महामानवाच्या ब्राम्हणीकरणाची गाथा

सत्यशोधक

“ब्राह्मण विद्वान गृहस्थांनी ऐतिहासिक संशोधनाच्या बाबतीत हातचलाखीचे प्रकार केलेले आहेत हे उघड आहे. तसे करण्यामागे ब्राह्मण विद्वान गृहस्थांचे ह्या ऐतिहासिक वाङ्मयाचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी दुहेरी हेतू आहेत. यातला पहिला हेतू असा की,आपल्या बापजाद्यांनी निर्मिलेल्या या तथाकथित वाङ्मयाचे सर्वतोपरी रक्षण करणे,प्रसंगी सत्याचा बळी द्यावा लागला तरी बेहत्तर!…आणि सर्वार्थाने ब्राह्मणांच्या हक्काधिकारांना बळ देणाऱ्या, त्यांच्या हितसंबंधांची जोपासना करणाऱ्या ह्या वाङ्मयाच्या श्रेष्ठत्वाला तसूभरही बाधा निर्माण होईल असे कुठलेही कृत्य या विद्वानांच्या हातून घडू नये याची काळजी घेणे, हा दुसरा हेतू. ही कार्यपद्धती अखंडपणे चालू ठेवण्यातच आपले हित आहे, शिवाय आपल्या पूर्वजांचे माहात्म्य सतत गात राहून त्यांचे श्रेष्ठत्व अबाधित राखण्यासंबंधीचीच जाणीव या ब्राह्मण पंडितांच्या मनात अष्टौप्रहर जागृत असते. त्यामुळे आपल्या ज्ञातिबांधवांना विपरित ठरेल, असे कुठेही ऐतिहासिक सत्यशोधन करण्याच्या किंवा ते इतरांना समजून सांगण्याच्या भानगडीत ते सहसा पडत नाहीत. म्हणूनच ऐतिहासिक संशोधनाच्या क्षेत्रांत काही ठराविक गोष्टी,घटना,प्रसंगांचा काळ निश्चित करणे किंवा वंशावळींचा अभ्यास करणे ह्या पलीकडे या विद्वान ब्राह्मण गृहस्थांचे असे कुठलेही अनन्यसाधारण योगदान आढळत नाही.”

~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शूद्र पूर्वी कोण होते?)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रावर आधारित “महामानवाची गौरवगाथा” ही मराठी मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर गेले वर्षभर प्रसारित केली जात होती. आतापर्यंत या मालिकेच्या जवळपास तीनशेहून अधिक भागांचे यशस्वी प्रसारण झाले आहे. या मालिकेने चांगला टीआरपी खेचत, बरीचशी लोकप्रियता मिळवली आहे. बाहेरून हे सगळं छान, प्रेरणादायी वाटत असलं तरी जेव्हा आपण थोडं खोल जाऊ तेव्हा आपल्याला खूप समस्या आढळून येतील. 

‘Hatred in the Belly’ या पुस्तकात आंबेडकरी विचारवंत कुफ्फिर नल गुंडवार त्यांच्या एका लेखात म्हणतात, की बहुजनांनी ब्राह्मणांना त्यांच्या लहान देवस्थानांमध्ये प्रवेश करण्यास, त्यांच्या पवित्र दगड, झाडे, फळे इत्यादींची पूजा करण्यास परवानगी दिली. त्यामुळे ब्राह्मणांनी आपले स्वतःचे देव घुसवले! अशाच कारणांमुळे अँप्रोप्रिएशन (विनियोग, खोडतोड ) झाला . बहुजन समाजातील लोकांनी त्यांच्या जगण्याच्या अनेक लहान मोठ्या अवकाशात ब्राह्मणांना प्रवेश दिला. कधी बहुजन मानित असलेल्या प्रतीकांच्या, निसर्गदेवतांच्या पूजेच्या निमित्ताने, तर कधी दानधर्मादी गोष्टी करण्यासाठी. यामुळे हळुहळु ब्राह्मणांनी त्यांचे देव, वर्णाश्रमधर्म, परंपरा, कर्मकांड, पुनर्जन्म, ज्योतिष, वास्तूशास्त्र, उच्चनीचतेच्या, पाप-पुण्याच्या संकल्पना, श्रेष्ठत्व-कनिष्ठत्वाची भावना, जातीयता बहुजनांमध्ये धूर्तपणे रुजवायला सुरुवात केली. बहुजनांना वर्णांच्या बेड्यांमध्ये अडकवून शिक्षणापासून वंचित ठेवले. स्वतःस गुह्यज्ञानी/ परमज्ञानी म्हणवून घेत ब्राह्मणांनी त्यांचे श्रेष्ठत्व बहुजन समाजावर लादले.

हा एक महत्त्वाचा विषय आहे हे लक्षात घेता, आम्ही हा लेख 2 भागात विभागू इच्छित आहे. हा लेखाचा भाग १ असेल आणि सिरियलच्या रचनात्मक(स्ट्रक्चरल) मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. या गटाचे सदस्यही जातीविरोधी बहुजन पार्श्वभूमीचे आणि बौद्ध समुदायाचे आहेत, हे जाहीर करणे महत्वाचे आहे. तर या लेखाच्या पहिल्या भागात ‘महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेच्या अनुषंगाने लक्षात आलेल्या काही तर्कसंगत नोंदी आणि विसंगती ठळकपणे समोर मांडायच्या आहेत.

अ. मालिकेतील प्रमुख अभिनेते आणि निर्माता-दिग्दर्शक

प्रमुख व्यक्तिरेखा / प्रमुख निर्मिती सहाय्यक कलाकार / जबाबदारी  
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सागर देशमुख
रमाबाई आंबेडकर शिवानी रांगोळे
भिमराव (बाल कलाकार) अमृत गायकवाड
तरुण भिमराव संकेत कार्लेकर
रमाबाई (बाल कलाकार) मृण्मयी सुपल
सुभेदार रामजी सपकाळ (बाबासाहेबांचे वडील) मिलिंद अधिकारी
तुळसा(बाबासाहेबांची बहिण) अदिती विनायक द्रविड
आनंद, (बाबासाहेबांचे मोठे बंधू) प्रथमेश दिवटे
भिमाबाई रामजी सपकाळ  (बाबासाहेबांची आई) चिन्मयी सुमित
मीराबाई सपकाळ  , (बाबासाहेबांची आत्या) पूजा नायक
बलराम  (बाबासाहेबांचा भाऊ) आदित्य बिडकर
राजर्षी शाहू महाराज राहुल सोलापुरकर
अपर्णा पाडगावकर निर्माती
नितीन वैद्य निर्माता
गणेश रणसे दिग्दर्शक

एकंदरीत वर दिलेल्या तक्त्याकडे एक नजर फिरवल्यास एक गोष्ट सहज लक्षात येते ती ही की, निर्माता-दिग्दर्शकांनी किती खबरदारी घेतलीय की चुकून सुद्धा ब्राह्मण किंवा उच्च जातीय सवर्ण सोडून इतर समाजातील कलाकार हे अधिक होता कामा नये, निव्वळ वानगीदाखलच! सुद्धा तथाकथित उच्चजातीय सवर्ण*. हा केवळ योगायोग असावा, असा भाबडा बिनडोक युक्तिवाद करणाऱ्यांसाठी अजून एक दाखला पुढे देत आहोत. ‘महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेची निर्मिती करणाऱ्या ‘दशमी क्रिएशन्स’ चीच निर्मिती असलेल्या सोनी मराठी, या वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘सावित्रीज्योती’ या क्रांतीबा ज्योतीराव आणि सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित मालिकेमध्येही हीच परंपरा पुढे अखंड चालू ठेवली आहे.

एक नजर पुढील तक्त्याकडे –

प्रमुख व्यक्तिरेखा / प्रमुख निर्मिती सहाय्यक कलाकार / जबाबदारी  
ज्योतिबा फुले ओमकार गोवर्धन
सावित्रीबाई फुले अश्विनी कासार
ज्योतिबा फुले (तरुण) समर्थ पाटील
संपादक अमेय गाडेकर, प्रथमेश पानवलकर
कलादिग्दर्शक अजित दांडेकर
Creative Producer अपर्णा पाडगावकर
Operation Team (Sony Marathi) शैलेश गुप्ता, दर्पण कंदारे
Creative Team (Sony Marathi) अमित भंडारी, कीर्तीकुमार नाईक , राजे पाठक
संवाद ह्रषिकेश तुराई
Cinematography (DOP) प्रदीप पार्टे, अजय पोस्तुरे
संगीत  देवेंद्र भोमे
निर्माता निनाद वैद्य, नितीन वैद्य
दिग्दर्शक उमेश नामजोशी

या मालिकेच्या निर्मात्यांना जर खरंच बाबासाहेब महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचे आहेत, तर मग त्यांनी या मालिकेत प्रमुख व्यक्तिरेखांच्या भूमिकांसाठी, निर्मिती सहाय्यक म्हणून ब्राह्मणेतर समाजातील, विशेषत्वाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्गातील (SC/ ST/ OBC) कुणीही कलाकार मिळाले नाहीत? की जाणीवपूर्वक अशा कलाकारांचा शोध घेतलाच गेला नाही? साधारणपणे ११.५ कोटींच्या आसपास लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात जिथे ८ कोटी म्हणजे एकूण लोकसंख्येच्या ७५ टक्के जनता ही SC, ST, OBC आहे (१९३१ ची जानिनिहाय जनगणनेची आकडेवारी, इथे संदर्भ म्हणून विचारात घेतली असता) आणि तरीही या ८ कोटी लोकांमधून कुणी ८-१० कलाकार औषधाला सुद्धा सापडू नयेत, हे कसं शक्य आहे? आणि ज्या महाराष्ट्रात विद्रोही दलित रंगभूमीची इतकी दीर्घ परंपरा आहे, शाहिरी जलसे जिथे दुमदुमत आलेत अशा महाराष्ट्रात बाबासाहेबांच्या तत्वज्ञानावर, त्यांच्या विचारांवर ज्यांचा पिंड पोसला, ज्यांनी जुलमी, अन्याय्य प्रवृत्तींविरोधात क्रांतीची मशाल सतत धगधगती ठेवली, त्या जित्या जागत्या माणसांमधून अशी कुणीच माणसं यांना सापडू नयेत? आजही समान संधी आणि प्रतिनिधित्वाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चाललाय, अशा वेळी ‘प्रतिनिधित्वाच्या’ तत्वाला जर या तथाकथित पुरोगामी सवर्ण सोयीस्कर संवेदनशीलता दाखवणाऱ्या माणसांनी अशी मूठमाती द्यायची ठरवलंच असेल तर मग आता परखड जाब विचारावाच लागेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीबा जोतीबा आणि सावित्रीमाई फुले व इतर बहुजन समूहाच्या श्रद्धास्थानी असणाऱ्या महान व्यक्तीमत्वांच्या भूमिका जर बहुजन (SC/ST/OBC) समाजातील कलाकारांनी केल्या तर महाराष्ट्रातील प्रेक्षक या मालिकांकडे पाठ फिरवतील आणि मग अपेक्षित TRP मिळणार मिळणार नाही, अशी भीती दशमी क्रिएशन्सवाल्यांना वाटली असेल का? की मग सामान्य जनतेला बाबासाहेब आणि फुले हे तेव्हाच नीटसे कळतील जेव्हा हे तथाकथित सवर्ण अभिनेते उपेक्षित समाजात जन्मलेल्या या बहुजाननायकांच्या भूमिका करतील? उच्च जातीतले अभिनेते बहुजन जातीतल्या बहुजन नायक-न्यायिकांच्या भूमिका करताना पाहून बहुजनांचे डोळे दिपतील, ते भारावून जातील आणि आनंदातीशयाने बहुजन या मालिका बघतील, अभिनेत्यांचा उदोउदो करतील? आणि हे सगळं होत असताना, यातून निर्माण होणारी संपत्ती हा आपसूकच या धूर्त- धोरणी निर्माता, दिग्दर्शक ,कलाकारांच्या झोळीत अगदी अलगदपणे जात राहील, ज्यांचा उद्देश उपेक्षित, वंचितांचे सक्षमीकरण वगैरे व्हावे असा मुळीच नसून, फक्त आणि फक्त पैसा-प्रतिष्ठा आणि संपत्ती कमावणे एवढाच आहे. बहुजनांनी हे आता लक्षात घ्यायचे की नाही हे ठरवला पाहिजे? की मग फक्त ब्राम्हणवाद्यांनी आपलीच दुःख आपल्याला विकावीत, आपल्याच नायकांनी निर्माण केलेल्या तत्वज्ञानाला हवं तसं तोडून मोडून, काहीही घुसडून त्याचा बाजार खुला मांडावा आणि आपण बुद्धीबधीरतेने ते सगळं विकत घ्यावं? टाळ्या कुटत रहाव? किती दिवस हे असंच चालणार? कास्ट मोड ऑफ़ प्रोडक्शन मधे बहुजनांनी फक्त ग्राहकच राहायचे काय?

या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण एक नजर जगभरातल्या TV आणि चित्रपट उद्योगांकडे टाकली असता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती Hollywood च उदाहरण देऊन अधिक स्पष्ट करता येईल. Hollywood मध्ये आजवर निर्माण झालेल्या कलाकृतींमध्ये गुलाम म्हणून उपेक्षेचं जगणं वाट्याला आलेल्यांच्या व्यक्तिरेखा साकारणारे कलाकार हे मूलतः तिथले पूर्वाश्रमीचे गुलाम, Black म्हणून वंशभेदाचे बळी ठरलेल्या समुदायातूनच असतात. Black Movement सुद्धा याच भूमिकेची आग्रही होती. तिथल्या अनेक चित्रपटांचे प्रमुख नायक हे Black artist आहेत. ते Black आहेत म्हणून त्यांची लोकप्रियता, योग्यता, त्यांना मिळणारे मानधन यात डावं-उजवं केलं जात नाही. अकॅडेमी अवार्ड्स मधली गोऱ्या लोकांची ची मक्तेदारी आणि एतद्देशीयअमेरिकन लोकांना मिळत असलेली दुय्यम वागणूक याविरोधात तिथल्या सर्व कलाकारांनी नेहमीच आवाज उठवले आहेत. अकॅडेमी अवार्ड्सच्या कार्यक्रमात दरवर्षी सहभागी होणारे प्रमुख निर्माते, दिग्दर्शक, कलाकार त्यांच्या भाषणातून या क्षेत्रातील सर्वसमावेशकता आणि वैविध्य(डाइवर्सिटी) टिकवण्यासाठी, ते वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत आग्रही भूमिका मांडतात.

आपल्या इथले उदाहरण द्यायचे तर, काही महिन्यांपूर्वी मराठी चित्रपट दिग्दर्शक सुजय डहाके यांनी मराठी TV आणि चित्रपट उद्योगांमध्ये फक्त ब्राह्मण जातीतल्या कलाकारांचेच वर्चस्व आहे असा प्रश्न विचारला होता. इतर समाजातील मुलांना संधी कशी नाकारली जाते किवा ती कशी दिलीच जात नाही, असा निरीक्षण वजा आक्षेप नोंदवा होता. त्यावर बराच गदारोळ झाला होता. काही तथाकथित सन्माननीय वगैरे अभिनेत्यांनी असे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनाच ‘जातीयवादी’ ठरवले होते. हे म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा” असे प्रकरण! अर्थात, हे सगळं काही मनोरंजनाच्या क्षेत्रात नवीन आहे असं नाही. फार पूर्वीपासून हे घडत आलंय. आमच्या पाहण्यातील काही उदाहरणे खाली देत आहोत

— बिमल रॉय यांचा चित्रपट सुजाता (१९५९) आहे, ज्यात ब्राह्मण नायक अधीर चौधरी (सुनील दत्त) एका ‘अस्पृश्य’ सुजाता (नूतन) च्या प्रेमात पडले आहेत. अस्पृश्य जातीचे अधिक प्रकाश टाकण्यासाठी नूतन काळ्या वर्णाची दर्शविलेली आहे, परंतु दलित समाजातील एखाद्या मुलीने ही भूमिका साकारावी हे निर्मात्यांना गरजेच वाटल नाही.

— तपन सिन्हा यांचा ‘जिंदगी जिंदगी (१९७२) चित्रपट, ज्यामध्ये सुनील दत्त यांनी एका ‘अस्पृश्य’ कुटुंबातील डॉक्टरची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात एक नव्हे तर दोन आंतरजातीय प्रेमकथा आहेत. पण इथेही दलित समाजातील कोणाताही अभिनेता असावा अशी गरज निर्मात्यांना वाटली नव्हती.

बिमल रॉय दिग्दर्शित ‘सुजाता असो किंवा मग तपन सिन्हा यांचा ‘जिंदगी जिंदगी’ किंवा मग श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘अंकुर, सत्यजित रे दिग्दर्शित ‘सद्गती , शेखर कपूर दिग्दर्शित ‘बँडीट क्वीन , अजय सिन्हा दिग्दर्शित ‘खाप’, प्रकाश झा दिग्दर्शित ‘आरक्षण ते अगदी अलीकडच्या अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘ आर्टिकल १५’ पर्यंतचे चित्रपट, मराठीतला जब्बार पटेल दिग्दर्शित ‘मुक्ता या सगळ्या चित्रपटांच्या कथा या सवर्ण, उच्चजातीय दृष्टीकोनातून मांडलेल्या आहेत. गावकुसा बाहेरच्या माणसांना आपल्या कथावस्तूत स्थान देणं, त्यांच जगणं मांडण, त्यांच्या प्रश्नांवर आधारित गोष्ट सांगण ज्यात मुख्यत्वे प्रेमकथा अधिक आहेत, हा जरी एक चांगला प्रयत्न म्हणून पहायचे म्हटले तरी काही गोष्टी या आजही बदलायला तयार नाहीत. जसे की मुख्य भूमिकेतले कलाकार, दिग्दर्शक, कलादिग्दर्शक, तंत्रसाहाय्यक ही मंडळी ही ब्राह्मण, बनिया, पंजाबी, सिंधी, मारवाडी यांच्यातले अभिजन, उच्चजातीय मुस्लीम, मराठा आणि कुठेतरी नावापुरते मोजके बहुजनांतले चेहरे हेच समीकरण नजरेस पडते. संगीतकार, गीतकार, नृत्यदिग्दर्शक हे सुद्धा उच्चजातीय. प्रसंगी थोडेसे पुरोगामी वगैरे. चित्रपट समीक्षक, पत्रकार वगैरे वगैरे खूप मोठी यादी…सगळी ही अशीच मांदियाळी!

हे सगळं कधी बदलणार आहे की नाही?

पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात तरी हे चित्र बदलायला पाहिजे होतं. उठता बसता फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव. मग उक्ती आणि कृती मधलं महदंतर संपणार कधी?

स्वायत्ततेच्या शक्तीचं विकेंद्रीकरण

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १९३६ मध्ये स्व खर्चातून अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट (एओसी) या अजरामर पुस्तकाचे मुद्रण करुन ते प्रकाशित केले. त्या वेळी त्या पुस्तकाची किंमत (विक्री किंमत) ८ आणे इतकी होती.

बाबासाहेबांचा स्वायत्ततेवर प्रचंड विश्वास होता. उच्च जाती आणि पूर्वीचे कॉर्पोरेट गट त्यांना पाठिंबा देण्यास तयार असतांनाही कुणाचीही कुठल्याही प्रकारची मदत न घेता त्यांनी स्वतःच्या स्वायत्त संस्था उभ्या केल्या. ५ जर्नल्स / वर्तमानपत्रे प्रकाशित केली. आपच्या कथा कहाण्या आपल्याकडूनच सांगितल्या गेल्या पाहिजेत, आमचा इतिहास आम्हीच सांगितला पाहिजे असा त्यांचा ठाम विश्वास होता.

महाराष्ट्राला फुले-आंबेडकर जाती-विरोधी चळवळीचा समृद्ध इतिहास आहे. विठ्ठल उमप, वामनदादा कर्डक आणि इतर अनेक स्वायत्त गटांतील कवींनी आपल्या कथा, गोष्टी जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचून काढले; महाराष्ट्र राज्याचा प्रदीर्घ प्रवास करून घराघरांत या गोष्टी आणि आपला इतिहास पोहोचवला. आजही बहुजन समाजातील अनेक कलाकार, शाहीर हा वारसा जपण्याचा प्रयत्न करत आहेत. तेंव्हा अस असताना अशा मालिकांमधून ब्राह्मण वर्गाला ‘आम्ही (ब्राह्मण) श्रेष्ठ आहोत’ सिद्ध करायचंय का? आम्हीच (ब्राम्हण) तुमच्या (बहुजन) लोकांना बाबासाहेब, फुले, शाहू, सावित्रीमाई आणि त्यांचे जीवनचरित्र याबद्दल शिकवू. तुमचे स्वतःचे (बहुजन) लोक बाबासाहेबांचा इतिहास सांगण्यात अयशस्वी झाले आहेत आणि लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचवण्यास ते सक्षम नाहीत. हे अस काही सामान्य जनतेत रुजवायच तर नसेल ना??

टीव्ही मनोरंजनातून ७०, ८० च्या दशकापासून सत्ताधारी वर्गाच्या, शोषकांच्या बाजूने जनतेच्या विचारात त्यांना हवा तसा बदल केला गेला असल्याचा इतिहास आहे. मीडिया स्टडीज मध्ये कल्टीवेशन थ्योरी नावाची संकल्पना आहे, ज्यात असे म्हटले आहे की टीव्हीच्या माध्यमातून दर्शविलेल्या कार्यक्रमांद्वारे प्रेक्षकांच्या विशिष्ट वर्गाची समज, ज्ञान, श्रद्धा, प्राधान्य, वर्तन कसे बदलू शकतो. रामायण, महाभारत सारख्या टीव्ही कार्यक्रमांनी भारतातील लोकांच्या श्रद्धेत कसे बदल केले आणि आता तेच कार्यक्रम पुनर्विचार करून पुनःप्रकाशीत करण्यात येत आहेत.

दशमी क्रिएशनच्या प्रतिनिधी अपर्णा पाडगावकर म्हणाल्या की, “बाबासाहेब म्हटले की केवळ आरक्षण देणारे, असा गैरसमज समाजात आहे. त्यांना केवळ मागासवर्गीयांचा कैवारी म्हटले जाते, हे आपले अज्ञान आहे. एक स्त्री म्हणून माझ्यावर त्यांचे खूप थोर उपकार आहेत, असे मी मानते. याच उपकरांतून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न.” हे वरवर पाहता खुप प्रेरक आणि उर्जादायी वाटत असल तरी जर एखाद्याने बारकाईने पाहिले तर असे लोक कोण आहेत की ज्यांनी इतक्या वर्षांमध्ये डॉ. आंबेडकरांचे योगदान पाठ्यपुस्तके, विद्यापीठांवर येऊ दिले नाही? सामान्यत: कोणत्याही शालेय पाठ्यपुस्तकात, डॉ. आंबेडकर यांचा भारतीय घटनेचे शिल्पकार असा सर्वात उल्लेखनीय उल्लेख आढळतो. हे लोक पाडगावकर ताईंच्या समुहातले नाहीत का? ताई मालिकेमार्फत या गोष्टीही ठळकपणे मांडतीला का? स्वतःच्या समुहाला याचा जाब विचारतील का? आणि मालिकेत बहुजन समाजातील जास्तीत जास्त लोकांना घेणे ही डॉ. आंबेडकरांना योग्य श्रद्धांजली ठरणार नाही काय? बाबासाहेबांच्या स्वप्नातल्या प्रत्येक समूहाला उत्पादनाच्या, साधन, संपत्तीच्या, शिक्षणाच्या, उद्योगाच्या, मनोरंजनाच्या क्षेत्रात योग्य प्रतिनिधीत्व राबवून बाबासाहेबांनी केलेल्या उपकारची उतराई करण्याचा एक मार्ग ठरणार नाही का?

बाबासाहेब किंवा फुले यांच्याविषयी बोलण्यासाठी दशमी क्रिएशनची आवश्यकता का आहे? हा प्रकार म्हणजे अरुंधती रॉय यांनी “Doctor and Saint’ हे पुस्तक लिहण्याच कारण म्हणजे की ‘अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ (एओसी) हे बाबासाहेबांच पुस्तक समाजातील इतर घटकांद्वारे वाचले जावे” असे हे बेजबादार मत व्यक्त केले होते, तसाच हा प्रकार वाटतो. बहुजन समाजातील बरेच स्वायत्त गट आहेत जे असा प्रयत्न करत आहेत पण त्यांच्या प्रयत्नांसाठी मुख्य प्रवाहातल्या माध्यमांमध्ये फारच कमी जागा मिळते.

डॉ. आंबेडकर यांच्या संपूर्ण लेखनाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य तसेच स्थानिक प्रकाशकांच्या शासकीय मुद्रण दलांमध्ये उपलब्ध आहे. ते अगदी वाजवी दराने उपलब्ध आहेत. Www.mea.gov.in या संकेतस्थळावर लेखी ऑनलाईन उपलब्ध आहेत www.mea.gov.in या वेबसाईट वर.

काही प्रमुख उदाहरणे खाली देत आहोत..

(1) महाराष्ट्राच्या नागपूर भागातील बहुजन रंगभूमी आणि सम्यक नाट्य समूहाची उदाहरणे जी स्वायत्ततेत यशस्वी कसे होऊ शकतात हे दर्शवितात. महाराष्ट्रातील सम्यक नाट्य समूह १५० कलावंतांना घेऊन बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित महासूर्य हे यशस्वी नाटक चालवते, ह्यात महाराष्ट्रातील १५० कलाकारांचा समावेश आहे. नाटकाची जात रचना प्रामुख्याने अनुसूचित जाती / जमाती / ओबीसी समुदायातील बहुजनांची आहे.

(2) श्री. वीरेंद्र गणवीर संचलित बहुजन रंगभूमीचेही तसेच. हा समूह विविध सामाजिक विषयांवर सुमारे ३० वर्षे महाराष्ट्रात नाटकं चालवितो. पण या दोन्ही गटांना दशमी क्रिएशन्सला मिळणाऱ्या मीडिया कव्हरेजचा निम्मा कव्हरेज मिळतो.

 सौंदर्यशास्त्राची मोडतोड आणि भाषिक हिसाचार

आमच्या विरोधाचे कारण म्हणजे बहुजन समुहातील कलाकारांनीच बहुजनांच्या जीवनावर बेतलेल्या मालिका किंवा सिनेमातील भुमिका पार पाडव्यात किंवा तेच भुमिका पाडू शकतात असा मला विश्वास आहे अस नसून, माझ निरीक्षण या तथ्यावरून येते की जेंव्हा शोषक वर्ग शोषित वर्गाचे प्रतिनिधित्व करतो तेंव्हा अस प्रतिनिधीत्व शोषितांवर झालेल्या अन्यायाचा/ शोषणाचा केवळ मनोरंजनासाठी म्हणून वापर करण्याची परवानगी देत असत. सागर देशमुख (मराठी मालिकेत बाबासाहेबांची व्यक्तिरेखा साकारणारी व्यक्ती) संपूर्ण मालिकेत ब्राह्मणवादी शुद्ध मराठी भाषेतच बोलताना दिसत आहे. बहुजन जनतेवर लादलेली ही एकप्रकारे भाषिक हिंसा आहे.

बाबासाहेब हे भाषेवरच प्रभुत्व ,पोटभाषांबाबतच उत्तम ज्ञान आणि त्या उच्चारणातील लहेजांबाबत उच्च प्रतीच ज्ञान/प्रतिभा धारण करणारे तज्ञ म्हणून ओळखले जातात. विदर्भातील लोकांशी संवाद साधताना ते विदर्भीय मराठी लहेजात, मराठवाडा भागातील लोकांशी संवाद साधताना मराठवाडी लहेजात, कोकण विभागातील लोकांशी संवाद साधताना कोकणी लहेजात अशा मराठी भाषेच्या विविध उच्चारणांचा वापर करत असत. मराठी ब्राह्मणांशी बोलतानाही ते मराठीच्या वेगवेगळ्या शैलीत बोलण्यातही ते कुशल होते.

उलटपक्षी मालिकेत सागर देशमुख प्रत्येकासमवेत शुद्ध मराठीत बोलतो, अगदी कोकणातील गरीब मजूरांसोबतही तो या शुद्ध ब्राम्हणी मराठीत बोलतो. इथे टीव्ही प्रेक्षकांसाठी याची आवश्यकता आहे असा युक्तिवाद केला जाऊ शकतो परंतु तो एकच पर्याय शिल्लक आहे का? इथे मराठी उपशीर्षके वापरण्याच्या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो. मराठी उपशिर्षकांचा वापर करुन मराठीच्या वेगवेगळ्या बोलीभाषांचा समावेश करता येण सहज शक्य आहे.

खरं तर, आजच्या वास्तववादी सिनेमाच्या काळात पडद्यावर जी व्यक्तिरेखा चित्रित केली जाते ती जितकी वास्तवाच्या जवळची चित्रित केली जाईल तितकीच ती दर्जेदार, उठावदार बनते असा विश्वास व्यक्त केला जात असताना मालिकेच्या दिग्दर्शक आणि पटकथालेखकांनी ब्राह्मणवादी “शुद्ध” मराठी वापरण्याच्या निवडीचे घेतलेली Creative liberty (कलात्मक स्वातंत्र्य) ही डॉ. आंबेडकरांच्या पडद्यावरील चित्रणाचे ब्राह्मणीकरण करण्यासाठी केलेले आहे का हा मुद्याच अस्पष्टच राहतो.

जाति आणि भाषेचा नेहमीच थेट संबंध असतो. ब्राह्मणांनी ऐतिहासिकदृष्ट्या भाषा ही भेद व दडपशाहीचे साधन म्हणूनच सांभाळलेले (वापरलेल) आहे. सध्याच्या काळात, अनेक प्रादेशिक / बहुजन बोलीभाषांची “प्रमाणित” “संस्कृतकृत” या निकषांवर गैर/चुकीच्या/बेकायदा ठरवल्या जात आहेत अशा वेळी टीव्ही मालिकांवर अपेक्षित असलेल्या वास्तविकतेच्या मर्यादेमध्येच आपल्याला यावर प्रश्न विचारावे लागतील, अन्यथा त्यांची या प्रश्नांतून सहज सुटका होऊ शकते.

पडद्यावर दाखविल्या जाणाऱ्या नेहमीच्या मराठी भाषेपेक्षा सैराट या चित्रपटातील भाषा अत्यंत वेगळी होती तरीही महाराष्ट्राच्या जनतेने/ मराठी प्रेक्षकांनी सैराट हा मराठी चित्रपट अगदी मनापासून स्वीकारला. त्याला चांगल व्यावसायिक यशही मिळाल. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन निर्माते आणि अभिनय करणारे जवळपास सर्वच बहुजन समुहातील असणं हा काही योगायोग नक्कीच नाही. तेंव्हा या मालिकेची ब्राम्हणी बनावट बनवणे कोणाचा हेतू साध्य करत आहे? उच्च जातीय ज्ञान उत्पादन करणारे अस का करत असावेत?

बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक पुस्तकांच्या पहिल्या आवृत्ती संग्रही असलेल्या श्री.रमेश शिंदे या जेष्ठ कार्यकर्त्याशी बोलण्याची आम्हाला संधी मिळाली. त्यांनी अजूनही त्या आवृत्त्या अत्यंत कष्टाने जपून ठेवलल्या आहेत.

त्यांच्याशी बोलताना त्यांनी मालिकेच्या काही बाबींवर चर्चा केली. १९३० पासून ते त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत बाबासाहेबांनी मुंबईत दिलेली अनेक भाषणे त्यांनी पाहिली, ऐकलेली आहेत. बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक उत्तम बाबींबद्दल त्यांना बरीच माहिती आहे. त्यांनीही मालिकेबाबत तीव्र नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली आहे. आम्ही त्यांच्याशी मालिकेबाबत झालेल्या चर्चेतील काही प्रमुख गोष्टी नोंदवू इच्छीतो.

१. बाबासाहेबांचा अभिनय करणाऱ्या अभिनेत्याने संपूर्ण मालिकेत ज्या प्रकारची मराठी भाषा बोलली आहे त्याबाबत त्यांनी स्पष्टपणे नाराज व्यक्त केली आहे. त्यांनी सार्वजनिक आणि खासगी अशा दोन्ही ठिकाणी श्रोत्यांनुसार बाबासाहेबांना मराठी भाषेच्या वेगवेगळ्या लहेजात बोलताना पाहिलेले, ऐकलेली आहे.

२. रमाबाई आंबेडकर (डॉ. आंबेडकर यांच्या पत्नी) कधीही “शुद्ध”, “ब्राह्मणवादी” मराठी बोलत नव्हत्या. त्या मराठी स्थानिक बोलीभाषा बोलत असत. पण सीरियलमध्ये हे वेगळ्याच प्रकारे का दाखवले जात आहे? तसेच रमाबाई या गोऱ्या रंगाच्या दाखविण्यात आलेल्या आहेत पण वास्तविक रमाबाई या गोऱ्या रंगाच्या नव्हत्या.

३. मालिकेत लहानपणापासूनच बाबासाहेबांचे कपडे हे श्रीमंत असल्यासारखे उच्च दर्जाचे दर्शविले जात आहेत. रामजी सकपाळ (बाबासाहेबांचे वडील) यांचा मासिक पगार केवळ 50 रुपये होता आणि त्यांच्या मागे एक मोठा परिवार होता. अर्थात तेंव्हा बाबासाहेबांना घालण्यासाठी मोहक असे कपडे नव्हते.

संरचना आणि सौंदर्यशास्त्र या संपूर्ण बाबींमध्ये डॉ. आंबेडकरांचे चित्रण जे होते त्यापेक्षा वेगळेच दर्शविले जात आहे. तेंव्हा निर्मात्यांना असा प्रश्न आहे की हे सौंदर्यशास्त्र बदलण्याची काय गरज होती? वास्तविकता दर्शवण्यामुळे ते पहात असलेले लोक नाराज झाले असते का?

जसे राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमधील उच्च जातीचे संशोधक जसे येतात आणि त्यांच्या कारकिर्दीत दुर्लक्षित ठेवल्या गेलेल्या लोकांच्या जीवनावर संशोधन करतात आणि प्रगतीपथावर पोहचतात पण ज्यांच्यावर हा अभ्यास/संशोधन केल जात ते मात्र आहे त्या स्थितीतच राहतात अगदी तसच बाबासाहेबांचा एखाद्या विक्रीच्या वस्तूप्रमाणे वापर करुन या मालिकेतले महत्त्वाचे लोक भविष्यात सर्वच टीव्ही पुरस्कार वगैरे जिंकतीलही पण अल्पसंख्याकांचे/ सर्वहारांचे/बहुजनांच जीवन मात्र पूर्वीसारखेच राहील

मला आशा आहे की मालिकेचे बहुजन दर्शक या बाबींचा विचार करतील आणि त्यानंतर अशा सर्व मालिका, चित्रपट निर्मात्यांना सहजतेने स्वीकारण्यापूर्वी त्यांचा प्रश्न विचारण्यास सुरुवात करतील.

महामानवाची गौरवगाथा’ह्या मालिकेची निर्मिती हा असाच एक बामणी कावा आहे ,असे आमचे स्पष्ट मत आहे. मुख्य प्रवाहात स्थान वगैरे भूलथापा मारून काही विशिष्ट समूहाच्या भावनिकतेला हेरून हेतुपुरस्सर संवेदनशील विषयांना हात घालून वादग्रस्तता निर्माण करणे, त्या समुहातील लोकांच्या प्रतिक्रियांची, प्रतिसादांची चाचपणी करणे, त्यानुसार पुढची व्यूहनिती ठरविणे, यासगळ्याचा वापर काही पायंडे पडण्यासाठी, त्या विशिष्ट समूहाबद्दल जाणीवपूर्वक चर्चा होईल असे मतप्रवाह बनवणे, त्यातून कधी उदात्तीकरण तर कधी खिल्ली उडवणे, अकारण तणावजन्य परिस्थितीनिर्माण होईल असा प्रपोगंडा करणे, ऐतिहासिक तथ्यांच्या विदृपिकरणाचा अजेंडा रेटणे हा या बामणी काव्याचा भाग आहे. केवळ इथल्या जुलमी शोषक व्यवस्थेलाच नाही, तर शोषकांच्या तत्वज्ञानाला ठामपणे नकार देत प्रबुद्ध तत्वज्ञानाचा समर्थ पर्याय प्रबुद्ध मानवी समाजाचा निर्मिक होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाला खुला करणारे बाबासाहेब असे अचानक इतके प्रिय कसे झाले असावेत? एकीकडे स्वीकाराचा आभास निर्माण करत अत्यंत धूर्त पद्धतीने ब्राह्मणी धाटणीचे भाषाशास्त्र, सौंदर्यशास्त्र अत्यंत सोयीस्करपणे सवर्ण कलाकारांना घेऊन बहुजन समाजावर लादण्याचा प्रयत्न होतोय. आणि हे सगळं होत असताना नकळतपणे आपला विवेक गहाण टाकून स्वतःला आंबेडकरी म्हणवणारे बांधव कुठलाही आक्षेप न नोंदवता TRP वाढवण्याचे काम करीत आहेत. बाबासाहेब, रमाई, रामजीबाबा यांच्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांच्या भक्तीत गुंगले आहेत. आंबेडकरी जनतेच्या जिवावर नफा कमवण्यासाठी ही मालिका तयार केली आहे. हा एक अत्यंत गंभीर विषय आहे आणि यावर गांभीर्याने चर्चा व्हायला हवी. केवळ विरोधासाठी विरोध हा या लेखाचा उद्देश नाही.

*लेखक, भाषांतरकारांनी वरील व्यक्तींच्या जातीची स्थाने भौतिकदृष्ट्या तपासलेली नाहीत. मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्राशी संबंधित लोकांशी झालेल्या चर्चेवर आणि आडनावांविषयी असलेल्या ढोबळ माहितीवर आधारित आहे. जय भीम!

~ फुले, शाहू, आंबेडकर आणि पेरियार यांच्या तत्वज्ञानावर विश्वास ठेवणाऱ्या सत्यशोधक यांनी हे लिहिले आहे

(सदर लेखात प्रस्तुत झालेली मते हि लेखकांची आहेत, संपादकीय मंडळ या मतांशी सहमत असेलच असे नाही)

लिपिंचा शोधयात्री – जेम्स प्रिन्सेप

सत्यशोधक “ब्राह्मण विद्वान गृहस्थांनी ऐतिहासिक संशोधनाच्या बाबतीत हातचलाखीचे प्रकार केलेले आहेत हे उघड आहे. तसे करण्यामागे ब्राह्मण विद्वान गृहस्थांचे ह्या…
Read More

सवर्ण (ब्राह्मणी) स्त्रीवाद आणि बहुजन महापुरूषांबद्दलचे प्रचलित गैरसमज.

सत्यशोधक “ब्राह्मण विद्वान गृहस्थांनी ऐतिहासिक संशोधनाच्या बाबतीत हातचलाखीचे प्रकार केलेले आहेत हे उघड आहे. तसे करण्यामागे ब्राह्मण विद्वान गृहस्थांचे ह्या…
Read More

फोडा आणि राज्य करा- सर्वोच्च न्यायालय आणि अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण

सत्यशोधक “ब्राह्मण विद्वान गृहस्थांनी ऐतिहासिक संशोधनाच्या बाबतीत हातचलाखीचे प्रकार केलेले आहेत हे उघड आहे. तसे करण्यामागे ब्राह्मण विद्वान गृहस्थांचे ह्या…
Read More

जागतिक महिला दिन आणि आम्ही.

सत्यशोधक “ब्राह्मण विद्वान गृहस्थांनी ऐतिहासिक संशोधनाच्या बाबतीत हातचलाखीचे प्रकार केलेले आहेत हे उघड आहे. तसे करण्यामागे ब्राह्मण विद्वान गृहस्थांचे ह्या…
Read More

छ. शाहू महाराजांनी ब्राह्मण वर्चस्वाशी केलेल्या संघर्षाचा अभिनव चंद्रचूड यांनी केलेला विपर्यास.

सत्यशोधक “ब्राह्मण विद्वान गृहस्थांनी ऐतिहासिक संशोधनाच्या बाबतीत हातचलाखीचे प्रकार केलेले आहेत हे उघड आहे. तसे करण्यामागे ब्राह्मण विद्वान गृहस्थांचे ह्या…
Read More

अयोध्या तर एक झलक आहे, काशी-मथुरा बाकी आहे : ब्राह्मणी मिथकांची पोलखोल

सत्यशोधक “ब्राह्मण विद्वान गृहस्थांनी ऐतिहासिक संशोधनाच्या बाबतीत हातचलाखीचे प्रकार केलेले आहेत हे उघड आहे. तसे करण्यामागे ब्राह्मण विद्वान गृहस्थांचे ह्या…
Read More

छत्रपती शाहू महाराज यांच्या नजरेतून पेशवाई.

सत्यशोधक “ब्राह्मण विद्वान गृहस्थांनी ऐतिहासिक संशोधनाच्या बाबतीत हातचलाखीचे प्रकार केलेले आहेत हे उघड आहे. तसे करण्यामागे ब्राह्मण विद्वान गृहस्थांचे ह्या…
Read More

देश, संविधान, स्वातंत्र्यासमोरील बिकट आव्हाने

सत्यशोधक “ब्राह्मण विद्वान गृहस्थांनी ऐतिहासिक संशोधनाच्या बाबतीत हातचलाखीचे प्रकार केलेले आहेत हे उघड आहे. तसे करण्यामागे ब्राह्मण विद्वान गृहस्थांचे ह्या…
Read More

बाबांची रामू कारुण्याची मूर्ती

सत्यशोधक “ब्राह्मण विद्वान गृहस्थांनी ऐतिहासिक संशोधनाच्या बाबतीत हातचलाखीचे प्रकार केलेले आहेत हे उघड आहे. तसे करण्यामागे ब्राह्मण विद्वान गृहस्थांचे ह्या…
Read More

“कॉम्रेड अमोल खरात एक बंडाची पेटती मशाल” निरंतर तेवत ठेवू.

सत्यशोधक “ब्राह्मण विद्वान गृहस्थांनी ऐतिहासिक संशोधनाच्या बाबतीत हातचलाखीचे प्रकार केलेले आहेत हे उघड आहे. तसे करण्यामागे ब्राह्मण विद्वान गृहस्थांचे ह्या…
Read More

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*