द मिसएडुकेशन

डॉ भूषण अमोल दरकासे

मुंबई सेंट्रल या स्टेशनवर थोडा वेळ थांबण्यात आले. स्टेशन च्या वॉलवर गांधीजी च्या जीवनातील महत्वाच्या घटनांचे चित्र द्रष्टीस पडले. दांडी सत्यागृहात मीठ उचलताना चे गांधीजी दिसले. डॉ. आंबेडकरांचे महाड सत्याग्रहात ओंजळीने उचललेले पाणी आठवले. मिठाच मूल्य कितीही असो ते नक्कीच पाण्यापेक्षा अधिक असू शकत नाही. दांडी सत्याग्रहाच्या (१२ मार्च ते ६ एप्रिल १९३०) आधीच बासाहेबांचा पाण्याचा महाड सत्याग्रह (२० मार्च १९२७) झाला. देशातील करोडो लोग पाण्याला स्पर्श करू शकत नाहीत हि लाजिरवाणी गोष्ट आपल्या इतिहासात शिकवली जात नाही. दांडी सत्याग्रह शालेय इतिहासाच्या पुस्तकात मिळेल पण शालेय पुस्तकात महाड सत्यागृहाबाबत आपल्याला एक शब्द हि दिसणार नाही. महाड सत्याग्रह दांडी सत्याग्रहाच्या आधी होऊन सुद्धा त्याबद्दल शालेय पुस्तकात माहिती दिली जात नाही.

दांडी अनेकांना माहीत आहे, काही मोजक्याच जणांना महाड माहीत आहे…(1)

बोज्जा थारकम यांचे महाड सत्याग्रहावरील “महाड-द मार्च दॅट इस लौंचंड एव्हरी डे” पुस्तक वाचल्यावर असे समजेल कि कशाप्रकारे दांडी सत्याग्रह हा पूर्णतः नियोजित होता; सत्याग्रहाचा मार्ग, येणाऱ्या लोकांची संख्या (79 लोक) यापासून ते दुपार-रात्रीचे जेवण, राहण्याची सोय, सभेच्या आणि प्रार्थनेच्या जागा पूर्णतः नियोजित होत्या. ज्या गावात ते जाणार ते गाव आधीच स्वागतासह पूर्ण सोय करीत असे, जिथे मोर्चा जाणार तिथे आधीच एक सर्वेक्षण टीम शहानिशा करायला जायची, सर्व दांडी मोर्चेकर्ते पुरुष होते; स्त्रिया जरी यायला तयार होत्या तरी त्यांना ती नाकारण्यात आली. (1)
ज्या गावांमध्ये प्रामुख्याने पाटीदारांची वस्ती होती, वल्लभभाई पटेल ज्या जातीचे होते, त्यांना जास्त पाठिंबा मिळवण्यासाठी निवडण्यात आले. जाती आणि गुजरात प्रदेशाने दांडी मार्च ला चांगली सुरुवात करून मोर्चा काढण्यास मदत केली. वल्लभभाई पटेल यांनी मोर्च्याच्या आधी जनसमाजात चांगलाच वातावरण तयार केलं होत. (1)
आणि ध्येय काय होते तर मिठावरील कर आणि ब्रिटिश मक्तेदारी संपवणे. गांधींनी मीठ हातात घेतल्याचा फोटो तीन दिवसांनी काढला गेला कारण दांडी येथे फोटो काढायला कोणीच नसल्याने भिमरड या गावात गांधीजींना मीठ उचलण्याचे नाट्य पुन्हा करावे लागले आणि तोच फोटो दांडी सत्याग्रहाचे चित्र बनून समोर आले.(1)

महाड सत्याग्रह हा पूर्णपणे वेगळा होता; कोणताही मार्ग अथवा रस्ता पूर्वनियोजिय नव्हता, ते कसे आले, कुठून आले व कसे पोहोंचले त्यांनी काय खाल्ल (स्वतःच्या गाठोडयात जे बांधून आणले असेल ते) आणि कुठे झोपले याची नोंद नाही, सभेच्या जागी खाण्याची व पिण्याच्या पाण्याची सोय (सत्याग्रहाच्या सभेच्या जागी ४० रुपये देऊन; पाणी मिळवले)पैसे देऊन करावी लागली. कोणीही त्यांचे स्वागत केले नाही. उलट त्यांना विरोध च झाला. वाटेत पाहुणचार करणारी गावे नव्हती. खरं तर, कोणताही मार्ग नव्हता. त्यांना मार्गाचा अधिकारही नाकारण्यात आला होता.(1)
तरीही १०००० लोग महाडला पोहोंचले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, लोक एकटे किंवा गटात महाडकडे निघाले. स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात उत्सहाने सहभाग नोंदवला. महाड सत्याग्रह करणाऱ्यांच्या विरोधात सामाजिक वैमनस्य खूप होते आणि त्यांना या वैमनस्याच्या वातावरणातून जावे लागले. सत्याग्रह झाल्यानंतर २ तासांनी काही सवर्ण हिंदूंनी अशी अफवा पसरवली कि अस्पृश्य विरेश्वर मंदिरात घुसू पाहत आहेत. दगडाच्या देवाची सुरक्षा करायला संपूर्ण सर्वर्ण महाड काठ्या घेऊन अस्पृश्य समाजावर तुटून पडला. २० लोक गंभीर रित्या जखमी झाले. (2)
महाड चे ध्येय काय होते तर मानवी मूल्यांची पुनर्बांधणी करणे. महाड हा सत्याग्रह नव्हता ते एक युद्ध होते(1); प्रथा आणि धर्माने सशस्त्र असलेल्या शक्तिशाली हिंदू समाजाविरुद्ध. एक युद्ध होते नवीन सामाजिक स्तर आणि नवीन दर्जा प्रस्थापित करण्याचे आणि हिंदुस्थानची पुनर्रचना करण्याचे.
शाळेतील मुलांना महाड सत्याग्रह का शिकवत नसतील बरे ? असे का?
भारतातील शिक्षणपद्धती एक असा मूलभूत ढाचा तयार करण्याच्या प्रयत्नात आहे जिथे उपेक्षित वर्गाच्या शैक्षणिक शक्यतांची क्षितिजे मर्यादित करण्याचा सतत प्रयत्न प्रयत्न केला जातो. कार्टर वूडसन त्यांच्या प्रसिद्ध अशा “द मिसएडुकेशन ऑफ निग्रो” या पुस्तकात म्हणतात,”जर तुम्ही माणसाच्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकत असाल तर तुम्हाला त्याच्या कृतीबद्दल काळजी करण्याची गरज नाही”. उपेक्षित वर्गाच्या ऐतिहासिक घटना शैक्षणिक अभयसक्रमातून न सांगणं हि एकप्रकारची प्रतीकात्मक हिंसाच आहे. शालेय शिक्षणाच्या संदर्भात, याचा अर्थ सध्याच्या मुख्यतः उच्चवर्णीय ज्ञानाच्या आणि त्याद्वारे रचलेल्या सामाजिक आणि प्रतीकात्मक हिंसा याची उघड माहिती करून देणे हाच आहे.
ओलूफेमी तैवो त्यांच्या “एलिट कॅपचर” या पुस्तकात म्हणतात कि जेव्हा आपण संभाषण अथवा संप्रेषण(communication) करतो, तेव्हा आपण काही “सामान्य विश्वास” किंवा “परस्पर विश्वास” गृहीत धरतो—केवळ मला माहीत असलेल्या आणि तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टीच नव्हे, तर मला-ज्या गोष्टी-ज्या-तुम्हाला-माहित आहे, तुम्हाला-माहित आहे-त्या-मला- माहीत आहे, वगैरे(3). तत्वज्ञानी रॉबर्ट स्टॅल्नेकर(3) या सार्वजनिक माहितीला “सामान्य ग्राउंड” असे संबोधतात, जी एक सामायिक ढाचा तयार करते ज्याचा वापर संभाषणात सामाजिक संवाद तयार करण्यासाठी केला जातो. या सार्वजनिक माहितीबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर आपण तिचे काय करतो. जेव्हा आपण सामाजिक संदर्भांनुसार काही कृती करतो, तेव्हा आपण या सामान्य माहितीला (सामान्य ग्राउंड) ला सत्य असल्याप्रमाणे हाताळतो: म्हणजे, आपण ती सार्वजनिक कृतीसाठी एक आधार मानतो.(3)
लोकशाही आणि योग्य संभाषन असलेल्या समूहात ह्या सामान्य ग्राउंड मध्ये काही नवीन माहिती निर्माण होते तर काही जुनी आणि कालबाहय माहिती वजा होत असते. आता हे असे वर वर खूप छान वाटत असले तरी जमीनस्तरावर असे होत नाही. सामान्य ग्राउंड हे अशा लोकशाही पद्धतीने चालत नाही कारण आपल्या आजूबाजूला घडणारी कोणतीच संसाधने तशी काम करत नाहीत, कारण आपण गुलाम समाजात राहतो.(3)
उपेक्षित वर्गाचे काही अनुभव सत्य आणि थेट जरी असले तरी सामान्य माहितीत (सामान्य ग्राउंड मध्ये) तिचे योगदान काही प्रबळ अभिजन वर्गाकडून नाकारले जाते अथवा तिला तो दर्जा प्राप्त करू दिला जात नाही.
बोज्जा ठराकम यांचे महाड सत्याग्रहावरील “महाड-द मार्च दॅट इस लौंचंड एव्हरी डे” हे पुस्तक जार्विस गिव्हन्स(4) यांच्या भाषेत “फुजिटिव्ह पेडागॉजि (अध्यापनशास्त्र)” ” चे उत्तम उदाहरण आहे. ‘फुजिटिव्ह पेडागॉजि (अध्यापनशास्त्र)” त्याच्या प्राचीन आणि आधुनिक ऐतिहासिक अर्थामध्ये शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या प्रबळ प्रोटोकॉलपासून आणि यातुन निर्माण होणाऱ्या अनुभवांची रचना करणार्‍या वर्णनात्मक स्क्रिप्ट यापासून फारकत घेऊन एक नवीन संरचनेची निर्मिती करीत असत. (4)
भारतीय शिक्षणपद्धतीने उच्चजातीय वर्गाना साजेशी ज्ञनिर्मिती, तिचे दळणवळण आणि तिला लागणारे पोषक वातावरण तयार करण्याचे काम पूर्वीपासूनच केले आहे. त्यामुळेच ‘फुजिटिव्ह पेडागॉजि (अध्यापनशास्त्र) ज्ञानाच्या संकुचित प्रबळ संरचनेला व्यत्यय आणते आणि तडा देते. ती फक्त शालेय शिक्षणच न्हवे तर जगाच्याही शैक्षणिक द्रष्टीकोनातून मानवी मूल्य काय आहेत हे नव्याने परिभाषित करण्याचे अध्यापनशास्त्र आहे. (4)

डू बोईस यांनी लिहले कि, “मी निग्रो शिक्षकांवर विश्वास ठेवतो, योग्य प्रशिक्षणाने ते जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षक आहेत कारण त्यांनी दुःख अनुभवले तसेच सहन केले आहे आणि त्यांच्या सहानभूती खाली काहीही नाही.”(4) सिल्विया वित्नर म्हणतात कि, “ज्यांना जगाच्या वर्चस्वाच्या संरचनेचे साधन म्हणून वापर केले गेले त्यांना चांगले ठाऊक आहे कि माणूस असणे म्हणजे काय आणि माणूस असण्याच्या अटींची पुनर्रचना करणे का आवश्यक आहे, ती त्यांना “साक्षीदार लोक” म्हणून संबोधते”. (4)
हेच जगातील सर्व उपेक्षित वर्गांबद्दल बोलता येईल कि ते “साक्षीदार लोक” आहेत जे विद्रोही संकल्पनांनी जगाची पुनर्रचना करू पाहतात.

नरेन बेदीदे (5) यांनी म्हटल्याप्रमाणे ” आपली शिक्षण व्यवस्था अपयशी आहे…आपली गंभीररीत्या सदोष शिक्षणपद्धती कुठल्या पोकळीतून निर्माण झाली नाही, ती निर्माण झालीये आपल्या गंभीररीत्या आजारी अशा सदोष समाजरचनेतून.”
त्यामुळे उपेक्षित वर्गाने हे नवीन अनुभव निर्माण करणारे ज्ञान फक्त स्वतःपुरते मर्यादित न राहता शालेय शिक्षणात तसेच जनसमाजात कसे पसरेल याची दक्षता घेणे गरजेचे आहे. बाबासाहेब म्हणाले त्याप्रमाणे “लहान लहान कार्ये हातात घेऊन ती पार पडण्याचा प्रयत्न करावा, विदयार्थ्यांनी काय शिकावं हे विदयापीठ ठरवीत असले तरी आपल्या बौद्धिक विकासाला आपण शिकतो ते खरोखरच पोषक व आवश्यक आहे कि नाही, हेही प्रतेय्क विद्यर्थ्याने पहिले पाहिजे, विद्यपीठाच्या प्रतेय्क हालचालीवर कटाक्षाने लक्ष असले पाहिजे, आपले तसेच समाजातील उपेक्षित वर्गाला आपले कायदेशीर तसेच निसर्गसिद्ध हक्क मिळवण्यासाठी “प्राणयज्ञदल संस्था” ठिकठिकाणी स्थापन केल्या पाहिजेत.” मुख्यतः हे विद्रोही लिखाण आणि विचार समाजात पसरणे गरजेचे आहे.
जार्विस गिव्हन्स दाखवतात की फुजिटिव्ह अध्यापनशास्त्राच्या अभ्यासासारखे काहीतरी टिकवून ठेवण्यासाठी, तुम्ही फक्त अराजक, एपिसोडिक, वीर पुढाकार यावर अवलंबून राहू नका,” तो म्हणतो की, “तुम्हाला या सामग्रीभोवती समुदाय तयार करावा लागेल.”
मानवी हक्कांसाठी केलेला महाड सत्याग्रह हा शिकावला जात नाही कारण तो सामान्य ग्राउंड मध्ये बदल घडवून आणायची ताकत बाळगतो. ते अशा ज्ञानाची निर्मिती करते ज्यात नवीन अनुभव निर्मितीच बीज आहे, जे उच्चवर्णीय प्रबळतेला धोकादायक ठरते. ओलूफेमी तैवो यांनी म्हटल्याप्रमाणे, “जेंव्हा आपण सामायिक ग्राउंड ला यशस्वीपणे आव्हान देतो तेंव्हा आपण सामाजिक वातावरणात बदल घडवतो.”(3)

बोज्जा थारकम यांनी म्हटल्याप्रमाणे, “महाड एक जिवंत वर्तमान आहे. जेव्हा जेव्हा मानवी हक्क पायदळी तुडवले जातात तेव्हा महाड इशारा करतो आणि जोपर्यंत मानवी प्रतिष्ठा नाकारली जाते तोपर्यंत महाडची गरज वाढते.”

References
1] महाड-द मार्च दॅट इस लौंचंड एव्हरी डे- बोज्जा ठराकम
2] BAWS Volume 1 Part 1
3] एलिट कॅपचर- ओलूफेमी तैवो
4] फुजिटिव्ह पेडागॉजि- जार्विस गिव्हन्स
5] EWS- The quota to end all quotas

डॉ भूषण अमोल दरकासे

लेखक VDGMC हॉस्पिटल, लातूर येथे सहायक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत.

१) डिसेंबर २९/२०२२
पेरियार चळवळीचे माहेरघर असलेल्या तामिळनाडूमधील इरायुर गावात जातीय भेदभावाची धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे अनुसूचित जाती समुदायासाठी असलेल्या पाण्याच्या टाकीत मानवी विष्ठा टाकलेली आढळून आली आहे. तपासासाठी गेलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले कि ही भीषणता संपलेली नाहीये गावात आजही अस्पृश्यता आहे.

२) डिसेंबर २८/२०२२
तीन आंबेडकरायट तरुणांना मनुस्म्रुती जाळल्याबद्दल राजस्थान बारमेर येथे अटक करण्यात आली

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*