विश्वदीप करंजीकर
सर्व संस्कार अनित्य आहेत. म्हणजे या जगात शाश्वत असे काहीच नाही. प्रत्येक गोष्ट ही सातत्याने बदलत राहते. कणाकणाला तिचे स्वरुप बदलते. फक्त ‘बदल’ हेच शाश्वत आहेत. म्हणजे ‘सातत्याने होणारे परिवर्तन हेच शाश्वत आहे’ Only change is constant.
बुध्दाने ‘अनित्यता’ हा महान सिध्दांत सुशीमला सांगितला होता. त्यात ते म्हणतात की ‘रुप, वेदना, संस्कार, विज्ञान हे सर्व अनित्य आहेत.’ अनित्य आहे म्हणजे काय ? ज्याचा उदय आणि लोप होतो ते अनित्य. पंचस्कंध अनित्य आहेत. पंचस्कंध म्हणजे उदय, वृध्दी, सातत्य, वृध्दत्व आणि मरण या अवस्था.
अनित्य म्हणजे वस्तुमात्रातील होणारे बदल, परिवर्तन, विपरिणाम आणि अन्यथाभाव(मूळ स्थितीत पूर्ण बदल होणे किंवा मूळ अवस्था टिकून न राहणे).
संस्कार म्हणजे धारणा असू शकते. किंवा ज्यापासून आपलेली मतं (beliefs) धारणा बनलेली असतात अशा गोष्टींना संस्कार म्हणतात. संस्कार म्हणजे आपण आपल्या चित्ताला जसे बनवतो किंवा त्याला जसे वळण लावतो ते संस्कार म्हणता येईल. त्या संस्कारांमुळे दु:ख निर्माण होतं. म्हणून संस्कारांचा निरोध प्रज्ञेच्या आधारे घडवून आणण्यासाठी तथागत गौतम बुध्द आग्रह धरतात. महापरिनिर्वाणापूर्वी सुध्दा अंतिम वाणीमध्ये सर्व संस्कार नाशवंत आहेत असं म्हणाले होते.
प्रज्ञा विकसित करण्यासाठीचा मार्ग विपश्यनेचा आहे असं मानलं जात. विपश्यना म्हणजे जीवन जगण्याची कला आत्मसात करणे होय. आपल्याकडे विपश्यना म्हटल की दहा दिवसाचा कोर्स एवढचं आकलन आहे. बुध्दाने आणि संघाने दिलेल्या एकूण ८४००० उपदेशांच्या आधारे व जागृत झालेल्या प्रज्ञेच्या जोरावर नीतीमान जीवन जगण्याची कला विकसित करणे म्हणजे विपश्यना.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अनित्यतेच्या सिध्दांताला तीन पैलू आहेत.
१. अनेक घटकांनी बनलेल्या वस्तू अनित्य आहेत.
२. व्यक्तिगत रुपाने प्राणी अनित्य आहेत.
३. प्रतित्यसमुत्पन्न वस्तूंचे आत्मतत्व अनित्य आहेत.
बुध्दांचे हे चिंतन २५०० वर्षापूर्वीचे आणि बाबासाहेबांचे हे चिंतन अल्बर्ट आईनस्टाईनच्या E=mc^2 च्या समकालीन आहे. या Equation ने जगाचे चक्र पुन्हा नव्याने फिरवले. विज्ञानाचा आणि धम्माचा संबंध घनिष्ठ आहे. ज्याला जगाची नवनिर्मिती करयाची आहे त्याच्यासाठी ते क्रांतीचे सूत्र आहे. चिंतनात जे आहे ते लिहताना खूप मर्यादा पडतात. बऱ्याच गोष्टी लिहताना विसरतात. प्रत्यक्ष चर्चेमध्ये खूप विस्ताराने आपण अधिक सम्यक चर्चा करु शकतो.
~~~
विश्वदीप करंजीकर: गव्हर्नमेंट इंजिनीअरिंग कॉलेज येथे विसिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहेत
- आंबेडकरी गीतांचे स्वरांकित विद्यापीठ प्रतापसिंगदादा बोदडे - June 10, 2022
- महिला प्रश्न जितका माझ्या आई बहिणीचा आहे तितकाच तो माझ्या बापाचाही आहे - March 8, 2021
- बिजनेस पार्टनर्स हवे आहेत - November 26, 2020
Hearty congratulations first of all to Vishwadeep for writing in a very simple language and correlating Buddhism to Science. The article is very precise and Nicely written. I would suggest you if u give references for the quotes that you have used it will be beneficial for us to go through those books.
Once again I congratulate you and keep up the good work going…😊Jaibhim🙏🏻
अनित्यतावाद बुद्धांनी थोडक्यात असा सांगितला .
उदय व्यय हे शाश्वत आहे,हा निसर्ग नियम ,जे उत्पन्न होते ते नष्ट होते .प्रत्येक गोस्ट तरंगापासून बनली आहे .तरंगाचा गुणधर्म वयधम्म संखार आहे .
सब्बे सांखरा अनिच्चती,यदा पंयाय पस्सती
अथ निबिती दुःखे ,ऐच मग्गो विशुद्धीयां
सर्व संस्कार अनित्य आहेत ,जेंव्हा असे प्रज्ञापूर्वक बागतो
तेंव्हा दुःखापासून मुक्त होत जाते ,हाच विशुद्धीचा मार्ग आहे