये

प्रजासत्ताक दिन की लोकसत्ताक दिन?

लोकसत्ताक दिनाचे निर्माते भारतीय संविधान चिरायु होवो.

२६ जानेवारी म्हणजे काय?
२६ जानेवारी, १९५० पासून भारतात संविधान लागू करण्यात आले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवस सतत सखोल अभ्यास करून भारतीय संविधानाची निर्मीती केली. भारतीय संविधान लिहितांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या तब्येतीची काळजीही केली नाही ज्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर फार गंभीररीत्या झाला आणि म्हणूनच फार कमी वेळात डॉ बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वाना सोडून महानिर्वाण ला प्राप्त झाले.

२६ नोव्हेंबर १९४९ ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाचे लिखान पूर्ण करुन भारतीय संविधान हे संविधान सभेला सुपुर्द केल ( हस्तांतरित केल) म्हणून आपण भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच वाचन करतानी म्हणतो की “…. आज दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी याव्दारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.”

परंतू खर महत्व हे भारतीय संविधानाला २६ जानेवारी १९५० ला लाभल कारण २६ जानेवारी १९५० ला भारतीय संविधान संपूर्ण देशात लागू करण्यात आले होते आणि हि भारत देशातील सर्वात मोठी घटना होती कारन १९४५ मध्ये द्वितीय महायुद्ध समाप्त झाले आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नाला प्राधान्य प्राप्त झाले. या प्रश्नावर विचार विनिमय करण्या करीता ब्रिटिश शासनाने एक त्रिसदस्यि शिष्टमंडळ भारतात पाठविले. हे शिष्टमंडळ सत्ता हस्तांतरणचा निर्विघ्न मार्ग, पध्दती, प्रक्रिया आणि साधने सुचवण्याच्या हेतूने भारतात पाठविण्यात आले होते. या शिष्टमंडळाला “कॅबिनेट मिशन” असे नाव देण्यात आले होते.

या कॅबिनेट मिशनने १६ मार्च १९४६ रोजी सत्ता हस्तांतरणाची आपली योजना घोषित केली. भारताचा भावी राज्यकारभार चालविण्याच्या दृष्टीने संविधान निर्मीतीसाठी एक संविधान सभा स्थापन करण्यात यावी असे या योजनेत सूचित करण्यात आले होते. त्या प्रस्तावानुसार संविधान सभेच्या स्थापनेसाठी निवडणुका घेण्यात आल्या.त्या प्रस्तावानुसार संविधान सभेच्या स्थापनेसाठी निवडणुका घेण्यात आल्या. संविधान सभेवर सदस्याचे निर्वाचन प्रांतीय विधानमंडळाच्या निर्वाचित सदस्याद्वारे करण्यात आले. कांग्रेसच्या विरोधामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर मुंबई विधानमंडळातून निर्वाचित होउ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी बंगाल विधान मंडळातून श्री जोगेंन्द्रनाथ मंडल आणि इतर अनुसूचित जातीच्या सदस्याच्या पाठिंब्यावर संविधान सभेत प्रवेश मिळविला.

इथून संविधान सभेने ९ डिसेंबर १९४६ रोजी भारताच्या संविधान निर्मीतीच्या कार्याला प्रारंभ केला यानंतर २ वर्ष ११ महिने १८ दिवस सखोल अभ्यास व अथक प्रयत्नाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ ला भारतीय संविधान हस्तांतरीत केले.

२६ जानेवारी १९५० ला भारतीय संविधान संपूर्ण देशाला लागू करून देशाला ब्रिटीश तावडीतून व त्याच्या अधिपत्या खालून मोकळ करून स्वातंत्र बहाल केल व संपूर्ण भारत देश हा या नंतर संवैधानिक तरतुदीनुसार चालणार हे अर्थात २६ जानेवारीच महत्व. भारतीय संविधान लागू होउन भारतीय नागरीकांना त्याचे मुलभूत अधिकार व कर्तव्य बहाल करणे व सर्वात महत्वाच म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील नागरिकांना पुरुष कींवा स्त्री असला कुठलाही भेदभाव न करता ” एक मत ” ( right of vote ) देण्याचा अधिकार दिला. या “एक मत” अधिकाराच्या आधारेच प्रजेची म्हणजेच लोकांची सत्ता निर्माण झाली. स्वातंत्र्या पुर्व काळात भारतात ‘ राजा हा राणीच्या पोटातून जन्म घेत असे परंतू २६ जानेवारी १९५० पासून अर्थात संविधान चिरायु दिनापासून भारत देशातील राजा ( राष्ट्रपती ) हा मताच्या पेटीतून जन्म घेतो आणि म्हणूनच संपुर्ण जगात भारताची ओळख ही ‘लोकशाही’ राज्य म्हणून आहे. एवढ्या मोठ्या परीवर्तनाचे जनक व संविधानाचे शिल्पकार यांचे आपण २६ जानेवारी दिवशी जयघोष ही करत नाही किंवा त्यांचा त्याग याचा नाममात्र उल्लेख ही करीत नाही हे फारच दुखद व खेदजनक आहे.

२६ जानेवारी हा दिवस विद्यार्थ्यांना बलिदानाचा दिवस असे सांगून खरी माहीती लपविण्यात येते व पुस्तकातून ही खोटी शिकवण देण्यात येते. २६ जानेवारी हा मुळात लोकशाहीचा दिवस या दिवशी भारतीय संविधानाने भारतीय नागरीकांना मूलभूत अधिकार व मताचा अधिकार तर दिलाच सोबत ‘सामाजिक, आर्थिक व राजनीतिक “न्याय” ; विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे “स्वांतत्र” ; दर्जाची व संधीची “समानता” व व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी “बंधुता” हे सुद्धा निर्धीरीत करून दिले.

अश्या या २६ जानेवारीचा खरा मानकरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष सुद्धा करण्यात येत नाही हे मोठे दुर्देव च आहे.
लोकशाही दिनी धर्मनिरपेक्ष देशातील जबाबदार नागरीकांनी, सरकारी अधिकार्यांनी, शिक्षकांनी, न्यायधिशांनी व केंद्रिय व राज्य सरकारने २६ जानेवारीला राष्ट्रध्वजाखाली डॉ बाबासाहेबांची प्रतिमा ठेवूनच ध्वजारोहन करावे व सोबतच भारतीय संविधानाची उद्देशिका याचे वाचन करावे. भारतीय संविधानाच्या संवैधानिक तरतुदीचे पालन करुन अशिक्षित व ज्यांना संविधाना चा गंध ही नाही अश्या लोकांनमध्ये प्रचार प्रसार करावा व हे प्रत्येक भारतीय नागरीकांचे कर्तव्य आहे, असे मी मानते.

जय भीम. जय संविधान. जय भारत.

ॲड सोनिया अमृत गजभिये

लेखिका नागपूर येथे अधिवक्ता असून त्या सामाजिक कार्यकर्ता आहेत, तसेच भिमराज की बेटी ह्या सामाजिक संस्थेच्या संस्थापक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*