ब्राह्मणी नरेटीव्ज (narratives) खोडून आपले नरेटीव्ज उभे करावे लागतील

संकेत रायपुरे

स्त्रोत – इंटरनेट

काल एक दोन मित्रांसोबत tvf च्या aspirants आणि तेथील पात्रांबद्दल चर्चा केली. त्यानंतर एकंदरच सिनेमा आणि वेब सिरीज तयार करणारे प्रॉडक्शन हाऊसेस आणि त्यांनी लीड रोल साठी निवडलेले पात्र, त्यांचे सामाजिक स्थान इत्यादींवरही चर्चा झाली.

बॉलीवूडमध्ये वरूण ग्रोव्हर सारखी एखाद दुसरी व्यक्ती सोडली तर जवळपास सगळेच सिनेमातील पात्र आणि त्यांच्या सामाजिक स्थानाबद्दल एका विशिष्ट पद्धतीनेच विचार करतात. त्यांच्या मते लीड रोल हा नेहमी ब्राम्हण किंवा सवर्णच असायला हवा. त्यानंतर व्हिलन एक तर मुस्लिम, किंवा यादव वगैरे. आणि मग असे छोटे छोटे गरीब मजूर, किंवा सबॉर्डीनेट खालच्या लेव्हलचे पात्र दाखवायचे असतील तर ते दलित, आदिवासी वगैरे. मराठी सिनेसृष्टीबद्दल तर काही बोलायलाच नको. त्यांचे सिनेमे म्हणजे ब्राम्हणांनी ब्राम्हणांसाठी काढलेले सिनेमे असतात. त्यात एखादा नागराज येऊन अंतर्बाह्य ढवळून काढण्याचा प्रयत्न करतो पण असा एखादाच. बाकीचे अजूनही तसेच. आता असं स्पष्ट स्पष्ट बोलल्यावर बऱ्याच लोकांना हे जातीवादी वाटतं. ‘नको तिथे जात काढणारे’ to be precise. पण त्यातल्या काही लोकांना आपले मुद्दे पटवून दिल्यावर मान्यही असतात. त्यासाठीच हा प्रपंच. आणि त्यानंतरही ज्यांना खरं काय ते सांगणं म्हणजे जातीवादीच वाटत असेल तर आहोत आम्ही जातीवादी.

असो.

तर मुद्दा हा होता की, tvf ची aspirants असो किंवा दुसरी कुठलीही वेब सीरिज असो, त्यात लीड रोल नेहमीच ब्राम्हणाला मिळतो. एक तर तो शर्मा असेल, किंवा पांडे, गुप्ता, त्रिपाठी वगैरे असेल. ह्या पलीकडे ह्यांच्या लीड रोलचे विश्व जात नाही. ह्यांच्या मते एखादा दलित आदिवासी IAS बनू शकत नाही, किंवा तेवढी मेहनत करू शकत नाही, एखादा दलित आदिवासी IIT JEE पास होऊ शकत नाही, किंवा त्यासाठी करावी लागणारी मेहनत ह्यांना जमत नाही, किंवा एखादा दलित आदिवासी ब्राम्हणांचा जिगरी दोस्त पण असू शकत नाही. त्यांना लीड रोल दाखवायला एक ब्राम्हण आडनावच लागतो. त्यांचे मित्र मैत्रिणी दाखवायलाही परत ब्राम्हण किंवा सवर्णच आडनाव लागतात. त्यांच्या सिनेम्यात किंवा सिरीजमध्ये काही काही scenes सुद्धा ब्राम्हणांना अधोरेखित करताना दिसून येतात.

उदा. Tvf Aspirants मध्ये गरज नसताना ‘अभिलाष शर्मा IAS’ च्या नेमप्लेटवर व्यवस्थित 5, 6 सेकंद फोकस दिल्या जातो.

आता तो scene कुठल्याही हेतूने ठेवला असेल पण subconscious level वर नावाचा खूप फरक पडतो हे सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणजे IAS म्हटल्यावर शर्मा, गुप्ता, गांधी इत्यादीच लोकं मिळत असतील का ह्यांना?

असं अजून बरंच काही सांगता येईल. पण त्यांच्या अशा करण्यामागची कारणमीमांसा लक्षात घेणे कठीण जरी असेल तरी ते आवश्यक आहे. कारण ह्यांचा reach खूप मोठा आहे. आता त्यांनी हे मुद्दाम केलं की नाही हे आपण स्पष्ट सांगू शकत नाही. पण दोन गोष्टींचे अनुमान लावू शकतो. पहिला असा की त्यांनी हे मुद्दाम केलं असेल तर ते एक नंबरचे जातीयवादी आणि नालायक लोकं आहेत आणि दुसरा असा की त्यांनी हे मुद्दाम केलं नसेल तर मग त्यांच्या नेणिवेतच bramhin supremacy आहे. कारण त्याशिवाय प्रत्येक वेळेस मुख्य पात्र फक्त ब्राम्हण किंवा सवर्णच असतात असं होऊ शकत नाही.

चर्चा करताना माझा मित्र(नचिकेत) म्हणाला की tvf ही मुळातच ब्राम्हणांची संस्था आहे. त्यामुळे त्यांचं जवळपास सगळं कन्टेन्ट मध्यमवर्ग, सवर्ण आणि upper caste समाजाला अपील करेल असंच असतं. आणि ते त्यांना आर्थिक दृष्ट्या फायदेशीरही असल्यामुळे ‘आपण कुठे चुकतोय’ वगैरे सारख्या प्रश्नांवर ते जास्त लक्ष देत नाही. हीच गोष्ट बॉलीवूडलाही लागू होते.

पण मग या सर्वांवर आपण काय करायला हवं? तर आमच्या चर्चेतून असं लक्षात आलं की प्रत्येक वेळेस सवर्ण ब्राम्हणांकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. आपल्याला त्यांच्या अप्रुवल ची गरजच पडायला नको. आपण आपले कन्टेन्ट स्वतः तयार करायला हवेत. त्यासाठी नागराज मंजुळे, पा. रणजित, मेरी सिल्वराज, वेत्रीमारन सारख्यांचा आदर्श घ्यावा. त्यांच्या कंटेंटवर सतत चर्चा करून आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा तोच वेळ आपण आपल्या कन्टेन्ट निर्मितीसाठी खर्च करावा. जोवर आपण आपला कन्टेन्ट हक्काने फेकून मारणार नाही तोवर बॉलीवूड, मराठी सिनेमा आणि भारतीय ओ.टी.टी ला लागलेली जातीय कीड बरी होणार नाही.

कुठवर आपण त्यांच्या अप्रुवलची वाट पाहणार? शोषक समूह शोषितांबद्दल काहीतरी करेल ही अपेक्षाच ठेवणे चूक आहे. म्हणून आपल्यालाच पुढे येऊन आपले आपले कन्टेन्ट निर्माण करून, आपले narratives मुख्य प्रवाहात आणावे लागतील. त्याशिवाय पर्याय नाही. आणि हे काम जरी आत्ता कठीण वाटत असलं तरी कधी ना कधी ते पूर्ण होईल ह्याची मला शंभर टक्के खात्री आहे.

जय भीम

(टीप:- मला अपवादांबद्दल बोलायचं नाहीये कारण अपवाद हे अपवादच असतात. अपवादांमुळे देश बदलत नाही आणि जातीय हिंसा थांबत नाही. तुमच्या डोक्यात आलेले अपवाद जेव्हा मुख्य प्रवाह बनेल तेव्हा त्यावर बोलू.)

संकेत रायपुरे

लेखक पुणे येथील रहिवासी असून त्यांचे शिक्षण BA (English Literature) असून सध्या ते MA (Political Science) चे शिक्षण घेत आहेत.

3 Comments

  1. जय भीम मित्रा.खुप सुंदर लेख लिहिला आहेस.तुझ्या लेखातील मुद्दा अत्यंत रास्त आहे.बाॅलीवुड असो मराठी सिनेसृष्टी असो किंवा वेबसिरीज असो, या सर्वांना जातीयवादाची कीड लागली आहे.त्यामुळे समाजाचे आणि देशाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे या किडीवर आंबेडकरी औषधींची फवारणी केलीच पाहिजे.आपल्या समाजातील कलाकार मेनस्ट्रीमध्ये येऊन आपला ठसा उमटवत आहेत, ही आनंदाची बाब आहे. अपेक्षा आहे की लवकर आपला समाज, स्वतःचा नेरेटिव्ह निर्माण करण्यात यशस्वी होईल. तुझी लेखनीही सतत ब्राह्मणशाहीविरोधात लढत राहो, हीच सदिच्छा.

  2. Brother you are right I got your point. This brahmical system has no need to mention our problems our view point for that we need to stand, we need to create our own content and most importantly we need to raise our financial standards. Our youth should be raise up as a business tycoons then we can achieve this.

  3. Same tvf produced kota factory in 2019, pandey as the iit aspirant. For them only pandey or sharma can be ‘meritorious’ or ‘deserving’. Others especially sc/st cannot achieve ‘merit’ till the end. Need to get rid of merit.

Leave a Reply

Your email address will not be published.


*