लोकशाहीचा चौथा स्तंभ: दलित बहुजनांसाठी घातक !

5 मार्च 2019 ला IBN लोकमत वर “Youth Court” या तरुणांच्या कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय वर्धा येथील विद्यार्थ्यांनी मोदी विरुद्ध राहुल गांधी या मीडियाद्वारे तयार केलेल्या पोकळ चेहऱ्यांच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अर्थातच तिसरी आघाडीला मत दिले. पण ज्याप्रमाणे म्हटल्या जाते की आजचा मीडिया हा बिकाऊ, दुटप्पी आणि बहुजनांचा घात करणारा आहे ते 100% खरं उतरले जेव्हा प्रत्यक्षात हा कार्यक्रम टीव्ही वर प्रक्षेपित करण्यात आला.

मीडिया ला आर एस एस प्रणित भाजप मोदी सरकार ने अक्षरशः विकत घेतलंय हे याची देही याची डोळा बघण्याचा योग तेव्हा आला जेव्हा प्रत्यक्ष या कार्यक्रमाचा लाईव्ह साक्षीदार बघण्याची संधी मिळाली. मीडिया त्याच गोष्टी दाखवेल,त्यालाच प्रसिद्धी देईल आणि त्याच आधारावर तुमचे मत तयार करेल ज्याकरिता त्यांना पैसे चारण्यात आले. शेवटी जीसका खायेगा उसिका तो गायेगा!!

प्रस्तुत कार्यक्रमात अत्यंत धक्कादायक आणि जनसामान्यांना त्रस्त करतील असे प्रश्न गरीब शेतकरी मजूर कुटुंबातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी अत्यंत पोट तिडकीने मांडले. 300-350 विद्यार्थ्यांनी गच्च भरलेल्या सावित्रीमाई फुले सभागृहात सर्वाधिक विद्यार्थ्यांनी तिसरी आघाडी ला मत दिले तर बोटावर मोजण्याइतके फार फार तर पन्नाशेक विद्यार्थ्यांनी मोदी ला मत दिले.पण शेवटी विकत घेतलेल्या मीडियाने एबीव्हीपीच्या पोपटपंची कार्यकर्त्यांना जास्त कल दिला. आणि पुन्हा एकदा माझा वंचित बहुजन शेतकरी कुटुंबातील विदयार्थी हारला.एक वेळ तर अशी आली होती की anchor ला मोदी समर्थकांपुढे केविलवाण्या देहबोलीने म्हणावे लागले की “मोदी समर्थक काही तर बोला,तिसरी आघाडी तुमच्यावर वरचढ होतेय” पण करणार काय जे आर एस एस च्या सिल्याबस मध्ये शिकवले गेले आणि भाजपच्या आयटीसेल मधून निर्माण केलं गेलं त्या ज्ञानाच्या आधारावर ज्यात अभ्यास शून्य मुद्दे असतात तेवढेच ते बोलले. प्रसंगी anchor मोदी समर्थकांना सांगत होता की अमुक प्रश्नावर अमुक उत्तर द्या,यावर चित्रीकरणादरम्यान विरुद्ध पार्टी च्या विद्यार्थ्यांनी आक्षेप ही घेतला होता. एका मोदी समर्थक ने म्हटले की SC/ST विद्यार्थ्यांसाठी सरकार ने मोठ्या प्रमाणात हॉस्टेल ची सुविधा केली आहे, त्यावर तिसरी आघाडी समर्थक एक आदिवासी विद्यार्थी म्हणाला की,आम्हाला हॉस्टेल तर आहे परंतु मागील 2 वर्षांपासून आम्हाला हॉस्टेल मेसची सुविधा नाही,बदल्यात 3000 रुपये स्टायपेंड देण्यात येतो. दुर्गम भागातून येणारे आम्ही,शहरात नवीन असतांना एका वेगळ्याच संघर्षात असताना ऐनवेळी जेवणाची व्यवस्था कशी करणार.त्यामुळे अनेक आदिवासी विद्यार्थ्यांनी हॉस्टेल सोडून अप डाउन करणे पसंत केले. याचा शिक्षणावर विपरीत परिणाम होतो.अनेकवेळा शिक्षण सोडून द्यावे हा विचार ही आला.अनेक हॉस्टेल आज ओसाड पडत चालले आहेत.यावर मोदी समर्थक गप्प होते.हा मुद्दा सुद्धा चॅनल ने वगळला.

राजकीय धार्मिक आकसापोटी अनेक निरपराध मुस्लिम युवकांना खोट्या आरोपा खाली जेलमध्ये डांबण्यात येते तेच जर कुळकर्णी च्या घरात ट्रक भरून आरडीएक्स जरी सापडले तरी कार्यवाही होत नाही. मालेगाव बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर,कर्नल पुरोहित मात्र निर्दोष सुटल्या जाते. हा प्रश्न केला होता एका मुस्लिम विद्यार्थ्याने. हा ही मुद्दा चॅनल ने पूर्णपणे दाखविण्याची हिम्मत केली नाही.

एक ए बी व्ही पी चा विद्यार्थी असलेला मोदी समर्थक म्हणाला की सवर्णांना 10% आरक्षण लागू जरी झाले असले तरी आमच्या कडे नोकऱ्या नाहीत. SC/ST/OBC/NT ला समान आरक्षण का मिळत नाही. आज यांच्या मोठमोठ्या इमारती आहेत. तरीही हे लोक पिढयानपिढ्या आरक्षणाचा लाभ च घेत राहतील का? आरक्षण हे आर्थिक आधारित असावे, ब्राम्हणमध्येही गरीब आहेत. यावर तिसरी आघाडी समर्थित विद्यार्थ्यांने उत्तर दिले की आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही,संविधानात सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांना आरक्षण देण्याचे प्रावधान आहे. मागील 70 वर्षात आम्हालाच पूर्णपणे आरक्षण मिळालेले नसतांना, अनेक बॅकलॉग भरलेला नसतांना, अजूनही जातवार जनगणनेचा आकडा पुढे आलेला नसतांना कुठलीही जनगणना न करता सवर्णांना 10% आरक्षण बहाल करणे म्हणजे येथील वंचित बहुजन मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय करणे होय !! हे निर्भीड मत विद्यार्थ्यांनी मांडले असले तरीही केवळ आर्थिक निकषावरच आरक्षण असावे एवढेच काय ते चॅनल ने दाखवले,.बाकी सर्व खोडून काढले.

13पॉईंट रोस्टर विरूद्ध ही अनेक विद्यार्थ्यांनी आपले मत मांडले तरीही चॅनलने ते वगळले. भीमाकोरेगाव जातीय हिंसाचाराचे मुख्य आरोपी भिडे एकबोटे राजरोस पणे राज्यात फिरत असतांना, गृहखाते स्वतःकडे ठेवलेले राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी भिडे ला अटक का केली नाही हा प्रश्न एका विद्यार्थिनीने विचारला असता, चॅनल ने तो मुद्दा प्रक्षेपित केला नाही.

20लाख आदिवासींच्या जमिनी हिसकावून त्यांना बेघर करण्यात आले..तरीही मोदी सरकार ने केवळ भांडवलदारांचे घर भरण्यात भर का दिला, हा सवाल केला एका आदिवासी विद्यार्थ्याने यावर मोदी समर्थक मूग गिळून तर बसले होतेच…परंतु चॅनल ने मात्र हा ही मुद्दा वगळला. मागील 5 वर्षात महाराष्ट्र सरकार ने 1300 जिल्हापरिषदेच्या शाळा बंद करून शिक्षणाचे खासगीकरण केले. शिक्षण हे वंचित बहुजनांच्या आवाक्या बाहेर केले.अंगणवाडीत निकृष्ट पोषणवीरहित अन्नाचा पुरवठा करणारे, युवकांमध्ये बेरोजगारीची वाढ करणारे, महिला सुरक्षा विरोधी, पकोडे विकण्याचा सल्ला देणारं हे सरकार आमचं नाहीच हा हुंकार विद्यार्थ्यांनी मांडला!! तरीही चॅनल ने ते दाखवण्यात कुचराई ती केलीच.

कुंभमेळ्यातील नागड्या साधूंवर 4200 कोटीचे बजेट ठरवल्या जाते आणि विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप कमी करण्यात येतात. आमच्या स्कॉलरशिप अनेकदा डिग्री पूर्ण झाल्यावर खात्यात जमा होते जेव्हा त्याचा काहीच उपयोग होत नाही. शिक्षण घेण्याऐवजी बाबा साधू होणे कधीही फायद्याचे. हा आक्रोश होता सर्व विद्यार्थ्यांचा तरीही चॅनल ने हा मुद्दा सुद्धा वगळला.

जातीय हिंसाचार, गुजरात येथील मुलांवर जातीयवादातून मारहाण होते तरीही मोदी सरकार आरोपींविरुद्ध कुठलीही कार्यवाही का करत नाही हा सवाल होता bsw प्रथम वर्षाच्या मुलीचा. आज आर एस एस धार्मिकता,पैसा राजकीय कुटीलता याच्या बळावर जनमत प्रभावीत करत आहे. जिथे पैसा काम करणार नाही तिथे जातीय हिंसाचाराचा उपयोग करा ,या साम दाम दंड भेद नीतीचा वापर करून आर एस एस 2019 ची तयारी करत आहे. कधी नव्हे तो इतका जातीयवाद देशात वाढतोय,जातिजातीत धर्माधर्मात जातीय तेढ,अविश्वास निर्माण करण्यास आर एस एस प्रणित भाजप सरकार यशस्वी झालंय असे मत प्राध्यापकांमध्येही उमटले.

एकंदरीतच चित्रीकरणादरम्यान विदयार्थी मोदी विरुद्ध पेटून होते, त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं हवी होती.एकप्रकारे त्यादिवशी मोदींविरुद्ध चे पारडे जड होते. पण प्रत्यक्षात कार्यक्रम प्रक्षेपणाच्या वेळी मोदी ची बाजू सरस दाखवण्यात चॅनेल यशस्वी झाले.

कार्यक्रमाचे चित्रीकरण झाल्यावर युथ कोर्ट च्या टीम सोबत आम्ही चर्चा केली. खर तर त्यांच्या व्यथा ऐकल्यावर आणखी वाईट वाटलं. आज देशातील अनेक चॅनल जे मोदी भाजपचे गुणगान करते त्यांच्या कडे ऍड नाहीत. चॅनेल चालवायला ऍड हव्या असतात, मग आर एस एस प्रणित भाजप सरकार हेच त्यांना ऍड पुरवत आहे. आज भाजप मोदी म्हणेल तेच दाखवायचं. मीडिया पूर्णपणे सरकार च्या दबावात आहे.तिथं युवकांचा आवाज होऊ पाहणाऱ्या युथ कोर्ट ची काय बिशाद!!?

आज शेतात रक्ताचं पाणी करणारा बाप आत्महत्या करतोय तर तिकडे मुलगा बॉर्डरवर देशाच्या सुरक्षिततेसाठी शहिद होतोय. घरातला कर्ताधार्त मरण्याचं दुःख सोशल मीडियावर प्रक्षोभक व देशातील शांतता भंग करणाऱ्या आय टी सेल मध्ये बसून वल्गना करणाऱ्यांना काय उमगणार!!

पण जाताजाता युथ कोर्ट ची टीम एक आशावादी चित्र माझ्या डोळ्यासमोर ठेवून गेले ते ऍड.प्रकाश आंबेडकर व बॅ. ओवैसी या वंचित बहुजनांच्या नवीन सक्षम नेतृत्वाच्या माध्यमातून.!! महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडी प्रचंड निर्णायक ठरेल. वेळ आली तर सत्ता स्थापनेची जबाबदारी या सक्षम बहुजन नेतृत्वावर येऊ शकते. जवळपास 21 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये चित्रीकरण केल्यावर आलेला हा त्यांचा अनुभव!!!

त्यादिवशीच्या कार्यक्रमात सहभागी झालेले एबीव्हीपीचे सर्व विद्यार्थी हे आरएसएसचे पेड कार्यकर्ते होते जे गरीब शेतकरी मजूर वर्गातून आलेल्या वंचित मागासवर्गीय बहुजन स्वतःच्या तर्कबुद्धीचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपुढे अक्षरशः हारलेचं!! कारण त्यांचे प्रश्न हे रोजच्या जीवनाला भेडसावणारे प्रश्न होते,ते कोणाचे पेड कार्यकर्ते नव्हते!! तरीही आरएसएस प्रणित भाजप मोदी सरकार ने विकत घेतलेल्या बिकावू मीडिया पुढे आमचे बहुजन विद्यार्थी हारले किंवा जिंकले हा वादाचा मुद्दा असू शकतो….. परंतु अनेक संविधान जागरूक लोक जसे म्हणतात, आणि खरचं जर या देशावर तुमचे प्रेम असेल..हा देश जातीयवादी धर्मांध अंध भक्त लोकांपासून वाचवायचा असेल,या देशाची लोकशाही वाचवायची असेल तर निवडणूक होईस्तोवर आर एस एस भाजप ने पाळलेले हे बिकावू न्यूज चॅनल्स बघणे बंद करा!!! एवढेच काय ते सत्य!!!!

~~~

डॉ.चेतना सवाई: या फिटनेस एक्सपर्ट, फिसीओथेरपिस्ट, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या आहेत व सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजकार्य महाविद्यालय, वर्धा येथे सहप्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

3 Comments

  1. बहुत ही शर्मनाक बाते हैं मॅम, जो मेरा समाज अभि ढंग से चलना भी नही सिखा, उन्हे ये लोग फिरसे अपाहिज बनाने चले हैं . आरक्षण मिल्ने के लिये वर्ष ही कितने हुये हैं जो इन्हे आरक्षण इतना चुब रहा हैं। अरे क्यो भूल जाते हो वोह दिन जब 5000 हजार वर्ष सवरणो ने हमारा लहू चुसा । बहुत बडी चाल हैं इन कूट नितीवादी लोगो की । अगर हम ऐसेही मौन धारण करके बरदाष्त करते रहें तो बहुत महंगा पड सकता हैं ये अंदाज हमारा. हमारे पिता थे बाबा साहेब जीन्होने अपना सब कुछ कुर्बान करके हमे इतना हक दिलाया, पर अब वैसे वीचारो को लेकर कौन पैदा होगा, सब मेरा समाज बोलता हैं एक बाबा ( Dr, Ambedkar) फिर पैदा होणा चाहीए पर मेरे घर मे नही.
    क्रांतिकारी जय भीम। जय भारत ।

  2. Bahujanoka का मिडिया बनाना पडेगा ताई.. कांशीराम साहब की सोच की तर्क पर..

  3. उत्तम मांडणी आहे.समग्र वंचितांच्या प्रती माध्यमांचा दृष्टिकोन निश्चितच चिंतनीय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*