सनातनी ब्राह्मण आणि पुरोगामी ब्राह्मण ह्या एकाच शरीराच्या दोन भुजा

राहुल बनसोडे

बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सनातनी ब्राह्मण आणि पुरोगामी ब्राह्मण हे एकाच शरीराच्या दोन भुजा आहेत. जेव्हा एक संकटात असतो तेव्हा दुसरा त्याच्या मदतीला धावतो. बाबासाहेब अशी मांडणी का करतात तर ब्राह्मण किंवा वरच्या जाती जेव्हा त्यांच्या वर्ग हिताचा किंवा vested interests चा प्रश्न उद्भवतो तेव्हा त्या जाती आपापले मतभेद (भलेही ते कितीही टोकाचे) असतील ते विसरून जात जाणीवेनुसार एकत्र येतात. याच तुम्हाला उदाहरण बघायच असेल तर करण जोहर आणि कंगना राणावत यांची गेल्या काही वर्षभरातील भांडणे पाहा. Nepotism आणि bollywood च्या आतील आणि जे बाहेरचे असे एकंदरीत तो वादाचा मुद्दा होता. पण तुम्ही आता शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने त्या दोघांच्या भूमिका तपासल्या असता ते वर्ग हित जपणाऱ्या भूमिका आहेत हे लक्षात येईल.

जसे शोषक वर्गाचं वर्गहित असत तस शोषित वर्गाचं स्वतचं असं कोणत ही वर्गहीत नसत. कारण त्यांच्यातल्या दरीचा शोषक वर्ग नेहमी खूप सहजतेने फायदा घेत असतो. जगाच्या इतिहासात हे सगळीकडेच पाहायला मिळेल. म्हणून आपण लगेच कोणी शोषक वर्गातून शोषितांच्या लढ्याला पांठीबा आला की लगेच हरखुन जायच कारण नाही आहे. कारण पाठिंबा तोपर्यंतच असतो जोपर्यंत शोषित वर्ग लिबरल लोकांच्या आखलेल्या चौकटीत आपले प्रश्न मांडून लढत असतात. शोषित वर्गाने त्या चौकटीच्या बाहेर विचार केला की त्यांना लगेच disown केल जात लिबरल पुरोगामी लोकांकडून. शेतकरी आंदोलनातील 26 जानेवारीच्या दिवशीचा लाल किल्ल्या वरिल प्रकार आणि लिबरल लोकांचे भूमिका पाहा. पार शशी थरूर, राजदीप सरदेसाई, बरखा दत्त आणि ते रवीश कुमार पर्यन्त.

आनी शेवटीं शोषक वर्गाचा लढा हा Pareto च्या Power elite theory नुसार शोषक वर्गातील दोन वेगवेगळ्या गटातील संघर्ष बनून जातो आणि शोषितांचे प्रश्न हरवले जातात. त्यामुळे करण जोहर Vs कंगना राणावत असो किंवा अर्णब गोस्वामी Vs रवीश कुमार अशी बायनरी टाळून आपण आपले प्रश्न मांडावे लागतील आणि आपली लढाई लढावी लागेल. नाहीतर उगीच कुणीतरी आपल्याला मुक्त करण्यासाठी येईल अशा आशेवर जगू नये.

आता गोदी मीडिया हा शब्द एनडीटीव्ही चे रवीश कुमार यांनी दिलेला आहे. खरेतर हा शब्दप्रयोग करून रवीश कुमार यांनी एक दिशाभूल आणि चालाखी केलेली आहे शोषित समुहा विरुद्ध. मला माहीत आहे की इकडेसुद्धा रवीश कुमार चे फॅन भरपूर आहेत. पण हे मित्र भोळी आशा ठेवून त्या एका कमजोर आणि लाचार मनुष्यासारखे आहेत ज्यांना स्वतचं संरक्षण करणं जमत नाही. ते दुसऱ्यांवर अवलंबून असतात. तर असो. मूळ मुद्यांवर येतो. तर गोदी मीडिया हा शब्दप्रयोग 85% टक्के बहुसंख्येने असलेल्या बहुजन जातींच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न अनुल्लेखाने मारून झटक्यात निकाली काढतो. तो स्वतः ला जबाबदारीतून मुक्त ठेवण्यासाठी केलेला शब्दप्रयोग आहे. आणि परवाच्या दिल्लीत झालेल्या घटनेचं तुम्ही वार्तांकन बघितलं असेल. तर एनडीटीव्ही देखील शेतकरी आंदोलकाना क्रिमिनल ठरवण्यात आघाडीवर होती.

त्यामुळे अरूंधती रॉय सारखे ख्रिश्चन पुरोगामी ब्राह्मण लेखिका असोत अथवा रविषकुमार पांडे सारखे भुमिहार ब्राह्मण अथवा राजदीप सरदेसाई सारखे पुरोगामी ‘अभिमानी गौड सारस्वत ब्राह्मण ‘ अथवा उघड उघड प्रतिगामी उजवे ब्राह्मण जे आरएसएस सारख्याच प्रतिनिधित्व करतात हे सगळे एकाच माळेचे मणी असतात हे कळेल त्या दिवशी आपण खऱ्या संघर्षाला सुरूवात केली असेल अन्यथा आपण कायम व्यर्थ लढाई लढत बसू.

राहुल बनसोडे

लेखक इंडिपेंडंट रिसर्चर असून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*