दाभोलकर – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मिम्सतार्थ

प्रशिक सरकटे

मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या नरेंद्र दाभोलकर – अंधश्रद्धा निर्मूलन समिती ह्या मुद्द्यावर मिम्स च्या स्वरूपात मांडलेला मतितार्थ, अर्थात मिम्सतार्थ

इथली आर्थिक विवंचना, संसाधनांची कमतरता आणि त्या मधून येणारी हतबलता जी पुढे अंधश्रध्देला खतपाणी घालते, किंवा मुळात जन्म देते त्याच कारण जात आहे.ब्राह्मण सवर्ण जातींनी बळकावलेली संसाधन ही हतबलता निर्माण करतात ज्यामुळे दाभोलकरांना ती दृश्य अंधश्रध्दा बहुजन जातींमध्ये दिसली. पण ह्या अंधश्रध्देचा उगम ज्या ब्राह्मणी व्यवस्थेमुळे होतो, ज्या जातीच्या पॉवर dynamics मुळे होतो त्यावर दाभोलकर काहीही करत नाहीत. उलट जात ही सर्वात मोठी अंधश्रध्दा ठरवून टाकतात, पण अश्याने काही प्रश्न मिटत नाही, उलट ही भूमिका ब्राह्मण सवर्ण जातींच्या फायद्याची आहे कारण त्यांनी जी बहुजन जातींची संसाधन लुबाडली आहेत त्यावर पुढे प्रश्न विचारायची सोय उरत नाही दाभोलकरांच्या ह्या भूमिकेमुळे. मग त्यांनी ह्या प्रश्नावर बाळगलेले सोयीस्कर मौन आणि हे बहुजन जातींमध्ये केलेली तथाकथित अंधश्रध्दा निर्मूलन त्यांनी ब्राह्मण सवर्ण वर्गाला फायदा पोहचवण्यासाठी केली असा संशय घ्यायला पुरेपूर वाव आहे.

अंनिस ची एकूण समज आणि आकलन, की मुद्दाम केलेली दिशाभूल?

अंनिस ने ब्राह्मण समाजात प्रबोधन करणे गरजेचे होते, ब्राह्मण आणि ब्राह्मण्य वेगळे अश्या खुळचट मांडणीतून ब्राह्मण Casteless नाही होऊ शकत, तशी मुभा इतरांना मिळत नाही.

ब्राह्मण हेजेमनी वर न बोलता तथाकथित अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे स्वजातीय क्लास इंटरेस्ट जपणे ह्या पलीकडे दुसरे काय म्हणावे?जिथे नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त साधन संपत्ती, सर्व संसाधन, bureaucracy, न्यायपालिका ते academia मधील सर्व जागा ठराविक ब्राह्मण सवर्ण जाती बळकावून बसल्या आहेत तिथे दाभोलकर “जाती ला सर्वात मोठी अंधश्रध्दा ह्या साठी बोलतात की जात ही जैविक नाही आणि ती मानू नये” असा जर तुमचा बचाव असेल तर वर नमूद केलेल्या जातींनी केलेला हा कब्जा अगदी त्याच्या उलट बाब सिद्ध करतो आणि ती म्हणजे जात ही मानणे किंवा न मानणे ह्यावर अवलंबून आहे का तर नक्कीच नाही. हे स्ट्रक्चरल शोषण आहे आणि ह्या स्ट्रक्चरल शोषणाला अंधश्रद्धा म्हणणे म्हणजे शोषक ब्राह्मण सवर्ण जातींचा बचावच दाभोलकरांनी केला असे म्हणावे लागेल.

अंनिस चे हमीद दाभोलकर मन स्वास्थ्यासाठी सनातनी रामदासाचे श्लोक पठण सुचवतात तेव्हा.

अंनिस च्या पुरोगामी ताई

जातीला सर्वात मोठी अंधश्रद्धा ठरवून शोषक ब्राह्मण सवर्ण जातींना cleanchit देतात तेव्हा

आणि हे अंधश्रद्धा निर्मूलन करणार

हा विवेकवाद

विवेकवादी ताई सोनाली कुलकर्णी यांचा कमालीचा समतोल

एकाच माळेचे मणी

प्रशिक सरकटे

लेखक मुंबई येथे Independent Researcher आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*