फासीवाद म्हणजे काय आणि त्याचा प्रतिकार कसा करावा ?

कार्यशाळा अहवाल — फासीवाद म्हणजे काय आणि त्याचा प्रतिकार कसा करावा ?
दिनांक : २३ फेब्रुवारी, २०१९
ठिकाण : आंबेडकर किंग स्टडी सर्किल (एकेएससी), सॅन होसे, कॅलिफोर्निया, यूएसए

GP 01

फॅसिसम म्हणजे काय आणि कोणत्या प्रकारे फॅसिसम एखाद्या लोकशाहीत मूळ धरून आर्थिक आणि सामाजिक शोषण व्यवस्था लादु शकतो हे समाजातील पुरोगामी आणि वंचित घटकांनी लक्षात घेऊन, एकत्रित येऊन त्याला आव्हान देणे गरजेचे आहे. ह्या अनुषंगाने 23 फेब्रुवारी रोजी आंबेडकर किंग स्टडी सर्किल (एकेएससी) ने कॅलिफोर्नियातील सॅन जोसमध्ये ‘व्हाट इज फासिस्म अँड हाऊ टू रेझिस्ट इट’ या विषयावर कार्यशाळा आयोजित केली. कार्यशाळेत जमलेल्यानी जॉर्जी डिमिट्रोव्ह यांच्या लिखाणाचा आढावा घेतला. त्यामध्ये १ – फासिझम विरूद्ध वर्किंग क्लासची एकता आणि २ – फासिझम विरूद्ध वर्किंग क्लासच्या लढ्यात कम्युनिस्ट इंटरनॅशनचे कार्य ह्या दोन विषयांची मांडणी आणि अभ्यास केला.

ह्या निमित्ताने तीन मान्यवरांची भाषणे झाली. फॅसिसम ची एक व्याख्या होऊ शकत नाही. ती समाजानुसार आणि देशानुसार बदलते. म्हणून इथे आम्ही तीन देशातील फॅसिस्ट शक्तींचा आढावा घेतला

ग्रीन पार्टीचे (जीपी) सदस्य श्री नसीम नोरी यांनी जीपीच्या 10 महत्त्वाच्या मूल्यांसह सुरुवात केली आणि त्याला सामाजिक न्याय आणि लोकशाही कशा प्रकारे जोडलेले आहेत हे मांडले. अमेरिकेच्या साम्राज्यवादी हस्तक्षेपाने जगभरात लोकशाही अस्थिर करण्याच्या आणि विशेषतः लॅटिन अमेरिकेत तानाशाहीची स्थापना करण्याच्या मागील ५० वर्षाचा इतिहास समोर ठेवला. व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेची अलीकडील हस्तक्षेप भांडवलशाही वर्गाच्या हितासाठी आहे. त्या म्हणाल्या की 1990 पासून लॅटिन अमेरिकेच्या समाजवादी सरकारांनी लोकांची जमीन आणि आर्थिक सुधारणा केल्या आहेत. त्यात ह्युगो चावेझ, राफेल कोरेआ, इवो मोरालेस, लुला, द कर्चनर ,जोसे मुजिका, मिशेल बॅचेलेट इत्यादी यांच्या नेतृत्वाखालील सरकारांचा समावेश आहे. त्याने तिथल्या समाजातील वंचित, शेतकरी आणि मजुरांच्या हिताची कामे केली गेली आहेत.
नासिमचा फेसबुक थेट व्हिडिओ येथे उपलब्ध आहे

https://www.facebook.com/groups/1249573841788059/permalink/2106373632774738/

बे एरिया मधील प्रसिद्ध तमिळ आणि भारतीय विचारवंत श्री मनी एम. मनिवनन यांनी जनसंघातून भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाचा राजकीय प्रवास सांगितला. जून 1975 ते मार्च 1977 या काळात भारतात आणीबाणी च्या कालखंडात दक्षिण भारतातील हिंदुत्ववादी शक्तींचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घुसखोरीबद्दल त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकीत भाजपा / आरएसएसला पराभूत करण्यासाठी मनी यांनी महाआघाडी वर जोर दिला.
मनीचा फेसबुक थेट व्हिडिओ येथे उपलब्ध आहे

https://www.facebook.com/groups/1249573841788059/permalink/2106408119437956

Speakers 01

कॅलिफोर्नियाच्या “अनाकबायन” संस्थेच्या श्री माइकल परेडला यांनी फिलीपीन्सच्या लोकांच्या समस्या मांडल्या. फिलीपीन्स मध्ये साम्राज्यवाद्यांनी आणि तिथल्या भांडवलशाही वर्गाने कश्या प्रकारे फॅसिस्ट एकाधिकारशाही चालवली हे समजावले. श्री माइकल परेडला यांनी 1960 मध्ये मार्कोसच्या सरकारचा उदय आणि त्या भ्रष्टाचारी राजवटी विरोधात 1972 साली लोकांनी दिलेल्या संघार्षाचे खोल विश्लेषण केले. कबाटंग मकाबायन आणि फिलीपीन्स कम्युनिस्ट पार्टीच्या मार्गदर्शनाखालच्या या आंदोलनात विद्यार्थी, कामगार, शेतकरी आणि तरुण यांचा समावेश होता.

माईकचा फेसबुक थेट व्हिडिओ येथे येथे उपलब्ध आहे

https://www.facebook.com/groups/1249573841788059/permalink/2106457459433022/

कार्यशाळेत सगळ्यांनी उत्साहपूर्वक चर्चामध्ये भाग घेतला. एस के कार्तिकेयन आणि चैतन्य दिवाडकर यांनी चर्चेचा आढावा घेतला. चैतन्यने संपूर्ण कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रमाच्या अखेरीस वास्तविक समस्या समजून घेण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करण्याची गरज व्यक्त केली गेली.

~~~

सौजन्य: कार्तिकेय शनमुगम

अनुवाद: अजिंक्य पाटील

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*