या वेळेस सुद्धा जयंती घरीच साजरी करुया

ॲड मिलिंद बी गायकवाड

सध्याच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर कुणाच्याही कुठल्याही चिथावणीस बळी न पडता आंबेडकरी समाजाने याही वर्षी बाबासाहेबांची जयंती घरीच राहून साधेपणाने साजरी करावी या साठी आवाहन.

मागच्या वर्षी आंबेडकर जयंती घरातून साजरी करुंन आंबेडकरी समाजाने सर्वांना एक मोठा आदर्श दिलाय.. राष्ट्र सर्व प्रथम ही भूमिका आंबेडकरी समाज नेहमीच घेत आलाय आपल्या कृतीतून दाखवत आलाय…कारण बाबासाहेब स्वतः म्हणालेत… मी प्रथमत: ही भारतीय.आणी अंतिमत: ही भारतीय.. म्हणून…. वेळ काळ प्रसंग बाका म्हणुन……ह्या ही वर्षी.. मागच्या वर्षीचा कित्ता गिरवू या… मागील वर्षी प्रमाणेच मोठ्या प्रमाणात ऑनलाईन जयंती ह्या ही वर्षी साजरी करूयात… ऑनलाईन प्रबोधन.. ऑनलाईन व्याख्यान… ऑनलाईन अभिवादन… आणी सुरक्षित आंतर ठेवून छोटया प्रमाणात जयंती…. हा ही मार्ग… आपल्याला चोखळता येईल…

आमच्या नाशिकच्या पालकमंत्री ह्यांनी दोन एप्रिल पर्यंत अल्टीमेटम दिला आहें… करोनाची ही दुसरी लाट थोपवली गेली नाही.. तर परत लोकडाऊन लावायची चर्चा मंत्रालयात सुरू आहें… परत लोकडाऊन लावून जनतेला त्रास करुन घ्यायचा नसेल.. गोरगरीबाचे पोटा पाण्याचे हाल करायचे नसतील तर… आपण करोना संदर्भांत सर्व नियम पाळणे गरजेचे आहें…काही समाज कंटक मुद्दाम आंबेडकरी जनतेला उपसऊ पाहतील त्यांच्या पासून सावध राहायची आंबेडकरी जनतेला गरजेचे आहें…

जयंतीनिमित्त खूप मोठा निधी उभा राहतो…त्यातून आणखी समाज उपयोगी सबळ १२ महिने उपयोगी ठरणारा कृती कार्यक्रम उभा राहू शकतो ..बाकी आंबेडकरी जयंती निमित्त व्याख्याने /व्याख्यान माला /रक्तदान शिबीर /देहदान शिबीर /अवयव दान शिबीर /धम्मदान /प्रबोधनात्मक प्रोग्राम्स घेण्यात येतात त्यांचे स्वागत,बाबासाहेब जयंती निमित्त २४ तास अभ्यास उपक्रम +स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर ..काही ठिकाणी डिजे मुक्त जयंती अभियान सुरु आहे … काही ठिकाणी वर्गणी मुक्त आंबेडकरी अभियान /जयंती उपक्रम होत आहेत त्यांचे सुद्धा आभार …गेल्या ४०वर्षात आंबेडकरी जयंतीचे प्रकाशातून प्रकाशात जाणारा प्रवास सुरुच आहे..पुढे याचे भक्कम संस्था निर्मिती मध्ये रूप बदलाव हि अपेक्षा मी सुविद्य आंबेडकरी पिढी कडे व्यक्त करतो ..

असे म्हणतात आयडीयाज आर नो वन्स मोनोपोली …त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जयंती संदर्भात काही सकारात्मक सूचना असतील तर त्यांचे स्वागत करतो …
.हे लोक फक्त दारू पिवून नाचतात .+नाचून मोठे होऊ नका ..वैगरे शुद्ध कांगावे आहेत रडगाणे आहेत अश्या लोकांनी कधीही जयन्तीत योगदान दिलेले नसते .हें कधीच आंबेडकरी जयंतीच्या प्रोग्रॅमिंग मध्ये सामील नसतात .तसे काही गैर प्रकार असते तर आज आपल्या आया बहिणी पोरी भाच्या आंबेडकरी जयन्तीत इतक्या मोठ्या प्रमाणात सह्भागी झाल्याच नसत्या ..असो,.आंबेडकरी जनतेला वाचा म्हणून सांगणे म्हणजे सूर्या ला आरसा दाखवणे होय.साहित्य संम्मेलनात पुस्तकं विक्री होत नाही तितकी पुस्तके सहा डिसेंबर ला दादर चैत्य भूमीत खपतात…..असो जास्त काव्य करीत नाहीच ..प्रसंग बाका झालायं….आता जशी बाबा साहेबांची जयंती येइल तशी तशी काही लोकांची पोट शूळ वाढेल.. बाकी मराठीत म्हण आहेच “नावडती चे मीठ आळणी वैगरे तश्या लोकांचे पण कि बोर्ड वाजायाला लागलेय म्हणूनच हा एक सूचक पूर्व इशारा ..आमचे आदर्श ..तुकाराम महाराज म्हणलेलेच आहेत,

“भले त्यासी देवू .कासे ची लंगोटी.. नाठाळाच्या माथी मात्र…..

ॲड मिलिंद बी गायकवाड

लेखक नाशिक येथील रहिवासी असून अधिवक्ता तसेच सामाजिक कार्यकर्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*