राष्ट्रद्रोही कोण?

पवनकुमार शिंदे

भारतात अनेक दशके राष्ट्रद्रोही व राष्ट्रभक्तीची चर्चा सुरु आहे. राष्ट्र म्हणजे काय ? राष्ट्र म्हणजे अश्या लोकांचा समूह जो एकजुटिने, सर्वानुमते ठरलेल्या उद्देश्याच्या पूर्ति साठी कार्य करतो. त्या सामूहिक, सार्वजनिक उद्दिष्टांच्या जिंकण्यात सर्वांच जिंकणे असते व त्या उद्दिष्टांच्या हरण्यात सर्वांची हार असते. वेळप्रसंगी त्या उद्देश्याच्या आड येणाऱ्यास शत्रु घोषित करुन, त्याच्याशी दोन हात करण्यास सज्ज होणारा समूह हे राष्ट्र होय. अर्थात ही व्याख्या मर्यादित आहे. किंतु मर्यादित जरी असली तरी त्यातून राष्ट्र असण्याचा अतिशय महत्वपूर्ण मुद्दा अधोरेखित होतो.

भारतीय संविधानाने दिलेले उद्देश्य

संविधानपूर्व भारत हा मौर्य सुवर्णकाळ सोडला तर राष्ट्र नव्हता. त्यामागची कारणे उघड आहेत.

भारतीय संविधान निर्माण म्हणजे भारत देशाचे राष्ट्रात रूपांतर करण्याचे पहिले पाऊल होते. देशातील सर्व प्रमुख घटकांना मान्य होईल असे संविधान बनवणे ही संविधानाची पूर्वअटच होती. ते महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले.

समता, स्वातंत्र्य, न्याय आणि मित्रता या चतुःसूत्रीवर आधारित लोकल्याणकारी भारताचे अधिष्ठान असेल. असा उदात्त अणि पवित्र उद्देश्य, संविधानाने भारतीय नागरीकांसमोर ठेवला आहे. जी कुणी व्यक्ति, विचारधारा, संघटना, जाती पोटजाती, वर्ण इत्यादि या भारतीय संविधानाने उद्घोषित केलेल्या उद्देश्याच्या आड येतील ते ते या राष्ट्राचे शत्रु आहेत हे उघड होय. आणि तेच खरे राष्ट्रद्रोही ठरतात हे कोणताहि सुज्ञ व्यक्ति कबूल करील हे वेगळे सांगावयास नको.

भारतीय नागरिकत्व कायद्यात देखील, भारतीय संविधानाचा विरोध करणारा अथवा संविधान विरोधी वातावरण तयार करणाऱ्या व्यक्तीचे नागरिकत्व हिरावून घेण्याची तरतूद आहे. ती उगाच नव्हे.

कोणाची विचारधारा संविधानाशी सुसंगत आहे याचं उत्तर कुठलाही भारतीय व्यक्ति –

बुद्ध-कबीर-फुले-शाहू-बाबासाहेबांचेच विचार व तत्वज्ञान हेच आहेत असेच उत्तर देईल. याच विचारधारेला आपण एका मर्यादित अर्थाने आंबेडकरवाद असे म्हणतो.

इतर विचारधारांचे काय? म्हणजे, टिळकवाद, गांधीवाद, हेडगेवारवाद,सावरकरवाद, गोळवलकरवाद, साम्यवाद(कम्युनिस्ट) यांबद्दल विचाराल तर, हे सर्व वाद कमीअधिक प्रमाणात राष्ट्रद्रोही या सदरात मोडतात असे सिद्ध करता येते.

याचे महत्वाचे कारण म्हणजे, हे सर्व वाद संविधानाशी विसंगत आहेत, म्हणून.

संवैधानिक व्यवस्थेतिल

१)राजकीय व्यवस्था,

२) सामाजिक व्यवस्था

३)आर्थिक व्यवस्था व

४) धार्मिक व्यवस्था जी असावी, त्याच्या अगदी उलट या वरील विचारधरांची भूमिका आहे.

आता आपन ते सर्व वाद अर्थात टिळकवाद, गांधीवाद, गोळवलकरवाद, सावरकरवाद आणि साम्यवाद कशाप्रकारे संवैधानिक व्यवस्थेच्या साधनांच्या विरोधात आहेत, म्हणून राष्ट्रद्रोही ठरतात हे पाहू.

1) टिळकवाद :-

राजकीय व्यवस्था:-पेशवाई

सामाजिक व्यवस्था:- चातुर्वर्ण्य व जाती व्यवस्था

आर्थिक व्यवस्था:- जाती आधारित व्यवसाय

धार्मिक व्यवस्था:-वैदिक धर्म.

2) गांधीवाद:-

राजकीय व्यवस्था:-रामराज्य

सामाजिक व्यवस्था:-चातुर्वर्ण्य व्यवस्था

आर्थिक व्यवस्था:- विश्वस्थ अर्थव्यवस्था

धार्मिक व्यवस्था:-सनातन हिंदू(ब्राह्मणी)

3)गोळवलकरवाद:-

राजकीय व्यवस्था:-हिंदुत्व

सामाजिक व्यवस्था:-चातुर्वर्ण्य

आर्थिक व्यवस्था:-जातीय भांडवलशाही

धार्मिक व्यवस्था:-हिंदू(ब्राह्मणी धर्म)

4)सावरकरवाद :-

राजकीय व्यवस्था:-हिंदुत्व

सामाजिक व्यवस्था:-वर्णव्यवस्था

आर्थिक व्यवस्था:- ठोस विचार नाही

धार्मिक व्यवस्था:-कोणता ही धर्म पाळा.(पण हिन्दुत्वापुढे(ब्राह्मणत्व) तो दुय्यम च गणल्या जाईल)

5)साम्यवाद (कम्युनिस्ट):- इथला साम्यवाद हा ब्राह्मणवादच म्हणावा लागेल, त्या शिवाय त्याची समीक्षा इथल्या भूमीत करता येणं शक्य नाही.

राजकीय व्यवस्था:-कामगारांची हुकुमशाही (पण प्रत्यक्षात Brahmin boys club – बाबासाहेबांच्या भाषेत)

सामाजिक व्यवस्था:-ब्राह्मणी नेतृत्व असलेले कम्युन

आर्थिक व्यवस्था:-साम्यवादी(ब्राह्मणी नेतृत्व, वर्गाची भाषा मुळात जात हेच वर्ग असताना देखील, म्हणजेच आहे तीच जात आधारित सरंजामी अर्थ व्यवस्था)

धार्मिक व्यवस्था:-धर्म आफूचि गोळी आहे. फेकून दया.( तरी देखील ब्राह्मणी अधिपत्याखाली, उदाहरण दुर्गो पूजा)

आता जर आपण या सर्व विचारधारांची तुलना भारतीय संविधानाने निर्देशित केलेल्या व्यवस्थेशी केला तर चित्र स्वयंस्पष्ट होते.

भारतीय संविधानिक व्यवस्था–

राजकीय व्यवस्था– प्रजासत्ताक लोकशाही

सामाजिक व्यवस्था– स्वतंत्रता,समानता, बंधुता या त्रिसूत्री आधारित

आर्थिक व्यवस्था– लोककल्याणकारी

धार्मिक व्यवस्था– धार्मिक स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्ष

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका

बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्र निर्माणाबाबत, संविधानिक व्यवस्थेबाबत त्यांची मते वारंवार मांडलेली आपणास दिसतील. उपरोक्त व्यवस्थेच्या संदर्भाने पहावयाचे झाल्यास,

आंबेडकरवाद–

राजकीय व्यवस्था– प्रजासत्ताक लोकशाही

सामाजिक व्यवस्था– त्रिसूत्री वर आधारित

आर्थिक व्यवस्था– लोककल्याणकारी राष्ट्रीय समाजवादी

धार्मिक व्यवस्था– प्रबुद्ध भारत (Enlightened India)

कोणाची विचारधारा राष्ट्रासाठी पोषक ?

या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व तत्वज्ञान हे संविधानाशी सुसंगत असून, ते राष्ट्रप्रेमाचा सर्वोच्च बिंदू आहे. इतर विचारधारा या भारतीय संविधानाशी कमीअधिक प्रमाणात विसंगत, सबब त्यांचा राष्ट्र निर्माणासाठी काडीमात्र देखील उपयोग नाही असे आम्हास वाटते.

पवनकुमार शिंदे

लेखक ‘प्रज्ञासूर्याच्या प्रखर तेजाकडे – चला बाबासाहेबांच्या मूळ ग्रंथाकडे महाअभियान’, राष्ट्र हितकारिणी सभा, परभणी चे संकल्पक – प्रवर्तक आहेत.

1 Comment

  1. अगदी बरोबर आहे सर..!
    राष्ट्र भक्ती आणि देश भक्ती च्या नावाखाली बहुजन घटकाला हिंदुत्वाचे डोस पाजुन दिखावा करणाऱ्यांना हा लेख वाचून कळेल तरी की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रप्रेम खऱ्या अर्थाने योग्यच होते,आहे,असेल…!

Leave a Reply

Your email address will not be published.


*