प्रिय बुद्धा!

आदिती रमेश गांजापूरकर

प्रिय बुद्धा!

विद्रोही परिवर्तनाच्या दिशेने लेण्यात कोरलेला तू आजही सम्यक वाणीतून बोलका भासतोस शाश्वत सत्याचा सिद्धांत ठामपणे मांडत!

तुझ्या नयनातलं चिरस्थिर
स्मित अवघ्या मानवजातीला
युगानयुग पडलेल्या प्रश्नांची उत्तरं सामावून घेतय तत्परतेने!

निसर्गाने तुझ्या हृदयात भरलेला
प्रज्ञेचा वाहता झरा कायम
चिरंतन सत्य अबाधीतपणे मानवापुढे अनावृत करतो!

तुझ्या अथांग संवेदनाचा परीघ
प्राणीमात्राची वेदना खोलवर
जाणतो करुणामयी रुपात!

जमिनीच्या गाभ्यात रुजलेल्या
सनातनी काळोखाला थेट भिडण्याच साहस तुझी
धैर्यरुपी महती टिपते!

सम्यक मार्गावर बोट धरून चालायला शिकवणारा अद्वितीय मैत्रभाव जपणारा सखा!

मानवजातीच्या कल्याणासाठी
बहुजन हीताय बहुजन सुखाय चारिका अर्पीलीस अखंड!

तुझं सिद्धार्थ असणं..
मग बोधीसत्व असणं…
हे समतेचं आभाळ आहे मोठं….!!

आदिती रमेश गांजापूरकर

लेखिका/कवियत्री नांदेड येथील रहिवासी असून Government Nursing Officer आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*