तू जय भीम आहेस वाटत तर नाही…

स्वप्नील गंगावणे

तू जय भीम आहेस वाटत तर नाही..
असे शब्द ऐकायला मिळतात जेव्हा एक बौद्ध चांगले कपडे घालून एखाद्या नवीन उच्च जातीच्या मित्रा समोर जातो…

माझ्या सोबत ही घडलंय दहावी पास झाल्यावर कॉलेजात गेल्यावर..,
तेव्हा मला अभिमान वाटायचा..
स्वतःला भारी समजायचो..
..असं वाटायचं की हे लोकं माझं कौतुक करताहेत आणि त्या वेळेस एवढं काही समजत पण नव्हतं..

पण आता ७ वर्षांनंतर जेव्हा त्या मित्रांनी बोललेल्या गोष्टी आठवतात तेव्हा लगेच डोक्यात येते की हा तर जातीवाद आहे..,
आणि स्वतः ची लाज वाटायला लागते कि त्या गोष्टींना कौतुक समजून स्वताला हिरो समजायचो..आणि मग नंतर प्रत्येक वेळी बाहेर कुठे त्या मित्रांसोबत जायचे ठरले कि डोक्यात एकच विचार असायचा की आपण कोण आहोत ही गोष्ट लपवायची आडनाव नाही सांगायचे, कुठे राहतो ते नाही सांगायचे वगैरे वगैरे..

कळायला लागल्यावर एक दिवस विचार केला गरीब लोकं तर सगळ्याच जाती धर्मात असतात.. त्यांना कोणी का विचारत नाही की तू तर या अमुक तमुक जातीचा वाटत नाही…

मग ही विचारधारा फक्त आमच्यावरती
(बौद्धांवरतीच) का..?
तुझं घर चांगलं मोठं.. राहतो चांगला, कपडे.., गाडी.., फोन..या गोष्टी तुझ्याकडे-
आहेत.., म्हणून तु बौद्ध वाटत नाही..
याचा अर्थ काय समजायचा ?

डोक्यात आता विचार येतो कि या उच्च जातीय लोकांना आपण “दलित” आहोत हे दाखवण्यासाठी काय करावं..?
गळ्यात मडके पाठिला झाडू घालून फिरावं..?

काय करावं ?
कि आपण बौद्ध आहोत हे त्यांना कळलं पाहिजे…
यांच्या मानसिकते, विचारधारे नुसार बौद्धांनी चांगले कपडे घालावे नाही..
चांगले कपडे घातले कि ते तुम्हाला कोंप्लिमेंट देतील अरे.. तू तर बौद्ध आहे वाटतंच नाही..
आणि याच कारणांमुळे नविन हुडबुद्धी बौद्ध समाजातील किशोर वयातील काही मुलं स्वताला उच्च जातीय दाखवण्याचा प्रयत्न करतात..
आणि मी बौद्ध आहे हे लपवण्याचा..!

अशी आयडियोलोजी बनवून ठेवली आहे इथल्या जातियवादी लोकांनी..
यांची अशी मानसिकता आहे की ज्या वेळेस एखादा बौद्ध चित्रपटांत हिरो म्हणून आलाच तर हे चित्रपट बघायला नकार देतील…
मग तो कितीही देखणा आणि गुणवान असला तरीही..
यांच्या मते बौद्ध फक्त खालचे काम करू शकतो.. हिरो बनला तर कोंप्लिमेंट तयार
अरे तू तर बौद्ध आहे पण वाटत नाही.

आता जेव्हा या आठवणी येतात असं वाटतं आम्हाला या गोष्टी तेव्हा बोलायला का नाही सुचल्या.. का आम्हाला आमच्या बुद्धिस्ट असण्याचा अभिमान वाटावा हे नाही शिकविले
प्रत्येक आंबेडकरवादीने आपण आंबेडकरवादी आहोत हे अभिमानाने सांगायला हवे..
मी तर आता वाट बघून आहे की कोणी मला म्हणावं अरे तु बौद्ध वाटत नाही..
६ महिने झाले मुद्दाम आणि अभिमानाने माझ्या फोनची कॉलरट्यून मी बाबासाहेबांचे गाणं ठेवलेले आहे.. आणि कायम राहील..
हे जे मित्र होते हे मोजके होते..
चांगले मित्र भरपूर आहेत ज्यांचा सोबत माझी मैत्री जातीच्या खुप पलिकडे आहे..
जिथे तु अमुक वाटत नाही तमुक वाटत नाही..
या गोष्टींना थोड पण थारा नाही…

जो मित्र तुम्हाला जातीच्या चष्म्यातून बघतो..
त्याला लांबूनच हाथ जोडा..

जय भीम

स्वप्नील गंगावणे

लेखक औरंगाबाद येथील रहिवासी असून वित्तीय सेवा संस्थेमध्ये टीम लीडर आहेत.

4 Comments

  1. जय भीम भाई
    जबरदस्त लेख आहे असेच लिहित रहा.

  2. Very nice!! 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

Leave a Reply to Sumit Bramhane Cancel reply

Your email address will not be published.


*