छ. शाहू महाराजांवर संपादित पुस्तकासाठी लेख पाठवण्याचे आवाहन.

फुले शाहू आंबेडकर हे भारताच्या सामाजिक लोकशाही विचारविश्वाचे आधारस्तंभ. पाठ्यपुस्तकं आणि अकॅडेमियाने यांना नेहमी ‘मार्जिन’ चे विचारवंत म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला. खरंतर बहुजन हिताचा विचार करणारे फुले-शाहू-आंबेडकर हे विचारविश्व या देशाचा मुख्य प्रवाह असायला हवा.
चिंतनात रमून विचार करणारा तो विचारवंत या पांडित्यपूर्ण संकल्पनेचा आणि पाश्चिमात्य परंपरेचा प्रभाव म्हणून आपण ‘समाजसुधारक’ वेगळे विचारवंत वेगळे अशी गफलत करतो. जातीव्यवस्थेवर प्रहार करू न शकलेला, ब्राह्मणी वर्चस्व अबाधित ठेवणारा ‘तथाकथित बंगाली रेनेसां’ यावर बौद्धिक खर्च केले गेले. पण त्याचवेळी, त्याच्याही आधी महाराष्ट्रात सुरू झालेला ‘सामाजिक रेनेसां’ हा सर्वांगीण अर्थाने आपल्या देशातील सामाजिक परिवर्तनाचा पाया आहे. याला अजूनही अधोरेखित करण्याची गरज आहे.

शाहू महाराज हे एकाच वेळी स्टेस्ट्समन आणि द्रष्टे विचारवंत होते. शाहू महाराजांनी आपल्या कार्यकाळात जे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मॉडेल्स उभे केले; बहिष्कृत वर्ग, शूद्र समाज, भटके, मुस्लिम आणि सर्वच मागास समूहांना सोबत घेऊन सामाजिक प्रगतीचे प्रयत्न केले. ते राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक सर्वच आघाड्यांवरील कार्य आणि क्रांतिकारक विचार हे लोकशाहीचे मॉडेल देणारे आहेत.
आर्थिक बदलाच्या व्यवस्थेत संसाधनांची मालकी दलित-मागासवर्गीयांकडे कशी जाईल यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न; बाबासाहेब आणि शाहू महाराज यांच्यात असलेले सामाजिक लढ्याविषयचे समनव्ययन आणि संवाद; गुन्हेगारी मानल्या गेलेल्या समूहाचे शाहूंनी केलेले पुनर्वसन; सामाजिक न्यायाचा संवैधानिक मार्ग म्हणून केलेली आरक्षण तरतुद; ब्राह्मणी धर्मवर्चस्वाविरोधात दिलेला लढा या आणि अशाप्रकारच्या अनेक विषयांवर लेखन करून शाहूंच्या कार्य आणि विचारांची पुन्हा मांडणी करण्याचा हा प्रयत्न. आजच्या परिस्थितीत सामाजिक चळवळीला आणि बहुजन जनतेला त्यातून कशी दिशा मिळते यावर विचारमंथन व्हावे यासाठी हा शाहू महाराजांवरील संपादित पुस्तकाचा प्रकल्प.

लेख पाठवण्यासाठी :

ईमेल : marathi@roundtableindia.co.in
Whatsapp: 77559 31239
शब्दमर्यादा 1500 ते 5000 शब्द.

(टीप – लेख केवळ word file ने पाठवावे, pdf ने पाठवू नये)

टीम, भीमाच्या लेखण्या

1 Comment

  1. खूप छान उपक्रम!
    मी लेख नक्की देतो 👍

Leave a Reply

Your email address will not be published.


*