बा जोतीबा…! तुच होतास
म्हणून आम्ही अ, आ, ई शिकलो.तु कित्येक पिढ्यांचा खरच बा झालास.
तुझ्यातील संवेदनशीलतेने आमच्या आत्मसंम्मानाची ज्योत आजही तेवत आहे.
पण बा…
स्त्री म्हणून आजही हा समाज,मनातील भिती सांगण्यास परवाणगी देत नाही.
बा जोतीबा..! तुच होतास म्हणून,
माझ्या आया बहिनींना फक्त छतच नाही तर,मायेची ऊब मिळाली.आमची ढाल बनून,कायम तू सोबत होतास.
बा जोतीबा..! आज तु असतास न,तर, या महाराष्ट्रात काय तर,देशात वेश्या व्यवसाय चालवण्याचे धाडस कुणी केले नसते.
बा जोतीबा..!तु दिलेल सार्वजनिक सत्यधर्म परिवर्तनाचे, विश्व बंधुत्वाचे तत्व मानते पण आमची पीढ़ी तर गुलाम बनवणाऱ्या धर्माला विश्व मानते.
बा जोतीबा..!तु लिहिलेला शेतकऱ्याचा असूड नवा कृषक निर्माण करतो पण आज शेतकऱ्याला न्यायाची भीक मागावी लागते कारण तु दिलेला इशारा सांगण्यात आणि समजावण्यात शिक्षितच कमी पडतो.
बा जोतीबा..!तुझ्यासारखा कष्टकरी कुडवाड्यांचा प्रतिनिधि स्वत: शिवाजी राजे चा पोवाडा गातो आणि छत्रपती राज्याची समाधीचा शोध घेतो आणि आमचे बाप बंधू स्त्री पुरुष समानतेची त्यांना सोयीस्कर अशी अंध पट्टी कपाडाला बांधून स्वत:ला शिवबा चे भक्त मानतो.
बा जोतीबा..! तु लिहिलेल तृतीयरत्न नाटक सामाजिक विषयावरचे पहिले स्वतंत्र नाटक ठरते.हे नाटक शोषणापासून मुक्त होण्यासाठी एकच मार्ग सांगते शिक्षण. पण शिक्षित पीढी तर अंधश्रद्धेला खतपाणी घालते.
बा जोतीबा..! तु स्थापित केलेला सत्यशोधक सामाज परिवर्तनाची दिशा दर्शविते पण आमची शिक्षित पिढी रुढीं,कर्मकाडांना बळी पडते.
आमचे बंधु नाही सोडू शकले पितृसत्ता च अहंम माजवायला जो अहंम संपूर्ण मानवजाती साठी घातक आहे.
आम्हाला तर्कशुध्दतेचे धडे शाळेच्या वर्ग खोल्यांमधे शिकविल्याच गेले नाही.
बा जोतीबा..! तु पुन्हा परत येऊ नको आमचा ‘बा’ म्हणून तुझ्या पराक्रमाच्या वीजा मनात सडसडत आहेत क्रांतीसाठी तुझ्या हातातील मला मशालरूपी पुस्तक व्हायचं.
ज्यात ज्योती आणी साऊ ने रुजविलेले धड्यांचे निखारे,
पेट घेतील बंड करण्यासाठी, जगण्यासाठी, संघर्षासाठी.
मिनल शेंडे
लेखक आणि कवयित्री आहे.भंडारा येथील रहिवासी असून Buddhist studies ची विद्यार्थी आहे.
- जागतिक महिला दिन आणि आम्ही. - March 8, 2024
- अयोध्या तर एक झलक आहे, काशी-मथुरा बाकी आहे : ब्राह्मणी मिथकांची पोलखोल - January 22, 2024
- बा जोतीबा…! तू होतास म्हणून - May 19, 2023
Great… Minal.. keep it up..
🌹🍫👍