बाबांची रामू कारुण्याची मूर्ती

आदिती रमेश गांजापुरकर

बाबांची रामू कारुण्याची मूर्ती

“बाबांची रामू” हे ज.वी.पवार सर यांनी 2014 ला लिहिलेले पुस्तक माझ्या हाती फार उशिरा आले. मी 10व्या वर्गात असताना यशवंत मनोहर सराचं रमाई हे पुस्तक वाचलं होत,त्या नंतर रमाईला जवळून जाणून घेता आल ते बाबाची रामू या पुस्तकातून. अगदी पुस्तकाच्या सुरवातीपासून ते शेवटपर्यंत रमाईच्या प्रत्येक गुणाची प्रचिती होत असताना नकळत ऊर दाटून येत होता अक्षरशः डोळे अश्रूंनी भरून येत होते. अत्यंत संवेदनशील भावनिक मायाळू सोज्वळ आणि तेवढीच कर्तुत्ववान ध्रेयवान रमाई होती.
इतका भावना विव्हळ रमाईच्या मायेचा ओलावा मनमेंदूला स्पर्श करून जातो पुस्तकातील सगळे क्षणनिक्षण आपल्या समोर घडतोय असं प्रकर्षण जाणवत होतं.
महानायिका माता रमाई समस्त आंबेडकरी समाजाची माय माउली आहे. रमाईचा त्याग आणि कर्तृत्व हाच आंबेडकरी समाजाचा ठेवा आहे महिलांचा तो आदर्श आहे. माता रमाई ने आपले अवघे जीवन बाबासाहेबांच्या कार्याप्रती समर्पित केले म्हणून बाबासाहेबांना शून्यातून जग निर्माण करता आले युगायुगांमध्ये
जे कार्य होऊ शकले नाही ते बाबासाहेबांनी चाळीस पंचेचाळीस वर्षात केले.
मासाच्या गोळ्यांना त्यांनी ताठर केले कणाहिनाना कणा दिला,
पंखविहीन पक्षांना पंख दिले, पंखात बळ ओतले स्वाभिमानानी जगणं शिकवलं त्यामुळेच सरपटणारे प्राणी गरुड झेप घेऊ लागलेत. या सगळ्या किमयेचे किमयागार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि या मोठ्या किमयेच्या भागीदार बाबासाहेबांच्या लढ्याचे ऊर्जास्त्रोत आहेत माता रमाई.

रमाई बाबासाहेब यांच्यातील संवाद तर जीव ओवाळून टाकावा असे प्रंचड भावनिक स्फूर्ती निर्माण करणारे आहेत. एकमेकांबद्दल असणारा मोलाचा अभिमान आदर प्रेम काळजी..

रमाई बाबासाहेबांना पत्र लिहितात…
साहेबांच्या चरणी रमाचा शिरसाष्टांग नमस्कार आपलं पत्र मिळालं ते वाचून खूप आनंद झाला.आपण आमची काळजी करू नका आम्ही खुशाल आहोत. इकडे मी सगळं सांभाळीन.मला कष्टाची परवा नाही.लहानपणा पासून कष्टच करते आहे.तुम्ही मात्र खूप शिकलं पाहिजे मी आहे ना तुमच्या पाठीशी.आपण आपली काळजी घ्या.वेळच्या वेळ जेवण घ्या. यशवंत आणी मुकुंदला तसेच घरातल्या सगळ्याना तुमचं पत्र मी वाचून दाखवीलं ती सगळी खुश झाली आपली काळजी घ्या आणि असेच पत्र पाठवून खुशाली कळवा.

  • आपली पत्नी सौ.रमा भीमराव आंबेडकर

बाबासाहेबांची समाजाबद्दल असलेली तळमळ समजून मोठ्या कष्टाने स्वाभिमानाने संसाराचा गाडा हाकत बाबासाहेबांना आयुष्यभर खंबीरपने साथ देणारी माता रमाई युगयूगांची माऊली झाली…

आदिती रमेश गांजापुरकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*