जयंती : महापुरुषांचा कंपाउंड इफेक्ट

राहुल एम पगारे

काल जयंती चित्रपट पहिला, 
आता चित्रपट आपल्या मूळ गावचा आहे, तर त्याचा अभिप्राय सुद्धा त्याच भाषेत देऊया असा वाटलं.
म्हणून हा छोटासा प्रयत्न. थोड चुकलं मुकलं तर समजून घ्या बा.
 चेंबूर ले एक शो लागला होता म्हणे तर माह्या दादाने तिकीट बुक केलां आणि आम्ही 4 जण मिळून शनी जयंती पिच्चर पाहायले गेलो, जसा पिच्चर सुरु झाला तसं फटफटी वर बसून संत्या Ruturaj Wankhede (हिरो) न एन्ट्री घेतली, पुरा ठसन मध्ये येऊन एक दोन भारीवाले डायलॉग बोलला आणि नंतर टपरी वर जाऊन पोट्ट्याये सोबत काड्या करू लागला.
तुम्हाला का वाटले मी का पिच्चर ची स्टोरी सांगून राहिलो?
नाही ना ब्वा ते मी इथं कसा सांगेल, संत्या ले माहित पडल्यावर मोठा मॅटर करन ना तो, मोठा घुसाडा येते ना त्यायले.
तर असा पिच्चर हळू हळू सुरु होते, इंटर्वल पर्यंत संत्या पुराण का संपता संपत नाय, खूब त्रास देते तो लोकायले, पुरा गरम मध्ये चालते आणि जिथे तिथे आपली मुजोरी करते. 
अशे खूब संत्या आपल्या वस्ती च्या टपरीवर तुम्हाले दिसन,  सकाळी चहा आणि खर्रा यायले लागतेच आणि रात्री जो पर्यंत देशी पोटात उतरत नाय तोपर्यंत यायची रात्र काय संपत नाय.
ह्याच सगड्या संत्या लोकायचा संतोष कसा होईन ह्यावर हा पिच्चर बनला आहे. आणि मी तुम्हाले एक्दम खर खर सांगून राहिलो, हा पिच्चर तुमच्या वस्तीच्या प्रत्येक संत्या ले दाखवा, त्यायचे तिकीट चे पैसे तुम्ही द्या, अन मग पहा काय होते ते.
आपल्या पैकी बरेच लोकायले आपले महापुरुष माहित असनच, पण जेव्हा कोण्या संत्यायले आपले महापुरुष समजते ना, तेव्हा त्याइचा इतका बदल आणि त्याइचा इतका परिवर्तन ह्या समाजात कोणीच घडवू शकत नाही, चायलेंज देऊन सांगून राहिलो. 
ज्यायले छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर समजले, त्यायचे जीवन पार बदलून गेले. यायी पिच्चर मधे हे महापुरुष आपला आयुष्य कसे घडवतात हे सांगितलं आहे.
ह्या महापुरुषांची जयंती तर होतच रायते, ह्यायचे पुतळे बी बनतच रायते, पोट्टे जयंती करो अथवा ना करो, नगरसेवक, आमदार, खासदार ले ते कराच लागते, त्याये लोकायचे करिअर त्यावरच टिकून असते.
पण एक सांगून राहिलो, जयंती करून कोणाच्या आयुष्यात बदल घडत नाही, बदल तेव्हा घडते जेव्हा जयंती हे त्या महापुरुषाची न्हवे तर त्यायच्या विचाराची होते. 
आणि विचाराची जयंती तेव्हाच घडू शकते, जेव्हा आपल्या सारखे लोक ह्या महापुरुषांची पुस्तके वाचते आणि त्याय लोकायचे कार्य समजून घेते. संत्या ले ते समजले आणि म्हणून संत्या चा संतोष झाला, आता तो का झाला, कसा झाला हा खूब मजेदार प्रवास आहे. बम मजा येईल तुम्हाले पिच्चर बघताना, कुठे टाळ्या वाजवू आणि कुठे नाही असा होईल. हासून हासून लोटपोट व्हाल इतकी गॅरंटी देतो. 
जयंती च्या पुऱ्या टीम ले माह्याकडून खूब साऱ्या शुभेच्छा, Shailesh Narwade  भाऊ ने जे केल ते कराले खूब हिम्मत लागते,  पुरा माहोल पिच्चर बनवला.
पीवर मराठी पिच्चर च्या टाइम मध्ये विदर्भातल्या लोकायले मोठ्या पडद्यावर आणून ठेवले हे का साधी गोष्ट आहे का जी?
१०८ वर्ष लागले म्हणे ह्या मराठी चित्रपटसृष्टी ला जयशिवराय आणि जयभीम एकत्र म्हणाले. जयंती मुळे हे घडले, हे परिवर्तन ना होये, त का होये बे?
जे कोणी आजवर करू शकले नाही ते काम ह्या पिच्चर ने केल, अन असं केल कि आता यायले थांबवणं मुश्कीलच नाही, त नामूमकिन आहे.
ते इंग्रजी मध्ये का म्हणते तर “कंपाऊंड इफेक्ट”, ते काम ह्या पिच्चर ने केलान. 
कसा आहे, महापुरुषायचे विचार पसराले थोडा वेळ लागते, पण ज्या वेळेला ते पसरते ना, त्या वेळी त्यायले कोणी रोकु शकत नाही. 
जयंती ह्या पिच्चर ने महापुरुषांच्या विचारांचे कंपाऊंडिंग सुरु केले आहे, आता हे विचार कसे आणि कितीक वाढते हे तर वेळच सांगेल.
शेवटले एकच सांगतो, हा सिनेमा लवकरात लवकर पाहाले जा आणि आपल्या आजूबाजू वाल्याले बी घेऊन जा.
स्वतःच्या डोक्यात किती प्रकाश पाडाल बे, आजू बाजू वाल्यायले भी थोडा जय शिवराय जय भीम कळू द्या.
आणि तसा बी शुद्ध भाषा हे थोतांड आहे, ज्या भाषेत आप्ल्यायले नीट बोलता येते तेच आपली शुद्ध भाषा असा आपला संत्या भाऊ बोलला ब्वा.

मुंबई मधील शो ची लिंक:

https://in.bookmyshow.com/mumbai/movies/jayanti/ET00316434

राहुल एम पगारे

लेखक फ्रीलांस कंटेंट राईटर आहेत, ते फायनान्स, क्रिप्टो आणि ब्लॉकचैन बद्दल ब्लॉग्ज आणि आर्टिकल्स लिहितात. फावल्या वेळात त्याला पुस्तकं वाचायला आणि गाणी म्हणायला आवडतं.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*