बाबासाहेबांचा संविधान सभेमधील प्रवेश ते १९५२ ची सार्वत्रिक निवडणूक : सत्य आणि विपर्यास

जय

काही काँग्रेसी आणि संघी तथाकथित अर्थतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीत घेण्यासाठी गांधी,नेहरु आणि पटेलांनी मदत केल्याची पुडी सोडतात यावर मी गेल्या आठवड्यात लाईव्ह येउन हा कसा खोटा प्रसार आहे हे सांगितले, तसेच जगजीवनराम यांनी कशी बाबासाहेबाना मदत केली असे ही काँग्रेसी पेरतात,त्याला ही मी पोस्ट लिहून सगळे मुद्दे पुराव्यानिशी खोडून टाकले होते, आरएसएस ची चड्डी गँग सुद्धा बाबासाहेबांनी संघ कार्यालयाला भेट दिली, त्यांनी जनसंघ सोबत युती केली, गोळवलकर-आंबेडकर भेटीमध्ये संघावरची बंदी उठावी असे बाबासाहेबांना वाटत होते, वगैरे सारख्या काल्पनिक गोष्टी अतिरिक्त गांजा सेवन करून पेरत असतात,त्यांना ही आपण उघडे पाडले आहे, गांधी,नेहरू,पटेल,जगजीवनराम झाले गोळवलकर, ठेंगडी झाले आता यांनी श्यामाप्रसाद मुखर्जीना पुढे करत, त्यांनी 1952 च्या निवडणुकीत बाबासाहेबांना निवडून आणल्याची खाज यांच्या सर्वांगाला सुटली आहे, हीच री 2014 साली दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी ओढली होती, तिलाच काही संघी पुन्हा उगाळून ठळक करण्याचा प्रयत्न करतायेत,तुम्ही किती ही एकेक करून माणसे समोर आणा आणि त्यांचा काल्पनिक संबंध बाबासाहेबांशी जुळवायचा प्रयन केला तरी सत्य काय आहे हे पुराव्यानिशी मांडून तुम्हाला उघडे नाहीतर नागडे सुद्धा आम्ही दरवेळी करत राहू. आपला इतिहास आणि प्रत्येक घटना बाबासाहेबानी लिहून ठेवल्यात,त्यामुळे कोण्या तथाकथित बाबा पुरंदरे सारखं खोटा इतिहास पसरवून किंवा मनाचा काल्पनिक इतिहास घुसवून आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊ अशा भ्रमात राहू नका.

बाबासाहेबांचा घटना समितीत प्रवेश म्हणजेच सरदार पटेलांनी म्हटल्याप्रमाणे बाबासाहेबाना फक्त दारे-खिडक्या नव्हे तर तावदान ही बंद केले होते, काँग्रेसने लबाडी करून बाबासाहेब जेथून निवडून आले तो बहुल हिंदू भाग फाळणीच्या वेळी पाकिस्तान मध्ये टाकला,त्यामुळे बाबासाहेबाना नाईलाजास्तव राजीनामा द्यावा लागला, त्यावेळी बाबासाहेबाना बंगाल मतदार संघातून निवडणूक जिंकण्यासाठी मदत केली ती नमोशुद्र समाजाचे नेते जोगेंद्रनाथ मंडल यांनीच. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा काहीही संबंध नव्हता, पुढे नेहरूंनी त्यांची बहीण विजया लक्ष्मी पंडित यांना घटना लिहिण्यासाठी विचारणा करायला लंडनला ख्यातनाम वकील विल्यम आयव्हर जेनिंग यांच्याकडे पाठवले, तेथून ही नकार आल्यावर, शेवटी बाबासाहेब आंबेडकरांना बिनविरोध घटनासमितीवर निवडून आणावे लागले. बाबासाहेबांचा मंत्रिमंडळात प्रवेश झाला,त्याच्या नंतर हिंदू महासभेच्या श्यामाप्रसाद मुखर्जी यांना खुद्द काँग्रेसने मंत्रिमंडळात घेतले हे “अधोरेखित” करण्यासारखे वास्तव आहे.

१० ऑगस्ट १९५१ ला बाबासाहेबांनी नेहरूंना पत्र लिहिले की, हिंदू कोड बिल १६ ऑगस्टला सादर करण्यात यावे जेणेकरून त्यावरील चर्चा सप्टेंबरपर्यंत समाप्त होईल. परंतु काँग्रेस पार्टीत मतभेद असल्यामुळे बिल १७ सप्टेंबरला सादर करण्याचे ठरले. हिंदूमहासभेचे नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी व पं. मालवीयांनी हिंदू कोड बिलाचा विरोध केला. पं.कुंझरू व एन.व्ही.गाडगिळांनी मात्र या बिलाचे समर्थन केले, बाबासाहेब म्हटले, “डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा आक्षेप अनाठायी आहे आणि त्यावर गंभीरपणे लक्ष देऊ नये. कारण मंत्रिमंडळाच्या बैठकीस त्यांनी हिंदू कोडबिलाचा विरोध केला नव्हता.” पटेलांनी उघडउघड बिलाचा विरोध केला.डॉ. राजेंद्रप्रसादांनी राजीनाम्याची धमकी दिली. अशाप्रकारे बिल जेव्हा पास झाले नाही तेव्हा बाबासाहेब म्हणालेत, “हिंदू कोड बिलाचे चार clauses पास केल्यानंतर त्याची हत्या करण्यात आली आणि त्यावर दोन अश्रू न ढाळता त्याला दफन करण्यात आले.” काँग्रेस आणि मंत्रिमंडळाच्या वर्तनाने त्रस्त होऊन कायदेमंत्री बाबासाहेबांनी २८ सप्टेंबर १९५१ ला मंत्रिपदाचा राजीनामा दिला. ( बाबासाहेबांच्या राजीनाम्याचे कारण फक्त 1)हिंदू कोडबील हे जरी तथाकथित विचारवंत पुढे करीत असले तरी, या व्यतिरीक्त चार कारणे होती ती म्हणजे, 2) नेहरू सरकार अनुसूचित जाती /जमाती बाबत उदासीन होते 3) नेहरूंनी नियोजन खाते तुम्हाला देऊ असे म्हटले पण प्रत्यक्षात मंत्रिमंडळाच्या एकही समितीवर घेतले नाही. 4) काश्मीर धोरण आणि 5) भारताचे चुकीचे परराष्ट्रीय धोरण.

जानेवारी 1952 मध्ये देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीत बाबासाहेबांच्या नेतृत्वाखालील शेड्युल्ड कास्ट फेडरेशनने जयप्रकाश नारायण, डॉ.राममनोहर लोहिया,आणि एस.एम.जोशी यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाशी आघाडी केली होती. मुंबईतील चौपाटीवर जाहीर सभेने या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली. 25 नोव्हेंबर 1951 रोजी मुंबईतील नरे पार्क मैदानात 2 लाखांची सभा झाली. या सभेत बाबासाहेबांनी काँग्रेसला आवाहन केले, ‘‘नेहरूंनी समाजवादी पक्षाला बरोबर घेऊन देशाची धुरा वाहावी. देशात लोकशाही बाल्यावस्थेत आहे, ती बळकट करायचीय. राज्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवायचं तर विरोधी पक्षांची आवश्यकता आहे.’’ बाबासाहेब स्वत: मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवत होते. त्यांच्या विरोधात प्रचाराला पंतप्रधान नेहरूंनी सुद्धा सभा घेतली. मुंबईत येऊन नेहरू म्हणाले, ‘शेड्युल्ड कास्ट फेडरेशन व समाजवादी पक्ष यांची एकजूट ही अपवित्र आहे, त्यांना लोळवा!’’ त्या वेळच्या निवडणुकीत देशभर नेहरूंची लाट होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि अशोक मेहता हे दोघेही ‘शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशन व समाजवादी पक्ष” यांच्या युतीचे उमेदवार होते. यांच्याखेरीज उत्तर मुंबई मतदारसंघात श्रीपाद अमृत डांगे, डॉ. गोपाळ विनायक देशमुख, विठ्ठल बाळकृष्ण गांधी, केशव बाळकृष्ण जोशी, नीलकंठ बाबुराव परुळेकर, द.रा. घारपुरे, नारायण सदोबा काजरोळकर, रामचंद्र सदोबा काजरोळकर आणि शांताराम सावळाराम मिरजकर या नऊ उमेदवारांची नामांकनपत्रे वैध ठरली होती. त्यापैकी द.रा. घारपुरे, रा.स.काजरोळकर हे काँग्रेसचे आणि शां.सा. मिरजकर कम्युनिस्ट पक्षाचे असे तीन ‘डमी’ उमेदवार होते. त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे प्रत्यक्षत: एकूण 11 उमेदवारांपैकी 8 जणांनीच निवडणूक लढवली.त्यांपैकी वि.ना.गांधी, 149138 आणि नारायणराव काजरोळकर 137950 मते मिळवून विजयी झाले, परंतु बाद मतांची संख्याही मोठी होती. डांगे यांचे निवडणूक चिन्ह इंजिन होते. हे चिन्ह असलेल्या उमेदवाराच्या मतपेटीत दोन्ही मतपत्रिका टाका, असे आवाहन डांगे यांनी तसेच त्यांच्या पाठीराख्यांनी निवडणूक मोहिमेतील प्रचारसभांमध्ये तेव्हा वाटलेल्या पत्रकांमध्ये केले होते. कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘युगांतर’ने तसेच आवाहन केले होते. तसे करणाऱ्या मतदारांची मते बाद होतात याची कल्पनाही मतदारांना देण्यात आली नव्हती. डॉ. गोपाळराव देशमुख यांनी, सवर्ण हिंदू मतदारांनी राखीव जागा लढवणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दोन्हीपैकी एकही मत न देता दोन्ही मतपत्रिका अन्य उमेदवाराच्या मतपेटीत टाकून आपले एक मत कुजवावे म्हणजे मत बाद होईल, अशी व्यवस्था करण्याची सूचना केली. ‘नाही तर दोन्ही अस्पृश्य उमेदवार निवडून येतील,’ असा डॉ. देशमुखांनी मतदारांना इशारा दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना नारायणराव काजरोळकरांपेक्षा 14374 मते कमी पडल्यामुळे ते पराभूत झाले. डांगे यांच्या बाद मतांची संख्या 39165 इतकी होती. एक मत कुजवा असे त्यांनी मतदारांना आवाहन केले नसते तर डॉ. आंबेडकर निश्चितच निवडून आले असते.

बाबासाहेब ती निवडणूक हरले, बाबासाहेबांना 1,23,576 मते पडली. त्यांच्या विरोधात काँग्रेसने उभे केलेले उमेदवार नारायण काजरोळकर यांना 1,37,950 मतं पडून ते विजयी झाले. कम्युनिस्ट नेते एस.ए.डांगे यांनाही या वेळी पराभूत व्हावं लागलं होते, लोकसभेत जाण्याचं बाबासाहेबांचं स्वप्न भंगलं.या, निवडणुकीत शेड्युल कास्ट फेडरेशनचे,पां.ना.राजभोज लोकसभेवर निवडून गेले आणि बी.सी.कांबळे मुंबई विधानसभेवर निवडून गेले होते, मुंबईत मतदान झाल्यावर बाबासाहेब दिल्लीला गेल्यावर दिल्लीहून त्यांनी पत्रक काढलं की, ‘मुंबईच्या जनतेनं दिलेला एवढा मोठा भरघोस पाठिंबा वाया कसा गेला? याविषयी निवडणूक आयोगाने चौकशी करण्यासारखे खरोखर आहे.’ तसेच समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांनीही कलकत्त्याहून पत्रक काढलं. त्यात ते म्हटले की, ‘मुंबईत समाजवाद्यांना अनेक बाजूंनी प्रचंड पाठिंबा होता.बाबासाहेब व समाजवाद्यांची एकजूट होती. तरी त्या एकजुटीची दाणादाण कशी झाली, याविषयी आंबेडकरांप्रमाणेच माझ्याही मनात संभ्रम निर्माण झालाय.बाबासाहेबांच्या पराभवाने दिल्लीतील आंबेडकरी वर्तुळ खिन्न झाले होते, आपल्या मनाची तशी तयारीच असल्याने पराभवाचा धक्का आपल्याला विशेष जाणवला नाही, असं बाबासाहेब म्हणाले. कम्युनिस्ट पक्षाचे नेते श्रीपाद अमृत डांगे यांच्या कारस्थानामुळे आपला पराभव झाला, माझ्या पराजयासाठी एस.ए. डांगे यांनी पूर्ण ताकद लावली,असंही बाबासाहेब म्हणाले, एस, एम,जोशी यांच्यामते कॉम्रेड डांगे यांनी जवळजवळ 40,000 मते कुजवून फाडून टाकली,पण ती बाबासाहेबाना मिळू दिली नाहीत.

मार्च 1952 मध्ये मुंबई राज्यातून 17 जागांवर राज्यसभेसाठी निवडणूक झाली. त्यातल्या एका जागेवर बाबासाहेबांनी अर्ज भरला, त्यातील 15 जागांवर काँग्रेसचे उमेदवार होते, उरलेल्या दोन जागांपैकी एक जागेवर बाबासाहेब बिनविरोध निवडून खासदार म्हणून राज्यसभेत गेले.त्यामुळे बंगालमधून बाबासाहेबाना राज्यसभेवर श्यामाप्रसाद मुखर्जींनी पाठवले हे साफ खोटं आहे, बाबासाहेब बंगालमधून नाही तर मुंबई प्रांत विधांमंडळातून राज्यसभेवर निवडून गेले होते.लोकसभा नाही.

उलट तथाकथित काँग्रेसी आणि संघीनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, गांधींच्या हत्येनंतर दिल्लीत परिस्थिती बिघडल्यानंतर बाबासाहेबांनीच श्यामाप्रसाद मुखर्जीना आपल्या घरी आश्रय दिला होता याचा पुरावा आहे. “The atmosphere was tense after Gandhi’s assassination. The congress workers were searching for the leaders of outfits who were responsible for Gandhi’s death. Dr. Shyamaprasad Mukharji leader of Hindu Mahasabha, sought help from Babasaheb to save his life from the violent mob which doubted his role in the assassination of Mahatma Gandhi. Babasaheb asked him to visit his house and Mukharji stayed there till the allegation was cleared. A few days latter Golwalkar, the chief of RSS come to meet Babasaheb to seek his help in after math of Gandhi’s assassination and the persecution of Brahmins of Maharashtra there in. Babasaheb told him not to sow the seeds of hatned and expressed his view that such like Golwalkar can not benefit the Society. The RSS was later banned by the Congress Government. Mr. Golawalkar again met Dr. Ambedkar and requuested him to help for lifting the ban on RSS.

यावरून सिद्ध होते की, बाबासाहेबाना श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1952 च्या निवडणूकित बाबासाहेबाना कोणतीच मदत केली नाही किंवा बंगाल निवडणुकीचा इथे काहीच संबंध नाही,उलट डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनीच श्यामाप्रसाद मुखर्जीच्या प्राणावर संकट बेतले असताना त्यांना संरक्षण देऊन त्यांच्यावर उपकाराचा डोंगर रचून महानता दाखविली.तथाकथित काँग्रेसीनी ही हे लक्षात घ्यावे की,भारत छोडो चळवळ चालू असताना बाबासाहेब हे व्हाइसरॉयच्या कार्यकारिणीचे सभासद होते,आणि तरीही अच्युतराव पटवर्धनांसारख्या भूमिगत काँग्रेस पुढाऱ्याला त्यांनी आपल्या घरात आश्रय देण्याचे धाडस दाखवले होते,पनवेल तालुक्यातील चिरनेर येथे जंगल सत्याग्रह झाला, तेव्हा त्यास हिंसक वळण लागले. एका मामलेदाराचाही खून झाला. मग खटला भरला गेला.त्या खटल्यात बाबासाहेब आरोपींचे वकीलपत्र घेऊन उभे होते.जंगल सत्याग्रह हा काँग्रेसने केला होता, म्हणून त्यांनी वकीलपत्र घ्यायचे टाळले नाही.त्या खटल्यात लोकांची इच्छा, त्यांचे स्वातंत्र्य महत्त्वाचे की सरकारचे स्थैर्य , हा प्रश्न असून ,ज्युरीने सरकारच्या स्थैर्यापेक्षा लोकांच्या इच्छेला महत्त्व द्यावे,असा बाबासाहेबानी युक्तिवाद केला. त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल अनेक वृत्तपत्रांनी त्यांची प्रशंसा केली होती.त्यामुळे उगाच काहीही खोटे पसरवून स्वतःचा हशा करून घेऊ नका. आणि दररोज काहीही संबंध नसताना,पुरावे नसताना एकेक व्यक्ती बाबसाहेबांसमोर उभा करून त्याचा चुकीचा संबंध आणि खोटा संदर्भ लावू नका.

टीप:- संदर्भासाठी बी.शिवराय यांचे घटना समितीवरील पुस्तक,य.दी.फडके यांचे डॉ.आंबेडकर आणि इंडियन नॅशनल काँग्रेस, एन.व्ही.गाडगीळ (समग्र काका, खंड 22), चां.भ.खैरमोडे, भीमराव रामजी आंबेडकर चरित्ररखंड 10,आणि माईसाहेब यांचे आत्मकथन पुस्तक वाचाव.

जय

लेखक बायो मेडिकल इंजिनिअर आहेत आणि आंबेडकरी चळवळीतील स्वतंत्र संशोधक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*