(भाग दुसरा)

पहिला भाग लिहून आज सात महिने उलटली जरा जास्तीच उशीर झाला, मुळात त्यांच्या भाषणाला मराठीत ट्रान्सलेट करने ते ही शब्दशः हे सोपं होतं, पण त्यातला भावना आपल्यापर्यंत कशा पोहोचवता येतील, या प्रयत्नात त्याचे ट्रान्सलेशन लांबवलं, मुळात मला आधी ते समजून घ्यायचं होतं, कारण हे केवळ भाषण नसून पंधराव्या शतकापासून चालत आलेल्या कृष्णवर्णीय गुलाम व्यवस्थेला दिलेली चमाट होती. या नंतर करोडो कृष्णवर्णीय लोकांना त्यांच्या हक्क व अधिकाराची जाणीव झाली, मानवतावादी विचारास गती मिळाली, मानवतावादी समाज व्यवस्था कृष्णवर्णीय लोकांसाठी युरोपियन देशात उदयास येऊ लागल्या, त्यामुळे 19 व्या शतकाच्या अखेरीस या भाषणांनी जगातील एका मोठ्या जनसंख्येवर इम्पॅक्ट टाकला.
अथक परिश्रमांना समोर जाऊन देशद्रोहाचा डाग, सामान्य जनतेला भडकवण्याचे आरोप व स्थानिक मीडिया या सर्वांना प्रत्युत्तर देत मंडेला लोकशाही पद्धतीने निवडणूक जिंकून साउथ आफ्रिकेचे प्रेसिडेंट बनले आणि हजारो वर्षापासून सोसलेल्या हालअपेष्टा, अपमान, हीन वागणूक या सर्वांचा एका क्षणात कणा मोडला. मंडेलांचं भाषण खरंतर प्रेसिडेंट या नात्याने केलेले भाषण हे ऐकण्यासाठी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जगाचा कानाकोपऱ्यातून प्रतिष्ठित नेते मंडळी, पत्रकार, (कृष्णवर्णीय) ब्लॅक मोमेंट मधील नेते व सामाजिक कार्यकर्ते आली होती. तिथे उपस्थित सर्वांना माहिती होतं आणि सर्व जगातून पाहणाऱ्यांना सुद्धा ! हे भाषण केवळ भाषण नव्हे ! तर या भाषणाने एक देशातील करोडो कृष्णवर्णीय लोकांना त्यांच्या अधिकारांची, त्यांच्या स्वातंत्र्यांची आणि त्यांच्या हक्कांची त्यांना ओळख करून दिली. त्यांना लढायला शिकवलं ते या जगात, या विश्वात एकटे नाहीत हे त्यांना दाखवून दिल.

मंडेला यांचे नाव घेण्यात आले, डायस वरच्या माईक पर्यंत चालताना त्यांचा पूर्ण जीवन प्रवास रिकॅप झाला असेल नाही का ? अज्ञातवासात घालवलेले दिवस, आपल्या परिवारापासून मित्रांपासून दूर, तुरुंगात काढलेले दिवस, हक्कांसाठी दाद मागितलेले दिवस या सर्वात ज्यांनी त्यांना हिन वागणूक दिली, आज तेच त्यांचा जय जय कार करत होते, एवढ्या कठीण संघर्षमय आयुष्यात ते बोटावर मोजण्याइतके पावले त्यांच्या स्मरणात अजरामर झाली असावीत.

त्यांच्या भाषणास सुरुवात झाली, जनतेच्या टाळ्यांचा गडगडात हा आजवर झालेल्या अन्याय, अत्याचाराची परतफेड व आक्रोश करत होता, डोळ्यात नक्कीच आनंद अश्रू होते. यात एक दीर्घ श्वास घेऊन मंडेला यांनी साउथ आफ्रिकेचा प्रेसिडेंट या नात्याने आपल्या भाषणास सुरुवात केली, ते बोलले ‘कॉम्रेड’स व माझे मित्र’, आलेल्या पाहुण्यांना सन्मानित करून, त्यांनी पूर्ण जगासाठी आजचा आनंद उत्सव आहे असं सांगितलं. त्यांनी हा विजय, विजय नसून आशेचा किरण आहे. जगात जन्मणाऱ्या उदारमतवादी सामाजिक व्यवस्थेसाठी, आज आपण सर्व जगाला मानवतावादी संदेश दिला आहे. गुलामी करणारे आम्ही आज जगासमोर या देशाला रिप्रेझेंट करत आहोत. या सुंदर देशाचे आपण ही एक छोटासा भाग आहोत. या मातृभूमीशी आपण सर्वांनी सामायिक केलेली अध्यात्मिक मुक्ती आणि भौतिक एकता आपण सर्वांनी आपल्या अंतकरणात वाहून घेतलेल्या वेदनांची खोली स्पष्ट करते, कारण आपण आपला देश एका भयंकर संघर्षात विखुरलेला आणि आपण त्याला लोकांकडून तिरस्कार, बेकायदेशीर आणि एकटे पडलेले पाहिले होते, कारण इथे वंश द्वेष आणि वंशिक दडपशाही विचारसरणीचा आणि प्रथेचा सर्वत्र आधार बनला होता.
आम्हाला दक्षिण आफ्रिकेतील लोकांनी मानवतेने आम्हाला पुन्हा आपल्या कुशीत घेतले आहे, हे पूर्ण झाल्याची भावना आहे, की आम्ही जे फार पूर्वी कायद्याने दोशी नव्हतो, आज आम्ही स्वतःहून जगातील राष्ट्राचे यजमान बनण्याचा दुर्मिळ विशेष अधिकार प्राप्त केला आहे.
आम्ही शांतता, समृद्ध, गैर-लिंगवादी, गैर-वंशवादी आणि लोकशाही निर्माण करण्याचा आव्हानाला तोंड देत असताना, तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहाल, याचा आम्हाला विश्वास आहे. या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी आमचा जनतेचा जनसमुदायांनी आणि त्यांच्या राजकीय जन लोकशाही, धार्मिक, महिला, तरुण, व्यापारी, परंपरा आणि इतर नेत्यांच्या भूमिका आम्ही मनापासून कौतुक करतो. आम्ही आमच्या सुरक्षा दलांना आमच्या पहिल्या लोकशाही निवडणुका सुरक्षित करण्यात आणि लोकशाहीचा संक्रमणामध्ये त्यांनी बजावलेल्या विशिष्ट भूमिकेबद्दल आभार मानतो, रक्ताचा तहानलेल्या शक्तींना श्रद्धांजली अर्पण करू इच्छितो आणि अजूनही प्रकाश पाण्यास नकार देत आहेत अशा शक्तींना थांबवण्याची आणि आपल्यात फूट पाडणारी दरी पूर्ण करण्याचा क्षण आला आहे.
शेवटी आपण आपली राजकीय मुक्ती मिळवली आहे आम्ही आमचा सर्व लोकांना दारिद्र्य, वंचितता, दुःख, लिंग आणि इतर भेदभाव याच्या सततच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी स्वतःला वचन देतो. आम्ही सापेक्ष शांततेच्या परिस्थितीत स्वातंत्र्यासाठी आमचे शेवटचे पाऊल उचलण्यात यशस्वी झालो, आम्ही पूर्ण न्याय आणि शांततेच्या निर्मितीसाठी वचनबद्ध आहोत. आमच्या लाखो लोकांच्या छातीत अशा रोवण्याचे प्रयत्नात आम्ही विजयी झालो आहोत. आम्ही एका करारात प्रवेश करतो की, ‘आम्ही असा समाज तयार करू, ज्यामध्ये सर्व दक्षिणआफ्रिकन कृष्णवर्णीय त्यांच्या अंतकरणात कोणतेही भीती न बाळगता उंच मान करून चालण्यास सक्षम असतील, त्यांच्या मानवी प्रतिष्ठेचा अविभाज्य अधिकाराची खात्री बाळगतील. आपल्या देशाच्या नूतनीकरणाच्या वचनपद्धतीचे प्रतीक म्हणून राष्ट्रीय एकात्मतेचे नवीन अंतरिम म्हणून सरकार सध्या कारावास भोगत असलेला आपल्या लोकांच्या विविध श्रेणीसाठी कर्जमाफीच्या समस्येकडे लक्ष देईल.
आम्ही हा दिवस या देशातील आणि जगातील सर्व नायक आणि नायकांना समर्पित करतो, ज्यांनी अनेक मार्गाने बलिदान दिले आणि आपले जीवन समर्पण केले, जेणेकरून आपण मुक्त होऊ शकतो. त्यांचे स्वप्न सत्यात उतरली आहेत, स्वातंत्र हे त्याचे बक्षीस आहे. आपण दक्षिण आफ्रिकेतील लोकांनी एका संयुक्त लोकशाही गैर-वांशिक आणि गैर-लैंगिक सरकारचे पहिले अध्यक्ष म्हणून आम्हाला दिलेला सन्मान आणि विशेष अधिकार पाहून आम्ही दोघेही नम्र आहोत.
“स्वातंत्र्याचा कोणताही सोपा मार्ग नाही हे आम्हाला समजले आहे”, आपल्यापैकी कोणीही केवळ अभियान करून एकटे यश मिळू शकत नाही, हे आपल्याला चांगले माहिती आहे, म्हणून आपण राष्ट्रीय सलोख्यासाठी राष्ट्र-उभारणीसाठी नवीन जगाच्या जन्मासाठी म्हणून एकत्रित काम केले पाहिजे.
सर्वांना न्याय मिळू दे..
सर्वांस सर्वांसाठी शांतता नांदु दे..
सर्वांसाठी काम, भाकरी, पाणी आणि मीठ असू दे..
प्रत्येकाला कळू द्या की प्रत्येकासाठी शरीर, मन आणि आत्मा स्वतःला पूर्ण करण्यासाठी मुक्त केली गेली आहे, ही सुंदर भूमी पुन्हा अत्याचाराचा अनुभव घेईल आणि अपमान सहन करेल असे पुन्हा कधीही होणार नाही. मानवातेचा कर्तुत्ववाचा सूर्य कधींही मावळणार नाही. देव आफ्रिकेला आशीर्वाद द्या.
थँक्यू…
असे म्हणून त्यांनी हात वर केला आणि या भाषणाने जगातील सर्व कृष्णवर्णीय लोकांमध्ये नवीन स्फूर्तीदायी शक्ती प्रकट झाली, मान-सन्मान, हक्क, अधिकार यात दबलेली आवाजे आज मुक्तपणे गगन भेद भरारी घेत होती. हा विजय केवळ साऊथ आफ्रिकेतील कृष्णवर्णीय लोकांचा नसून पाश्चात्त्य राष्ट्रात इसवी सन पंधराव्या शतकापासून गुलामी सहन केलेल्या प्रत्येक कृष्णवर्णीय गुलामाची ही मुक्ती होती. मागील काही वर्षात आपण पाहिलेला BLM हा उठाव आणि सर्व जगाने त्याला समर्थन दिले, याची कुठेतरी बीज या भाषणात, याच क्रांतीत, यांच्या कार्यात रोले गेलेले आहेत. यावर कित्येक नवीन संघटनेचा जन्म झाला, हक्क अधिकाराचा एक नवीन महासागरात आफ्रिका नाहून निघाली आणि कित्येकांना सोबत घेतलं व त्यांची सन्मांनाची लढाई ही त्या डाईस वरून केलेल्या भाषणात अजरामर झाली..
अपूर्व कुरूडगीकर
लेखक मूळचे नांदेड येथील रहिवासी असून IT क्षेत्रात कार्यरत आहेत, तसेच ते Panther Talks चे संपादक आहेत.

Leave a Reply