शेरणी: ब्राह्मणी अनैतिकतेचे आणखी एक उदाहरण!

राहुल पगारे

रात्री मसुरकर दिग्दर्शित, विद्या बालन अभिनयीत शेरणी चित्रपट बघितला. टिपिकल हिंदी सिनेमा स्टाईलपेक्षा डायरेक्टर वेगळं काय बनवतो (आधीचा न्युटन) म्हणून आवर्जून बघितला. सगळं वरवर छान मांडलं असं दिसतं असताना, ते मांडताना अतिशयोक्तीचा कळस रचला. वन्य प्राणी, जंगल, पर्यावरण ही सगळी ecosystem व त्याचं महत्त्व शहरी भागातुन आलेले saviour/स्वं घोषित रक्षक प्राध्यापक, वन अधिकारी आदिवासीना समजावून सांगतात.

म्हणजे “प्रस्थापित ब्राह्मणी शहरी जमात” विकासाच्या नावाखाली जंगल उध्वस्त करणार, आदिवास्यांना जंगलाच्या बाहेर काढणार आणि परत याच प्रस्थापित ब्राह्मणी शहरी जमातीतुन वन्य जीव व जंगल वाचवायला शहरी saviour येतात !! धन्य आहे लेखक, डायरेक्टर ! वास्तव एवढं विकृत करुन कसं मांडू शकतात ही लोक ? आणि परत वेगळ्या विषयावर कृती घेऊन आल्याची वाहवा मिळवायची, बक्षीसं, शाबासकी मिळवायची ! अवघडै.
आपण ब्राह्मणी व्यवस्थेचे शहरी जमात पर्यावरण, जंगल ecosystem उध्वस्त करुन आदिवासीनां जंगलाच्या बाहेर settlement करणार, खानी मोठ्या कॉर्पोरेटला देणार, जंगलतोड, नद्या, नाले दूषित करणार या सगळ्या पर्यावरणाची साखळी तोडुन त्याला उध्वस्त करणार त्यांची विलनगिरी, त्यांची विकृत भूमिका पडद्यावर मांडण्याऐवजी आदिवासी कसे घाबरुन किंवा राजकारणाला बळी पडून वन्य प्राण्यांच्या जीवावर बेततात असली अफलातून मांडणी करुन दोष मान्य करण्याऐवजी आदिवास्यांना अज्ञानी क्रुर ठरवुन त्यांना पर्यावरण संतुलनाचे धडे देणार ?

आर्टीकल १५ जसा दलितांच्या समस्यांची विकृती मांडणी करुन शहरी बामणालाच परत saviour बनवुन दाखवलं तसंच शेरणी मधे आदिवासी, आदिवासी नेते यांना अज्ञानी, संधीसाधू दाखवुन ब्रामणी शहरी जमातीलाच saviour हितरक्षक म्हणून दाखवलं. शोषण प्रवृत्तीची रिव्हर्स मांडणी करण्यात ब्राह्मणांना जराही नैतिक लाज वाटत नाही. हे त्याचं मूर्तीमंत उदाहरण.

राहुल पगारे

लेखक औरंगाबाद येथील रहिवासी असून आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक – कार्यकर्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*