“मेरिटॉक्रसी: एक घातक मिथक” (भाग 1) ~ गौरव सोमवंशी

“मेरिटॉक्रसी: एक घातक मिथक” (भाग 1)

‘मेरिट मेरिट’ आणि “मेरिटॉक्रसी” या पोपटपंची श्लोकाचं जप आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल. या शब्दाची आणि संकल्पनेची पोलखोल करूया, आणि असं करतांना ज्याने हा शब्द बनवला, “मेरिटॉक्रसी”, त्याच्या पासूनच काही धडे घेऊया.

मेरिट हा लॅटिन शब्द, आणि “क्रसी” हा प्राचीन ग्रीक, म्हणून तशी फार जुनी शब्द आहेत, पण “मेरिटॉक्रसी” हा जोडशब्द मायकल यंग या ब्रिटिश लेखकाने 1958 मध्ये पहिल्यांदा बनवून वापरला. त्या अगोदर तो कधीच कोणी वापरला नाहीये. ते पण त्याच्या कादंबरीच्या शिर्षकामध्ये, “द राईज ऑफ मेरिटॉक्रसी”.

पण गंमत इथून सुरू होते. कादंबरीचा विषय, त्याचा शीर्षक, आणि आपला शब्द, “मेरिटॉक्रसी”, हे एक मुद्दामून लिहिलेलं विडंबन आहे. मायकल यंगने विडंबन कोणाचं केलं होतं? तर ब्रिटिश लोकांमध्ये त्या काळी प्रचलित असलेल्या Tripartite Education पद्धती वर, ज्यामध्ये शालेय शिक्षणाची एका प्रकारची वर्णव्यवस्थाच सुरू होती शंभर-दीडशे वर्षांपासून. यंग यांच्या लिखाणामुळे या शिक्षणपद्धतीमध्ये बरेच सकारात्मक बदल सुद्धा घडवून आणले.

मायकल यंग यांनी जेव्हा ते विडंबन लिहिलं होतं तेव्हा ते लॅबर पार्टीचे कार्यकर्ता होते, आणि नंतर आपल्या काळात त्याच पार्टीच्या टोनी ब्लेरने विडंबनातुन आलेल्या शब्दाचं उलटं अर्थ करून प्रचार सुरू केला. या विरुद्ध बोलतांना निराश झालेल्या यंगने मृत्यूच्या एक वर्षअगोदार ‘गार्डीयन’ मध्ये 2001 साली एक लेख सुद्धा लिहिला, ज्यामध्ये ते सांगतात की जी संकल्पना या समाजावर लागू करतांना इतकी सपशेल ढोबळ आणि पोकळ साबीत होते की त्याची खिल्ली उडवायला मी तो शब्द बनवला आणि कादंबरी लिहिली, त्याचं आता लोकं खरं समजून विचार करत आहेत. त्यांनी टोनी ब्लेरला आव्हान सुद्धा केलं की या शब्दाचा वापर आता बंद करा म्हणून. (लिंक: https://www.theguardian.com/politics/2001/jun/29/comment )

त्यांच्या शब्दात, “It is good sense to appoint individual people to jobs on their merit. It is the opposite when those who are judged to have merit of a particular kind harden into a new social class without room in it for others.

Ability of a conventional kind, which used to be distributed between the classes more or less at random, has become much more highly concentrated by the engine of education.

A social revolution has been accomplished by harnessing schools and universities to the task of sieving people according to education’s narrow band of values.

With an amazing battery of certificates and degrees at its disposal, education has put its seal of approval on a minority, and its seal of disapproval on the many who fail to shine from the time they are relegated to the bottom streams at the age of seven or before.”

म्हणजे की मेरिटधारी कोण हे ठरवायची व्यवस्थाच मुळात चुकलेली आणि अन्यायकारक आहे, आणि ऐतिहासिकरित्या ज्यांनी शोषण केले त्यांच्याच बाजूने झुकली आहे. आणि वरवरून पारदर्शी वाटणाऱ्या स्पर्धापरीक्षा सुद्धा याच पद्धतीची अमलबजावणी करतात. मेरिटचे निकषचं अशे ठेवायचे की ज्यांचं राज्य आहे त्यांच्याच मुलांना ते जास्त सोयीने मिळेल. असा यंगचा दावा होता जो आता बऱ्याच पाश्चिमात्य देशात बहुतांश लोकांना समजला आहे.

विषय संपवण्याअगोदर अजून दोनचं महत्वाच्या गोष्टी सांगतो. एक म्हणजे मागच्या वर्षी केलेला एक महत्त्वपूर्ण अभ्यास, ज्यामध्ये असे आढळून आले की जर का शोषित समाजातून येणाऱ्या व्यक्तींनी “मेरिटॉक्रसी” या पोकळ संकल्पेनावर विश्वास ठेवला तर त्यांचं नुकसान होतंच. कारण तुम्हाला जर असं वाटत असेल की या जगामध्ये प्रत्येकाला सर्व काही आपल्या मेरिटवरूनच मिळतं, आणि जगाच्या अन्यायकारक पद्धतींना तुम्ही आंधळे असाल आणि नंतर बळी पडाल, तर तुमच्या अपयशाचा शोध तुम्ही स्वतःमध्ये घेता आणि स्वतःला कमी समजता. (https://www.theatlantic.com/…/internalizing-the-myt…/535035/ ).

या चुकीच्या जाणिवेने मग ही मुलं स्वतःला घातक असतील अश्या काही कामात अडकतात (वरील लेख पूर्ण वाचवा त्यामध्ये मूळ रिसर्च पेपरची पण लिंक आहे.)

शेवटचा मुद्दा आता. जर का असेल तर मग आपण गोष्टींकडे कसे पाहावे? मोठमोठ्या कॉलेजमध्ये जाऊन डीग्र्या घेणं हे आपल्या लढ्याचा भाग आहेच, त्याला कोणी नाकारू शकत नाही. पण असं करतांना आपल्याला विसर पडू नये की आपण IIT IIM JNU TISS परदेशात वगैरे गेलो म्हणजे आपल्या समाजातील बाकी आपल्या इतके “मेरिटधारी” नाही असा समज चुकून बाळगणे सुद्धा घातक. कारण बहुतांश लोकांना ते शक्य होत नाही कारण या देशाची व्यवस्था ती शक्यता उद्भवूचं देत नाई. याच्या विरुद्ध झगडून आपली काही मंडळी पुढे जातात आणि त्यामध्ये त्यांचे खरे परिश्रम आहेच, पण झगडण्याचीसुद्धा आशा बऱ्याच लोकांकडुन हिरावून घेतली जाते. म्हणून जेव्हा ‘ज्ञान निर्मितीचा’ प्रश्न येतो , जेव्हा knowledge production चा सवाल उठतो, तेव्हा आपण कोणत्यापण दबलेल्या समाजातून आलेल्या व्यक्तींच्या विचारांना त्यांची फक्त आणि फक्त डिग्री पाहून, किंवा इंग्रजी भाषेचं प्रभुत्व वगैरे पाहून त्याचं “मेरिट” ठरवू नये. हृदयात खरी माणुसकी असली आणि जगात ती माणुसकी दिसावी याची जिद्द मनात असली तर आंबेडकरी विचारांचे वाहक अगदी कोणीही होऊ शकते, (वर्ग-जात-लिंग-डीग्र्या-इत्यादी) काहीही फरक पडत नाही.

कारण प्रश्न माणुसकीचा आहे, “मेरीटॉक्रसी”चा नाही.

जय भीम.

~ गौरव सोमवंशी



Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*