मला समजलेले बाबासाहेब!

हर्षदा वाहुळकर

कोण हे आंबेडकर ???
ओढ्यालगतची गचाळ वस्ती ते prime लोकेशनचा 2 bhk महारवाड्यातील पडकी झोपडी ते आलिशान रो हाऊस.
अनवाणी फिरून जखमा झालेले पाय ते adidas puma चे जोडे मिरवणारे पाय.

ताटात उरलेलं खरकट ते पंचतारांकित हॉटेलच पंचपक्वान्न. अंगावरच फाटकं लुगडं ते उंची कांजीवरम साडी .
कमरेचा झाडू ते बुडाखाली आलिशान ac गाडी

गळ्यात लटकावलेलं मडकं ते दहा तोळ्यांचा लक्ष्मीहार .
मेलेलं ढोर ओढून नेणारे हात ते international कंपनीत सह्या ठोकणारे हात .

भीकेची हतबलता ते पाच आकडी पगाराचा अभिमान.
प्राण्यांपेक्षा हलाखीचे जगणं ते ताठ मानेने बिंधास्त वावरणं गरिबीत दिवस रेटणं ते आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदोत्सव साजरा करणं
बाई म्हणून दासी ते बापाच्या संपत्तीत समान वाटा.
चूल आणि मुलं बेड्या ते प्रत्येक क्षेत्रांत समान संधी .

स्पर्शाचा , सावलीचा विटाळ ते स्वतंत्र्य अस्तित्व कित्येक मैलांचा हा सगळा प्रवास आहे.

आंबेडकरामुळे माझ्यासह कित्येक पिढ्यांचा बाप आहे आणि असेल आंबेडकर माझे भूतकाळ , वर्तमान , भविष्याच अस्तित्व आहे आंबेडकर माझे अभिमान माझा विश्वास माझ्या आयुष्याची देणं आहे आंबेडकर … मानवतेच्या लढ्यातील क्रांतिसूर्य आहे आंबेडकर …

युगप्रवर्तक विश्वरत्न आहे हा आंबेडकर .. अख्खी दुनिया तुमच्या ज्ञानासमोर तुमच्या अतुल्य कार्यासमोर नतमस्तक होऊन तुमचा जन्मोत्सव साजरा करतेय आणि कायम करेल ..

We are grateful for your existence!

जय भीम!

हर्षदा वाहुळकर

लेखिका जालना येथील रहिवासी असून एमएससी(प्रथम वर्ष) स्टुडंट आहेत.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*