डॉ. बाबासाहेब आंबेडकर
“मित्रांनो, जी.आय.पी. रेल्वेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ही परिषद आहे. या पूर्वी या प्रदेशात व इतर ठिकाणीही दलित वर्गाच्या अनेक परिषदा झालेल्या असून त्या विशिष्ट अर्थाने ही पहिली परिषद नव्हे. परंतु दुसऱ्या अर्थाने पाहिले तर अशा प्रकारची ही पहिलीच परिषद आहे. या पूर्वी दलित वर्गाने सामाजिक अन्यायाने निवारण करण्यासाठी तत्वशः लढा दिलेला आहे. त्यांच्या आर्थिक तक्रारीसंबंधी दलित वर्ग प्रथमतःच या परिषदेच्याद्वारा एकत्र येत आहे. आजपर्यंत परियांची परिषद म्हणून ते एकत्र येत होते. परंतु आज तुम्ही कामगार या नात्याने एकत्र येत आहात. सामाजिक तक्रारी दूर करण्यावर आपण आजपर्यंत आपले प्रयास केंद्रित केले यात आपली काही चूक झाली, असे मला म्हणवायाचे नाही. आपण अस्पृश्यतेचा नायनाट करण्यात अजून यशस्वी होऊ शकलो नाही, हे खरे आहे. प्रत्येक मानवाला मिळालेच पाहिजेत अशा स्वरूपाचे काही अत्यंत मूलभूत स्वरूपाचे हक्के आपणाला अजूनही मिळाले नाहीत, हेही खरे आहे. परंतु राजकीय सत्ता मिळविण्यात आपण यश मिळविले आहे, हेही तितकेच खरे आहे. ज्यांच्याजवळ सत्ता असते त्यालाच स्वातंत्र्य असते, हा सिद्धांत कोणीही नाकारू शकत नाही. स्वातंत्र्य मिळण्याचे व सर्व अडचणीतून मुक्त होण्याचे एकमेव साधन सत्ता हेच असून धार्मिक व आर्थिक शक्ती इतकी नसली तरी राजकीय शक्तीही खरीखुरी शक्ती असून बरीच परिणाकरीही आहे. सांगण्यास दुःख वाटत आहे की दलित वर्गाला नवीन घटनेप्रमाणे जे राजकीय हक्क मिळालेले आहेत ते आपल्या शत्रूंनी आपल्या यंत्रणेद्वारे आणि आपल्यातील स्वार्थी, गरजू आणि दुराचारी लोकांच्या साहाय्याने कूचकमी करून टाकले आहेत. ज्या सत्तेमागे संघटनेची शक्ती नसते, ज्या सत्तेमागे सुजाणपणा नाही, ती सत्ताच नव्हे. एक दिवस-फार दूरच्या काळात नव्हे -दलित वर्ग संघटित होईल व त्यांना मिळालेल्या राजकीय सत्तेचे त्यांना महत्व कळून येईल आणि आपल्या सामाजिक मुक्तीसाठी त्याचा परिणामकारकपणे उपयोग करून घेतील, अशी मला आशा वाटते.
आपले प्रयत्न चुकीच्या दिशेने झाले असे जरी मला म्हणावयाचे नसले तरी आम्ही फारच लांब काळापर्यंत आपल्या सामाजिक समस्येइतक्यात तीव्र असलेल्या आर्थिक प्रश्नांकडे दुर्लक्ष केले असून आज आपण अस्पृश्य म्हणून नव्हे तर कामगार म्हणून एकत्र जमत आहोत, याबद्दल मला आनंद होत आहे. हा नवीन मार्ग असून त्याची चर्चा करण्याची ज्यांनी ही संधी उपलब्ध करून दिली त्यांचे मी अभिनंदन करतो.
तथापि, असेही काही लोक आहेत की या आपल्या पावलाबद्दल त्यांनी मला दोष दिलेला आहे. कामगार पुढाऱ्यांकडून ही टीका झाली नसती तर त्यांची मी पर्वा केली नसती. ही दलित वर्ग कामगारांची वेगळी परिषद भरवून मी कागारांमध्ये फूट पाडीत आहे, असे त्यांच्या तक्रारीचे सार दिसते. माझ्या मते या देशातील कामगारांना दोन शत्रूंशी तोंड द्यावे लागले. हे दोन शत्रू म्हणजे ब्रह्मणशाही आणि भांडवलशाही हे होत. कामगारांना ज्याच्याशी दोन हात करणे प्राप्त आहे अशा ब्रह्मणशाहीला शत्रू म्हणून ओळखण्यात अपयश आल्यामुळे ही टीका काही प्रमाणात उद्भवली आहे. ब्रह्मणशाहीशी शत्रूच्या नात्याने दोन हात करावे लागतील, असे मी जे म्हणतो त्याचा चुकीचा अर्थ कोणी घेऊ नये, असे मला वाटते. ब्रह्मरणशाही या शब्दाने ब्राम्हण जातीची सत्ता, हक्क व तिचे हितसंबंध मला सुचवायचे नाहीत. त्या अर्थाने हा शब्द मी वापरीत नाही. ब्राह्मणेणशाही या शब्दाचा स्वातंत्र्य, समाता व बंधुभाव या तत्वांचा अभाव, असा अर्थ मला अभिप्रेत आहे. या अर्थाने त्याने सर्व बाबींमध्ये कहर माजविलेला असून ब्राह्मण तिचे जनक असेल तरी आता हा अभाव केवळ ब्राह्मणांपुरताच मर्यादित राहिलेला नाही. या ब्राह्मणशाहीचा सर्वत्र संचार झालेला असून तिचे सर्व वर्गाचे विचार व आचार नियंत्रित केले आहेत, ही निर्विवाद गोष्ट आहे. या शिवाय ही ब्राह्मणशाही काही विशिष्ट वर्गांना संधीची सामानता सुद्धा नाकारते. ब्राह्मणशाहीचे दुष्परिणाम केवळ सहभोजन व अंतरजातीह विवाह या सारख्या सामाजिक हक्कापर्यंतच मर्यादित नाहीत.
जर इतकेच असते तर तिच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नसती. परंतु केवळ इतकेच नाही. सामाजिक हक्कापेक्षा वेगळ्या असलेल्या नागरी हक्कांपर्यंतही तिचा व्याप पसरलेला आहे. सार्वजनिक शाळांचा, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक वाहने, सार्वजनिक विश्रामस्थाने यांचा उपयोग करणे हे नागरी हककांचे विषय आहेत. सार्वजनिक फंदद्वारे उभारण्यात आलेली किंवा सार्वजनिक फंडाद्वारे चालवीण्यात आलेली प्रततर्क बाब प्रत्येक नागरिकाच्या उपयोगासाठी खुली असली पाहिजे. परंतु असे कोत्यावधी लोक आहेत की त्यांना हे नागरी हक्क नाकारण्यात आले आहेत.या देशात हजारो वर्षांपासून मोकाट सुटलेल्या व विजेच्या जिवंत प्रवाहाप्रमाणे अजूनही कार्यशील असलेल्या या ब्राह्मणशाहीचा हा परिणाम आहे. या बद्दल कोणाला शंका आहे काय? ब्राह्मणशाही इतकी सर्वव्यापी आहे की आर्थिक संधीच्या प्रदेशावरही तिचा अंमल चालतो. डाळीतवर्ग कामगाराचे उदाहरण घ्या आणि इतर वर्गांच्या कामगारांबरोबर त्याची तुलना करून पाहा. रोजगार मिळविण्याच्या त्याला कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत? नोकरीची सुरक्षितता व तिच्यातील प्रगरतीच्या दृष्टीने त्याचे भावीतव्य काय आहे? भारताच्या इतर भागात काय घडते, याची मला कल्पना नाही. परंतु मुंबई इलाख्यातील मुंबई व अहमदाबाद येथील कापड गिरण्यातील विनाई विभागाचे दरवाजे दलित वर्गासाठी बंद आहेत, एवढे मला निश्चितचपणे माहित आहे. ते फक्त सूतकताई विभागातच काम करू शकतात. या सूतकताई विभागात सर्वात कमी पगार आहेत. त्यांना विणाई विभागातून वगळण्यात आले याचे कारण म्हणजे ते अस्पृश्य आहेत! आणि इतर हिंदू कामगार मुसलमान कंगारांसोबत काम करण्यास तयार असले तरी अस्पृश्य कामगारांसोबत काम करण्यास तयार नाहीत!
~~~
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे आपले संविधान-2 “ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हेच कामगार वर्गाचे दोन शत्रू!” पृष्ठ क्र.७-९, कौशल्य प्रकाशन
- तंगलान (Thangalaan) – निवडक रिव्ह्यूस - September 21, 2024
- छ. शाहू महाराजांवर संपादित पुस्तकासाठी लेख पाठवण्याचे आवाहन. - May 18, 2023
- ब्राह्मणी माध्यम प्रायोजित “नव – दलित” नरेटिव्हची समीक्षा – खुले चर्चासत्र - April 13, 2023
I think this is one of the most significant information for me.
And i am glad reading your article. But should remark on few general things, The website style is
perfect, the articles is really nice : D. Good job, cheers