आम्ही माणसं माणसं, जणू सोनिया सारखी…..

प्रतिक्षा भवरे

आंबेडकरी विचारधारा रुजवायला ताकद लागते ना भौ एक नागराज अण्णा सारखं व्यक्तिमत्त्व सिनेसृष्टीतील सो कॉल्ड सवर्ण कलाकाराला फाट्यावर मारत 100 वर्षाचा जातीवाद मोडून काढत मराठी सिनेसृष्टीतून थेट बॉलीवूड पर्यन्त आपला चित्रपट घेऊन जातो, तेव्हा इथल्या प्रत्येक बहुजन वर्गातील जनमानसाच्या डोळ्यात एक स्वप्नं दिसायला लागतं.

कित्तेक काळापासून इथल्या बहुजन कलाकाराला ब्राह्मणी जातीवादाने वर येऊच दीले नाही. तिथे थेट नागराज अण्णा बच्चनसारख्या प्रस्थापित कलाकाराला स्वताच्या मूव्ही मधे एक पात्र देतो अन त्याला बाबासाहेबांच्या मोठ्या फ्रेम समोर उभं ठेऊन फुले, शाहू, आंबेडकर दाखवत, आजपर्यंत पहिल्यांदाच दाखवलेली मोठ्यापडद्यावरची भीम जयंती हे डोळ्यात भरेल अशी मांडली जाते. खरच एक इतिहास निर्माण होताना आम्हाला इथे दिसतो आहे. इथल्या जातीवादाच्या भिंती तोडायला नागराज अण्णा सारखा कणखर व्यक्ति सिनेसृष्टीत असणं अत्यंत गरजेच आहे. नागराज सरांच्या सिनेमांत पांढऱ्या पडद्यामागे जे दाखवीलं जातं ते इथल्या मातीतलं खरं वास्तव आहे. माझ्यासारखे मध्यमवर्गीय लोक त्यांचे सिनेमे फक्त पाहतच नाही तर त्याला वास्तवात जगत देखील असतो.

साला आजपर्यंत जात नावचं वास्तव इथल्या बहुजनांच्या जगण्यात आभाळ चिरत असताना मी पाहिलंय इथल्या झोपडपट्टीतील मागासवर्गीय लोकांना गरिबी आणि जातीवादाचे चटके खाताना. अंगी कला असेल त्या कलेचा बाजार मांडून पोटापाण्यासाठी पैसे कमावताना. इथे शिक्षण असो, नौकरी असो, राजकीय सत्ता असो कला असो किंवा एखादी क्रीयेटीवीटी असो इथल्या बहुजनाला जातीच्या उतरंडीत गुंडाळून “जात” जेव्हा तोंड वर काढते तेव्हा सवर्ण समाज जातीचा अहंकार उराशी बाळगून तयारच असतो आमची लक्तरं ओढायला.

पण आता हळूहळू हे वास्तव बदलताना दिसतंय. हा बदल होण्यासाठी कितीतरी बहुजन कलाकाराने मुळापासून प्रयत्न केले असतील याची कल्पना आपण करू शकतो. नागराज अण्णा स्वप्नंवत वाटणारी गोष्ट खरी करून दाखवतो. त्यांच्या कॉन्फिडन्स बद्दल जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच.

आता खरी गंमत अशी आहे की सोशल मीडिया वर झुंड ला चांगला प्रतिसाद मिळत असताना सिनेसृष्टीतील सवर्ण शेळीब्रीटींना इतके चटके का लागले असतिल, की त्यांनी मुव्हीच्या प्रमोशनसाठी एकही ट्विट केलेलं नाही. काहींनी केलेत तर ते निव्वळ दिखावा म्हणून केलेत. नाहीतर मांजरेकर सारख्या साजूक तुपातील फिल्ममेकर च्या कोणत्याही मुव्हीज येऊद्यात छोटे मोठे अश्या सर्व वर्गातील सवर्ण सेलिब्रिटीज मोठमोठे प्रोग्राम्स अरेंज करून त्यांच्या मुव्हीजचं प्रमोशन करत असतो. पण ते नागराज अण्णांच्या झुंड बद्दल का बोलत नसतील? त्याचं सोप्प उत्तर आहे “जात”. नागराज मंजुळे ज्या खालच्या जातीतील वर्गातून आलेले असताना इतकी क्रांती घडवुन आनताहेत हे बघून प्रस्थापित जातीयवादी, उच्चवर्णीय बामण लोक त्यांचे पाय धरून ओढण्याचा साजूक प्रयत्नात आहे. परंतु ते म्हणतात ना सूर्याला ढगाने कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी सूर्य कुठून तरी आशेची किरण दाखवत बाहेर पडतो तसच नागराज करताहेत.

4 तारखेला झुंड रिलीज झाला. सोशल मीडियावर झुंड ने जबरदस्त असं वातावरण निर्माण केलं. त्याचदिवशी आम्ही ट्विटरवर एक हॅशटॅग तयार केला. तो होता #झुंडपेबोल मुळातच हा हॅशटॅग सगळया सवर्ण शेळीब्रीटींसाठी सारकॅस्टीकली यूज करण्यात आला होता. बघता बघता हा ट्रेंड तयार झाला आणि संपूर्ण सोशल मिडीयावर #झुंडपेबोल या हॅशटॅग ला भरभरून असा प्रतिसाद मिळत गेला. हा ट्रेंड केवळ सोशल मीडिया पर्यंत मर्यादित न राहता मेनस्ट्रीम मीडियानेही याची दखल घेतली. साम टीव्ही वर आमचे ट्विट्स झळकले. सवर्ण सेलेब्रिटींची जातीयवादी मानसिकता संपूर्ण सोशल मीडिया आणि मेनस्ट्रीम मीडियापुढे आली. त्यांचा जातीवाद एक्स्पोज झाला.
या ट्रेंडचा एक फायदा झाला तो म्हणजे, यापुढे नागराज मंजुळे सारखा बहुजन वर्गातील कलाकार जेव्हा चित्रपट काढेल तेव्हा हे सवर्ण सेलेब्रिटी लाजेने आमच्या मूव्हीजचं प्रमोशन करतील त्यात दुमत नाही.

झुंड मुव्हीसाठी नागराज मंजुळे आणि त्यांच्या टीमला माझ्या फॅमिलीकडून आणि मित्रपरिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम.😌

सिनेसृष्टीत आमच्यासाठी प्रेरणा देणारं जर एखादं व्यक्तिमत्त्व असेल तर ते नागराज अण्णाच आहेत. वी लव्ह यू सर❣️

जयभीम💙

प्रतिक्षा भवरे

लेखिका यवतमाळ येथील रहिवासी असून मेडिकल स्टुडन्ट आहेत.

2 Comments

  1. खुप छान प्रतिक्षा आज पर्यंत जिथे फक्त साजुक तुपाची संस्कृतीचं अस्तित्व होतं तिथे वडार समाजाचा एक नागराज दगड फेकतो अन् शतकातील मक्तेदारी थरथरायला लागते त्यांना माहीत आहे आपला खेळ मोडीत काढायला एकच आंबेडकर डोईजड आहे अन् त्याचं बोट पकडणारा नागराज आपला तंबू उखडून काढेल…

  2. प्रतीक्षा खरं आहे. हिंदी सिनेमात देखील क्वचित हा विषय हाताळला गेला.’सुजाता’ या हिंदी सिनेमात दलित नायिका आहे पण तिला रडण्याशिवाय इतर अवकाश मिळालेला नाही. पण नागराजचे सिनेमे बळ देणारे असतात

Leave a Reply

Your email address will not be published.


*