आमच्या मेहनतीला ‘सवयीचं’ लेबल कोण लावतं?

प्रवीण उत्तम खरात

SC,ST,OBC च्या जागी कामगार म्हणून ब्राह्मण असता आणि अश्या ठिकाणी जिथे जीव जाण्याची पक्की खात्री आहे जस मुंबईतील गटार, शत्रू देशाच्या सीमेवरील सैन्य किंवा ह्यापेक्षा साधं उदाहरण म्हणजे कसलीही सुरक्षा न घेता चालवले जाणारे रासायनिक कारखाने, १२ तास उन्हात दगड फोडणारे आणि इमारत,बोगदे, बांधणारे, तर असली काम करायच्या आधीच बामनांनी घाबरून पुन्हा आर्क्टिकचा रस्ता धरला असता ह्याबद्दल मला तिळमात्र शंका नाही.आम्हाला जीवन जगण्यासाठी मृत्यूला मिठी मारावी लागते आणि ह्या बामणाना मृत्यू पासून पळण्यासाठी संधी शोधावी लागते. आम्ही व्यवसाय सुरु करण्यासाठी घाबरत नाही. आम्हाला माहित असत आपला व्यवसाय आयुष्यभर खूप जिद्दीने केला तरी पोटा पाण्यापूरता सुद्धा पॆसा साठणार नाही आणि साठवला तरी इथली बामणी भूत तो विविध मार्गानी चोरून घेतील त्यामुळे आम्ही आयुष्य जगण्यासाठी महिनाभर पैश्याची वाट बांधण्याची रिस्क घेतो, पण व्यवसाय करण्याची रिस्क घेत नाही. आमच्या प्रत्येक निर्मितीला जाणीवपूर्वक दुर्लक्षित केलं जात किंवा कवडीमोल किमतीत खरेदी केलं जात, आमच्या मेहनतीला सवयच लेबल लावलं जात. हे कोण करतय हे कळून सुद्धा बामनांच गुणगान करावं लागत कारण मानसिक गुलामी सहजा सहजी कळून येत नाही. मनाच्या बेड्या तोडणं सोप नसत कारण आमच्यात ईच्छाशक्ती निर्माण होऊच नये ह्याचा योग्य बंदोबस्त बामणी व्यवस्थेने केलेला आहे.

लहानपण,शाळा,खेळ,महाविद्यालय,कार्यालय,कट्टे, बाजार, कोर्ट,पोलिसचौक्या प्रत्येक ठिकाणी मानसिक आघात करून आमचं मानसीक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो.

फुले,शाहु,आंबेडकर वाचल्याविना हे कळणं सोप नाही. काही गुलामांची आयुष्य आभासी आनंदवनात संपतात पण शत्रू कळत नाही. तणाव आमच्या पाचवीलाच पूजला आहे त्या तणावात तावून सुलाखून आम्ही चालती बोलती यंत्र बनतो, ज्याचा उपयोग करून ह्यांची पोट आणि मन भरतात. संघर्ष हा आमच्या जीवनाचा पर्यायी शब्दच बनलेला आहे. कुत्र्याच्या डोळा फोडला तर प्राइम टाईम चालवणारी चॅनल आमच्या वस्त्या जाळल्या त्यात जिवंतपणी होरपळून मरणारी मुलं असली तरी दुर्लक्ष्य करतात. माणसासारख्या माणसांना धर्माच्या नावाखाली माणूस न समजणाऱ्या जमाती गुर्जी, श्री,भूषण, लोकमान्य, स्वातंत्र्यवीर,देशबंधु संबोधन लावण्याची हिम्मत का करू शकतात ? मिशी ठेवली,घोड्यावर बसला,चप्पला घातल्या,नवीन कपडे घातले, गाड्या घेतल्या,इतकच काय जयभीम बोलला तरी असुरक्षित कोणामुळे आणि कशामुळे वाटत हा विचार करायला हवा. इथं काहींना जात चोरावी लागते तर काहींना जात दाखवण्याचा अभिमान वाटतो तो का ? हे प्रश्न इथल्या व्यवस्थेला आणि स्वतःला आता तरी विचारलेच पाहिजेत.

लिहतं व्हा!

प्रवीण उत्तम खरात

लेखक IT Consulting Firm मध्ये  IT Executive म्हणून कार्यरत आहे आणि “बुद्ध फुले शाहू आंबेडकर पेरियार”  विचारांचे अनुयायी आहेत.

1 Comment

  1. जर वर्ण ‘व्यवस्था’ आहे, जाती ‘व्यवस्था’ आहे, याचा अर्थ धर्म बदलुन सगळी व्यवस्था बदलुन जाईल. बुद्ध धम्माचे दार सगळ्यांसाठी ओपन आहे पण हुशार/चालाक बहुजन धम्म न घेता सत्यशोधक होतो, शिवधर्मी होतो. धम्म बाबतीत चर्चा केली की पोटदुःखी सुरू मग.

    मला सवर्णांपेक्षा बहुजन लोकं धोकादायक वाटतात कारण बहुजन आतमधले शत्रु आहेत, ज्यांना आपण शत्रु मानत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.


*