स्वप्नील गंगावणे
“ब्राह्मणवादाला मी विरोध करतो पण ब्राह्मणाला नाही”,
हे वाक्य इतकं फेमस आहे ना आंबेडकरवादी समाजा मध्ये की त्याचं नवल वाटतं !
या खोटारड्या विधानाला खाली पाडण्यासाठी खूप उदाहरणे आहेत !
जसं गुणवंत भाईंच्या एखा लेखात मी वाचलं होतं कि जेव्हा कोणी हे वाक्य बोलतं ना “माझा ब्राम्हणवादाला विरोध आहे ब्राह्मणांना नाही”
ते या सारखंच आहे की मी डेंग्यू ला विरोध करतो पण मच्छर ला नाही. असे शेकडो उदाहरणे देता येतील “मला चिकन आवडत पण कोंबडी नाही” “मला संविधान आवडत पण मी ते मानणार नाही” अशी कित्येक उदाहरणे देता येतील.
असले तोंडातून इतिहास न माहिती असताना डॉयलॉग मारणं म्हणजे मूर्खपणा ! अरे कुठून ऐकून आलात तुम्ही हे सर्व ?
की माझा ब्राम्हणवादाला विरोध आहे ब्राह्मणाला नाही ब्ला ब्ला ब्ला !
मुळात जो व्यक्ती जेव्हा मी ब्राम्हण असल्याचा क्लेम करतो तेव्हाच तो त्याच्या जातीचा माज दाखवत असतो हे समजून घ्यायला हवं.
त्याला का गरज पडती आहे स्वतःला ब्राम्हण सांगायची ?
तो स्वतःला माणूस नाही म्हणवून घेऊ शकत का ?
ब्राम्हण ही उपाधी स्वतः ब्राह्मणांनी स्वतःला दिलेली आहे.
आता त्या लिस्ट मध्ये त्यांनं स्वताला टॉप वरती ठेवलं आणि मग बाकीच्या समाजाला दुय्यम स्थान.
ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य, शूद्र आणि किंवा त्याही खाली अतिशुद्र.
ज्या प्रमाणे ब्राह्मणांनी हा जातीचा थर रचला त्याच सोबत त्याने कर्माचा थर सुद्धा रचला.
पूर्ण थरा बद्दल चर्चा करायची आपल्याला गरजही नाही आणि तेवढा वेळही नाही. आपण फक्त बहूजनां सोबत कसा अन्याय झाला ते बघू.
ब्राम्हणानी स्वतःला उच्च स्तरावर ठेवले आणि शुद्रांना सगळ्यात खालच्या स्तरावर जाती नुसार पण ! आणि कर्मा नुसार पण !
त्यामुळे हाच भाग समजून घ्या की जेव्हा एक व्यक्ती मी ब्राम्हण असल्याचा क्लेम करतो म्हणजे त्यावेळी तो स्वतःला उच्च सांगतो.
म्हणजे याचा अर्थ असा की तो ब्राह्मण आहे म्हणून उच्च आणि तुम्ही सो कॉल्ड शुद्र आहात म्हणून खालच्या जातीचे.
तुम्ही कितीही नकार द्या की तुम्ही खालच्या जातीचे नाही आहात पण जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती मी ब्राम्हण आहे असं म्हणेल तेव्हा तुम्ही आपोआप खालच्या जातीचे होत असता.
कारण तो स्वतःला ब्राम्हण म्हणतो आहे म्हणजेच उच्च जातीने
ब्राम्हणवाद करणं म्हणजे ओपनली जातिवाद करणे नाही होतं !
ब्राम्हणवाद हा असा व्हायरस आहे ज्यात तुमची पुर्ण जिंदगानी निघून जाईल, पण तुम्हाला कळणार नाही की तुम्ही त्या व्हायरस चा शिकार झाला आहात ! आणि या व्हायरस मुळेच आज या देशाची परिस्थिती विकट आहे ! ब्राह्मण हा या परिस्थितीतही खुश आहे कारण वर्चस्व त्याचं आहे ! ज्यांनी या व्हायरसला बढावा दिला ते सध्या खुप धोकादायक आहेत ! अर्थात ब्राम्हण धोकादायक आहेच !
पण हा जो भरकटलेला समाज आहे त्याला योग्य मार्गावर आणणं महत्त्वाचं.
माझा एक मित्र मला बोलला की आपला विरोध ब्राम्हणवादाला आहे ब्राम्हणाला नाही तेव्हा खरंच खूप हसू आलं !
त्याला समजावून सांगण्यात तेव्हढी मेंदूत शक्तीही नव्हती आणि मनधरणी ही !
पण माझे काही प्रश्न आहेत त्या मित्राला !
किती ब्राम्हणांनी ब्राम्हणवादाला विरोध केला ?
किती ब्राम्हण आरक्षणाला समर्थन देतात ?
किती ब्राम्हणांनी मनुस्मृती जाळली ?
किती ब्राम्हणांनी देवाचा त्याग केला ?
किती ब्राम्हणांवर अत्याचार झाला ?
किती ब्राम्हणांच्या भिंतीवर बाबासाहेब आहेत ?
किती ब्राम्हण बौद्धांवर अन्याय झाल्यावर रस्त्यावर उतरले ?
असे हजारो प्रश्न मी विचारू शकतो.
पण मुळात मला ब्राम्हणांनी आपल्या साठी काय केले हे जाणून घेण्यात बिलकुल इंटरेस्ट नाही !
ब्राम्हण समाज अत्याचार करतो आणि त्याच समाजातला सो कॉल्ड चांगला ब्राम्हण आपल्या मदतीला येतो आणि बहूजन समाज त्याला जवळ करतो किती मुर्खपणा आहे हा..
अरे बहूजन भावा तू किती पण वेळेस पडला तर तुला उचलायला ब्राम्हण नो डाउट येईल पण ज्यानी तुला धक्का मारून पाडलं त्याला एक शब्दही मात्र हा चांगला ब्राम्हण बोलणार नाही.
जर एखादा खरंच चांगला ब्राम्हण असेल तर तो तुला उचलण्या ऐवजी, त्या धक्का मारून पाडणाऱ्या ब्राम्हणाचा कॉलर पकडेल !
पण दुर्दैव असं कधीच होणार नाही.
ब्राम्हणाची सगळ्यात मोठी मदत ही असेल की तो आंबेडकर चळवळी मध्ये नाही आलेला बरा.
आपले लोकं खरंच खूप इमोशनल आहेत.
एखादा ब्राम्हण येऊन आपल्याला साधा जय भीम सुद्धा बोलला तर आपण त्याला डोक्यावर घेऊन मिरवणार.
जसं कन्हैया कुमार ला मिरवलं.
ट्वीटरवर एक अकाऊंट आहे दलित शेफ नावाचं त्याचं एक ट्विट बघितलं होतं ज्यात त्यानं लिहीलं होतं की
“जेव्हा तुमच्या सोबत एखादा ब्राम्हण असेल आणि तो तुमच्या सोबत अगदी आनंदी असेल, तर समजून जा तुम्ही काही तरी चुकीचं केलंय म्हणजे दुसऱ्या भाषेत तुम्ही ब्राम्हणाच्या मना सारखं वागलात ! या छोट्याश्या वाक्यात खूप काही आहे !
या नेणीवेला उलगडायला हवं !
शुद्ध करायला हवं !
तुम्हाला नेहमी ब्राम्हण हा त्याच्या ग्रंथातील चांगल्या श्लोकाचं गुणगान करताना दिसेल.
पण जो श्लोक समाजाला घातक आहे त्यावर टिका करताना कधीच दिसणार नाही, मग तो कितीही चांगला ब्राम्हण असो.
आणि दिसला जरीही तो फक्त टिका करेल त्या श्लोकाला बदलण्यासाठी एकही कार्य करणार नाही !
ब्राम्हण हा नेहमी ब्राम्हण राहील !
आणि बाय द वे ब्राम्हण आणि ब्राम्हणवाद यात फरक काय आहे?
एक खुलेआम ब्राह्मणवाद करतो आणि एक ब्राम्हण नावातच ब्राम्हणवाद करतो.
ॲट दी एन्ड ऑफ दी डे तो शेवटी राहतो ब्राम्हणच.
हा गुंता समजून घ्या.
टाईम लागेल पण समजून घ्या.
लोकं खुप उदाहरणे देतात की बाबासाहेबांचे कित्येक सहकारी ब्राम्हण होते !
अरे पण त्याच बाबासाहेबांनी असं सुद्धा लिहीलय की दोन प्रकारचे ब्राम्हण असतात, एक लिबरल ब्राम्हण आणि दुसरा कन्सरवेटीव्ह ब्राम्हण ज्या एकाच शरीराच्या दोन बाजू असून जेव्हा एक बाजू अडचणीत असते तेव्हा दुसरी बाजू तिच्या मदतीला धावू येते. आणि दोन्ही ब्राम्हण सारखेच धोकादायक आहेत.
तुम्ही बाबासाहेबांनी जे सांगितलंय ते ऐकायचं दिलं सोडून आणि थोडेफार ब्राम्हण बाबासाहेबां सोबत गेले तर त्या ब्राम्हणांचं कौतुक करत आहात.
म्हणजे शेवटी तिथेही ब्राम्हणांचच गुणगान का ?
हा विषय खुप खोल आहे या वरती पुर्ण पुस्तक छापल्या जाऊ शकतं ! जेवढं समजवण्याचा प्रयत्न होता तेवढा केला इतकं वाचून पण कोणी नाही सुधारणार तर आपलं दुर्दैव आहे !
पण या विषयावर नक्कीच अजून लिहेन !
आणि एक शेवटच उदाहरण
चांगला ब्राम्हण तुम्ही कधीही बघा जातिवाद नष्ट झाला आहे हे दाखवण्यासाठी तो एक वाक्य नेहमी बोलतो,
की मी ब्राम्हण आहे पण माझे भरपूर मित्र बुद्धीस्ट आहेत मी त्यांच्या घरी जातो आम्ही सोबत जेवतो वैगरे..
आणि बहूजन समाज या वाक्याचा देखिल गौरव करतो !
तो चांगला ब्राम्हण एका बौद्धाच्या घरी जाऊन जेवला तिथं त्याचं मोठेपण नसून आपलं मोठेपण आहे !
की आपण यांची एवढी पिढ्यानं पिढ्याची गुलामी विसरून यांना घरी जेवायला बोलवतो !
आपण त्याला एका मित्राच्या नात्याने जेवायला बोलवतो आणि तो ब्राम्हण मोठेपणा दाखवण्यासाठी जेवायला येतो..
की बघ बाबा तू बौद्ध असूनही तुझ्याघरी जेवायला आलो!
अरे तो सो कॉल्ड चांगला ब्राम्हण तुझ्या घरी जेवला तर कोणता मोठा असा तिर मारला ?
आणि बौद्धांच्या घरी जेवायला जाणं म्हणजे त्यात काय वेगळं आम्ही पण माणसंच आहोत ना.. त्यामुळे आमच्या घरी जेवलो यात सांगायसारखं काय ?
आम्ही काय एलियन वैगरे आहोत का ?
आमच्या घरी जेऊन तुम्ही मोठं कार्य केलं ?
सांगायचा अर्थ असा की ब्राम्हण आपल्या घरी जेवला हे सांगणं पण एक जातिवाद आहे !
त्याला आपण चांगूलपणाचा वाव देऊन गौरव करतो !
जेवायला कोणी कोणालाही बोलवा हा ज्याचा त्याचा भाग पण एक गोष्ट लक्षात घ्या !
एका माणसाच्या घरी दुसरा माणूस जेवायला आला एवढाच त्याचा निष्कर्ष असतो !
त्यात जात नष्ट झाली असे पुर्णपणे म्हणता येणार नाही !
स्वप्नील गंगावणे
लेखक औरंगाबाद येथील रहिवासी असून वित्तीय सेवा संस्थेमध्ये टीम लीडर आहेत.
- जात कुठल्या चित्रपटात नसते? - December 5, 2021
- आपली लढाई फक्त पक्षापर्यंत मर्यादित नाही, आपली लढाई ही इथल्या ब्राह्मणवादा विरूद्ध आहे - July 7, 2021
- “दलित” ही तुमची ओळख कशी असू शकते? - June 12, 2021
खूप काही शिकलो सर! मस्त लेख