तू वळू आहेस बघ आमचा!

वैष्णवी सुनील बगाडे

मी सकाळी गाढ झोपेत असताना
बाप रानात गेलेला असतो…
परत घरी आल्यावर
हळूच म्हणतो आंधळे
हातातले काटे काढून दे
मी काटे काढताना बोलतो
तू वळू आहेस बघ आमचा…
मी हळूच डोळे बारीक करून बघायला लागल्यावर,
पुढ म्हणतो कसा
ज्याला भारतभर, जगभर शिकण्यासाठी सोडला आहे मोकळा असा वळू आहेस तू आमचा
शिक जेवढ शिकायचे तेवढ शिक,
परत म्हणतो कसा
ह्या वळूच्या शिक्षणासाठी जमीन पण विकायला तयार आहे तुझा बाप…
मी बोलले बाप जमीन विकतो तो फक्त पोरीच्या लग्नासाठी,
तर म्हणतो कसा तू थोडी माझी पोरगी आहे,
तू तर वळू आहे शिकण्यासाठी सोडलेला…
पण हा वळू शिकून मोठा अधिकारी झाला पाहिजे बास…

वैष्णवी सुनील बगाडे

लेखिका पुणे येथील रहिवासी असून त्यांचं शिक्षण MA (Medieval History), JNU असे आहे.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*