Just Mercy चित्रपट आणि भारतीय जात वास्तवाचा संबंध!

राहुल पगारे

आफ्रिकन-अमेरिकनांचा न्याय लढा लढणारा वकील “Poverty च्या opposite Wealth नाही तर poverty च्या opposite justice न्याय” असतो हे वास्तव मांडत Just Mercy हा सिनेमा समाप्त होतो.

हेच वास्तव भारतीय परिप्रेक्षात बघायचं तर poverty opposite justice ऐवजी caste opposite justice ठरतो. भारतीय अर्थव्यवस्थेत आलेलं दारिद्र्य हे अर्थव्यवस्थेच्या मागणी पुरवठा, विनिमय गुंतवणूक दर, उत्पादन, बाजार विपणन (मार्केटिंग), मनुष्यबळ व कार्यक्षमता, इत्यादींच्या अभावातून किंवा यांच्या अनियोजत कारभारातुन आलेलं नाही तर जातीच्या विषमतेतून, शोषणातून आलेलं आहे. म्हणजे सामाजिक रचनेत grades of caste = grades of wealth (percentage of accumulation of wealth) असं चित्र आहे.

इथं वर्गलढा ओढुन ताणुन जरी बसवला तरी आंबेडकरी बाण्याचे हायकोर्ट जस्टीस कर्णन यांच्यावर झालेला अन्याय व प्रशांत भुषण सारख्या सवर्ण व्यक्तीला याच सुप्रीम कोर्टाने दिलेली सुट caste opposite to justice चे उदाहरण आहे. तसेच आंतकवादी कारवायात सढळ पुरावे असताना सुटलेली साध्वी प्रज्ञा सिंग आणि आता मजुरांच्या प्रश्नावर आंदोलन करते म्हणुन एक महिन्या पासून कैदेत ठेऊन शारीरिक लैंगिक छळ केला जात असलेली नोवित कौर ! हे पण caste opposite justice चे उदाहरण आहे.

इतकच नाही तर लिबरल म्हणवणारे ब्राह्मण सवर्ण पण कन्हैया कुमार व आता पर्यावरणवादी दिशा रवी सारख्या ब्राह्मण सवर्णा बाबतीत जेवढं उसळले तेवढे तर मोदींच्या फॅसिझम विरूद्ध लढणारी नोविता कौर बाबत उदास होते. न्यायाच्या बाबतीत आपण किती दुर आहोत. Just Mercy सिनेमा तेच वास्तव काळ्या लोकांच्याच्या बाबतीत दाखवतो. फक्त रंग काळा आणि चेहऱ्यावरून हा गुन्हा करु शकतो एवढ्या कारणावरून मृत्युदंडाची शिक्षा केली जाते. प्रत्यक्ष पुरावे, आफ्रो-अमेरिकन लोकांचे eye witness पेक्षा गोऱ्यानां काय वाटते फक्त यावरच अख्ख्या समुहाचे क्रिमिनिलायझेशन केले जाते. हे आपल्याकडे तंतोतंत लागु होते, फक्त फरक इतकाच आपल्याकडे निकष “जात” आहे.

राहुल पगारे

लेखक आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*