
जेलर कांबळे साहेब…
जेल ही जागा कुणालाही न आवडणारी आहे. त्या मुळे आयुष्यात जेल आणि जेलरचं तोंड बघण्याची वेळ येवू नये म्हणुन खुप लोक जिवांचा आटापिटा करतात. तसं पाहिलं तर जेल कुणाच्याही आयुष्यात येवू नये हे खरं जरी असलं, तरी संजय कांबळे साहेबां सारखा जेलर मित्र मात्र सर्वांच्या आयुष्यात असावा, अशी प्रतिक्रिया सध्या बीड मधील लोक व्यक्त करत आहेत.
नंदनवनात, सुजलाम सुफलाम ठिकाणी नौकरी करावी असं प्रत्येक नौकरदार माणसाला वाटतं असतं. पण मी जिथं नौकरी करील तिथं नंदनवन निर्माण करील अशी धमक काहीच लोकांमध्ये असते ती संजय कांबळे साहेबां मध्ये आहे. जेलमध्ये आलेली सगळीच माणसं वाईट असतात असं नाही, कींवा सगळीच गुन्हेगार असतात असंही नाही. ज्यांच्या विवेकावर रागाने मात केलेली असते. त्यांच्या कडून अविवेकी कृती होते व ते जेलमध्ये येतात. पण ज्यांच्या रागावर विवेकाने मात केलेली असते तो संयमाने परिस्थीती हाताळतो व संयमी कृती करतो त्यामुळे तो जेलमध्ये येत नाही. त्यामुळे खुप जण त्या क्षणाला घडलेल्या चुकीमुळे, चुकीच्या निर्णयामुळे कींवा चुकिच्या कृतीमुळे जेलमध्ये येतो. अशा व्यक्तीला कांबळे साहेबां सारखा जेलर मिळाला तर जेलमध्ये सुध्दा त्याच्या आयुष्याचं सोनं होतं. कांबळे साहेब ज्या ज्या ठिकाणी नौकरी निमित्त गेले त्या त्या जेलमधील बंदी मित्रांच्या आयुष्यात नक्कीच बदल झालेला आहे. काही जणांच्या आयुष्यात काही बदल झाला नसला तरीही त्यांना कांबळे साहेबांसारखा फ्रेंड, फिलाॅसाॅफर, आणि गाईड मात्र मिळालेला असतो. ओठांवर हसु, करारी नजर व विश्र्वास दर्शक शब्द या भांडवलावर बंदी माणसातील माणुसकी जागी करण्यामध्ये हा माणूस यशस्वी होतोय. जेल मधलं जेलरचं काम पुर्ण करुन, समाज प्रबोधनाच्या कामात सुध्दा ही व्यक्ती हीरीरीने भाग घेत आहे. समाजात मुल्य जपणारी पिढी निर्माण केल्यास. जेलमध्ये कुणीच येणार नाही. जेल ओस पडावेत. जेल मध्ये कुणीच येवुन नये. असा आदर्श समाज निर्माण होणं हे प्रत्येक भारतीय माणसांचं स्वप्न असलं पाहिजे ते आदर्श मुल्य जपणारा समाज निर्माण करण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांची आहे. हे स्वप्न ऊरात बाळगून काम करणारा माणुसकीचा माणुस बीडमध्ये होता. हे आम्हा बीड करांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. सुंदर समाज निर्माण करण्याची स्वप्न पाहणारा तरुण तडफदार अधिकारी संजय कांबळे सरांच्या रुपाने बीडला लाभला होता.
माणसातला अजातशत्रु माणुस गेला.
भावपूर्ण आदरांजली.
(त्यांच्या वाढदिवसानिमित्त लिहलेला लेख )
~~~
साभार :अशोक तांगडे

Leave a Reply