लॉकडाऊन म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर!

राकेश अढांगळे

गेल्या वर्षी कोरोनाबद्दल कोणतीही माहिती नव्हती, आकडेवारी नव्हती, लसही नव्हती. PPE Kits, सॅनिटायझर आणि मास्क सोबत चीनने लॉकडाउन नावाचा पर्याय वापरात आणला होता, तोच युरोपीय देशानी स्विकारला व जगभर तेच सर्वानी स्विकारले.

कालांतराने बरेच पर्याय आले, अर्थचक्राला परवडणारे नव्हते म्हणून बऱ्याच देशानी लॉकडाउन उठवले. कोरोनाला ज्यापद्धतीने प्रस्तुत केले तितका घातक हा आजार नसल्याचे समजले. भारतात अनलॉक मोड चालू झाला. यात प्रचंड नुकसान गरीब जनतेचे झाले.

भारतामध्ये रोजंदारीवर काम करणारा वर्ग मोठा आहे जो प्रामुख्याने बहुजन समाजातील आहे. त्याची हातची नोकरी गेली पण दोनवेळच्या जेवणाचेही हाल झाले होते. हे सर्व सरकारला माहिती आहे. पाच महिने लॉकडाउन ठेवून कोरोना केसेस करोड झाल्या होत्या व अनऑथराईस्ज्ड किती असतील हे सांगणेही शक्य नाही.

कोरोनातून बऱ्या होणाऱ्या लोकांची संख्या ९७% आहे, मृत्यू दर २% ते २.५% टक्क्यावर आहे. कोरोनावर पर्याय म्हणून लॉकडाउन हा पर्याय निरर्थक ठरला, परंतु याच लॉकडाउनने जनतेसमोर फार मोठे संकट उभे केले. काहींचे दोन वेळ जेवणाचे, काहींच्या Rent चे, काहीचे नोकरीचे, काहींचे मुलांच्या शिक्षणाचे, काहींच्या स्वप्नांचे, काहीच्या उद्योगधंद्यांचे, काहींच्या Emi चे प्रश्न तसेच राहिले. इथली समाजव्यवस्था निराळी असल्याने यासर्वगोष्टीचे सर्वाधिक परिणाम खालच्या वर्गावर होते त्यांचे लोकसंखेतील प्रमाणही अधिक आहे. सोबत अल्पसंख्याकही आहेत ज्यांना टार्गेट व बॉयकॉट केले जाते.

लॉकडाउन काढून ७ महिने होतील, पण लोकांचे वरील प्रश्न अजून सुटलेले नाहीत. सरकार जर लॉकडाउनचा विचार करत असतील तर वरील सर्व गोष्टीची शाश्वती तर प्रथम द्यावीच, दुसरे म्हणजे लोकांना घरपोच अत्यावश्यक सेवा पुरवावी, घरात बसून असल्याने महिन्याला काही रक्कम द्यावी. यातूनच कोरोना रोखता येईल, नाहीतर गेल्यावेळ सारखा टाईमपास होईल. ज्याने आता दुप्पट नुकसान होईल आणि त्याचे परिणाम अत्यंत खोलवर असेल.

आता रुग्ण संख्या प्रचंड प्रमाणात होत आहेत, त्याला प्रमुख कारण वाढत्या टेस्ट आहे. तुम्ही मॉल, थिएटर आणि गर्दीच्या ठिकाणी जाल तर तुमची टेस्ट होईल, म्हणून संख्या वाढत आह. यात तुमचे नातेवाईक,मित्र किंवा त्यांचे नातेवाईक सापडले कि आपण घाबरून जातो. खरेतर यात आपण जबाबदारी घ्यावी, कारण कोरोना नाही असे आम्ही म्हणत नाही, कोरोना स्कॅम आहे अथवा नाही त्याबद्दलही मत मांडत नाही, पण राजकीय कार्यक्रमाना कोरोनाचे नियम धाब्यावर बसले जातात, क्रिकेट स्टेडियममध्येही गर्दी चालते. तिथे कोरोना होत नाही का? हाही प्रश्नच आहे!

प्रशासन बऱ्याच प्रकारे गर्दीवर नियंत्रण आणू शकतात, लोक परिस्थितीशी युस टू ही झाले होते. काही प्रतिबंध लावून काही वेळ काढून घेता येईल, परंतु मास्कच्या सक्तीने चालू असलेली लूट आणि लोकांना पोलिसांद्वारे केली जाणारी दादागिरी कमी करावी.

राकेश अढांगळे

लेखक मुंबई येथील रहिवासी असून कॉमर्स शाखेचे पदवीधर आहेत, तसेच आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*