“मेरिटॉक्रसी: एक घातक मिथक” (भाग ५)

गौरव सोमवंशी

या भागात आपण काही महत्त्वाच्या लिखाणावर लक्ष देऊन पाहू. लिखाण कोणी केलं आणि लिहिणाऱ्याची सामाजिक भूमिका काय किंवा राजनैतिक दृष्टीकोन कोणता आहे हे या भागात महत्वाचं नाही, कारण आपण पिकेटी पासून ग्रेबर (परस्परविरोधी भूमिका असणारी) मंडळींचे काही निवडक लिखाण बघणार आहोत.

प्रत्येक वाक्य हे पहिले इंग्रजीत तसच्या तसं मांडून, मग मराठीत त्याचा सार समजून घेऊ.

सुरू करूया.

१. सर्वात अगोदर डेव्हिड ग्रेबर, कारण ते मनात सर्वात वर आहे. त्याचं कारण हे की त्यांचं “बुलशीट जॉब्स: अ थेरी” हे पुस्तक भारतात सर्वत्र समोर दिसतंय.पण पुढील वाक्य हे त्यांच्या जुन्या आणि कमी गाजलेल्या पुस्तकातून आहे, “युटॉपिया ऑफ रुल्स (२०१५)” म्हणून.

“Career advancement is not based on merit but on a willingness to play along with the fiction that career advancement is based on merit, or with the fiction that rules and regulations apply to everyone equally, when in fact they are often deployed as an instrument of arbitrary personal power. … As whole societies have come to represent themselves as giant credentialized meritocracies, rather than as systems of predatory extraction, we bustle about, trying to curry favor by pretending we actually believe it to be true.” – David Graeber

म्हणजे की तुम्ही तुमच्या करियरमध्ये किती पुढे जाता हे मेरिटवर नाही पण तुमच्या या योग्यतेवर अवलंबून आहे की तुम्ही किती चपखलपणे हा गेम खेळू शकता की जगात सगळं मेरिटमुळे होतं. एकदा का हे मिथक मानायला सुरुवात झाली की तुम्ही स्वतःच मेरिट खरं ठरवत आजूबाजूला सुरू असलेलं शोषण आणि गरिबी याचं समर्थन पण सुरू करतात. स्वतः बॉससमोर सुट्टी साठी रडणारी व्यक्ती, मोलकरीण एक दिवस नाही आली तर पैसे कापायला खुश, कारण वेगळं मेरिट म्हणलं की वेगळे नियम लागू होणार ना?

२. थॉमस पिकेटीचं “कॅपिटल इन २१स्त सेंच्युरी (2013)” हे तर आल्याआल्या क्लासिक बनलं होतं. काँग्रेसने थॉमस पिकेटीला विचारूनच त्यांची ७२,००० वार्षिक आधार ही योजना आणली होती. पण पिकेटी हे सुद्धा म्हणाले होते की भारतीय सामाजिक-जातिआधारीत जनगणना (SECC)  सुद्धा अभ्यासासाठी जाहीर करा त्याशिवाय प्रश्न किती गंभीर आहेत याचा अंदाजा लागणार नाही. पण ते कोणी ऐकलं नाही (पण लालू यादव यांनी मागणी केली होती की ती माहिती जाहीर करा). ते राहू द्या, त्यांच्या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचा पॉईंट कोणता आहे, ते पाहू:

“When the rate of return on capital exceeds the rate of growth of output and income, as it did in the nineteenth century and seems quite likely to do again in the twenty-first, capitalism automatically generates arbitrary and unsustainable inequalities that radically undermine the meritocratic values on which democratic societies are based.” – Thomas Piketty

म्हणजे की, जर का माझ्याकडे अगोदर पासून असणाऱ्या मालमत्तेचा इन्व्हेस्ट केलेला रिटर्न, हा देशाच्या विकासाच्या दरा पेक्षा जास्त आहे, तर तुमचे सगळे मेरीटवर आधारित संकल्पना गळून पडणार आणि फक्त ज्याच्याकडे अगोदरपासून मालमत्ता आहे त्यांनाच श्रीमंतीचा लाभ होणार. अर्थात हे मार्क्स जे मांडतात त्याच्या जवळच आहे, पण असं भाकीत होतं की तंत्रज्ञानामुळे बऱ्याच मालमत्तेचं विभाजन होईल.पिकेटीने मग मागील पूर्ण शतकाचा डेटा गोळा करून हे दाखवून दिलं की श्रीमंती ही आजसुद्धा मेरिटपेक्षा तुम्ही अगोदरपासून किती श्रीमंत होतात यावर अवलंबून आहे.

 ३. प्रौडॉन (Proudhon) हे जगातील पाहिले व्यक्ती होते ज्यांनी स्वतःला “अनारकीस्ट(Anarchist)” म्हणून संबोधलं होतं, आणि तुम्हाला त्यांच्या आणि मार्क्सवादी विचारांमध्ये कुठे काय कशाला बिनसलं होतं, ते अनारकीस्ट असून समाजवादी कसे, आणि इतर विषयांवर चर्चा करायची असेल तर खुशाल वेगळं बोलूया, पण सध्या मला फक्त त्याचं एक वाक्य मांडायचं आहे.

“Talents is a creation of society rather than a gift of nature; it is an accumulated capital of which the recipient is only the guardian. Without society, without education and powerful assistance which it gives, the finest nature would be inferior to the most ordinary capacities even in the rare as where it ought to shine.”- Proudhon

म्हणजे की, ज्याला आपण टॅलेंट म्हणतो ती एक व्यक्तीचे  पराक्रम नसून त्या समाजाची उपलब्धी असते ज्याचा तो व्यक्ती फक्त एक वाहक असतो. सहायता देणारा समाज, शिक्षण देणारा समाज, आणि इतर मदत पुरवणारा समाज, हे सगळं नसेल तर कोणी पण तीसमारखां असू द्या, काहीच होणार नाही.

४. समाजशास्त्र या विषयाचे तीन जनक ज्यांना मानतात त्यापैकी एक म्हणजे मॅक्स वेबर.वेबर हे १९२१ साली मृत्यू पावले, आणि पुढील वर्षी त्यांच्या बायकोने त्यांचे लिखाण “इकॉनॉमी आणि सोसायटी” या शीर्षकाखाली पब्लिश केले, आणि याच पुस्तकाने त्यांना अजरामर केले. त्यात ते काय म्हणतात ते पाहूया,

“Every highly privileged group develops the myth of its natural, especially its blood, superiority. Under conditions of stable distribution of power and, consequently, of status order, that myth is accepted by the negatively privileged strata. Such a situation exists as long as the masses continue in that natural state of theirs in which thought about the order of domination remains but little developed, which means, as long as no urgent needs render the state of affairs “problematical.” But in times in which the class situation has become unambiguously and openly visible to everyone as the factor determining every man’s individual fate, that very myth of the highly privileged about everyone having deserved his particular lot has often become one of the most passionately hated objects of attack.” – Max Weber

म्हणजे की इतिहासात डोकावलं की असं जाणवून येत की प्रस्थापित समाजाने आपले प्रस्थापित स्थान टिकवून ठेवण्यासाठी स्वतःचे वेगळेपण अधोरेखित करीत आम्ही वेगळ्या भारी रक्ताचे आहोत आणि म्हणून आम्हाला सगळं मिळावं असा आव आणत मिथक-बांधणी सुरू करतात.हे मिथक शोषित समाज सुद्धा गिळून घेतो, पण नेहमीसाठी नाही. काही काळाने जेव्हा हे मिथक एका फुग्याप्रमाणे फुगत शेवटी फुटून जाते तेव्हा सर्वांनाच स्पष्टपणे दिसून येतं प्रश्न कधी मेरिटचा नव्हताच, आणि तेव्हा विद्रोहाचा उद्रेक होतो.

५. आता हेच वरील विचार, जे मॅक्स वेबर मांडतात, यांना २१व्या शतकात पुढे नेत, हार्वर्ड मध्ये होणाऱ्या एडमिशनचे नखरे याची पोलखोल करणाऱ्या जेरोम कारबेल कडे पाहूया.

“Transforming hereditary privilege into ‘merit,’ the existing system of educational selection, with the Big Three [Harvard, Princeton, and Yale], provides the appearance if not the substance of equality of opportunity. In so doing, it legitimates the established order as one that rewards ability over the prerogatives of birth. The problem with a ‘meritocracy,’ then, is not only that its ideals are routinely violated (though that is true), but also that it veils the power relations beneath it. For the definition of ‘merit,’ including the one that now prevails in America’s leading universities, always bears the imprint of the distribution of power in the larger society. Those who are able to define ‘merit’ will almost invariably possess more of it, and those with greater resources—cultural, economic and social—will generally be able to ensure that the educational system will deem their children more meritorious.” –   Jerome Karabel

यामध्ये जेरोम सर काय म्हणतात? ते म्हणतात मेरिटचे मिथक याचे दोन मुख्य काम हे आहेत:

अ. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या शोषणाला आणि त्यावरून समृद्ध झालेल्या प्रस्थापितांच्या “ब्लॅक” आर्थिक, सामाजिक, आणि राजकीय मालमत्तेचे “व्हाईट” मध्ये रूपांतर करणे.

ब. समाजातील विषमतेमागील दडलेल्या कारणांना लपवून, सगळे कसे मेरिट आधारे चालते हे दाखवणे. “तुमच्याकडे तीन कारखाने आहेत? तीनपट मेरिटमुळे. तू रस्त्यावर भीक मागतो? तुझ्याकडे मेरिट नाही म्हणून.” हे असं.

तर ही पोस्ट संपली.या भागात कोणाला काही दुखावलं असेल तर कृपया समजून घ्या की यात माझे मत असं जास्त वेगळं कुठे मांडलं नाहीये, मी नुसतं काही वाक्यांचा सार समजून सांगितलाय. खास माझ्यामुळे दुखावून घ्यायचं असेल तर अगोदर लिहिलेले भाग वाचा .

गौरव सोमवंशी

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच ते खालील इतर संस्थांशी संलग्न आहेत.
Fellow – Royal Academy of Engineering, London, Future Leader – British Council, Dalai Lama fellow – Virginia University, Member – African Blockchain Alliance

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*