बा भिमा तुझी प्रतिमा टिपताना…

आदिती रमेश गांजापूरकर

बा भिमा
तुझी प्रतिमा टिपताना
स्वाभिमानालाही देखील हेवा वाटावा, असे तुझे अविभक्त करणारे वारेमाप समतेची आकाशगंगा नांदवितात.

क्रांतीच्या महानायका अस्पृश्यतेच्या वावटळीत जन्म घेतलास,तुझ्या बुद्धितेजापुढे आत्महत्या करावी लागली मनुला.

स्वाभिमान डीवचलेल्या, आत्मशक्ती पिचलेल्या माणसांच्या वस्तीकडे काळाला झपाटून ओढणारा महासूर्य होतास.

अस्तित्वाची स्फुर्ती पूर्णत्वाला नेऊन, ठिणगी ची मशाल पेटवणारा अग्णीलोळ होतास.
स्त्रीमुक्तीच्या लढ्याचे निळेशार अवकाश निर्माण करणारा लढवय्या होतास.

प्रज्ञा शील करुणेने अंतकरण भरलेला तथागताच्या सर्वोच्च प्रेमभावनेचा अतुलनीय वर्षाव करणारा, तू उघड्या डोळ्यांनी चालणारा बुद्ध होतास !!

आदिती रमेश गांजापूरकर

लेखिका/कवियत्री नांदेड येथील रहिवासी असून Government Nursing Officer आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*