अयोध्या तर एक झलक आहे, काशी-मथुरा बाकी आहे : ब्राह्मणी मिथकांची पोलखोल

लेखक : डॉ. रत्नेश कातुलकर

मराठी अनुवाद : मिनल शेंडे.

९० च्या दशकात मंडल आणि कमंडल या दोन ऐतिहासिक राजकीय चळवळी झाल्या. वी. पी. सिंह च्या नेतृत्वात मंडल चळवळ सामाजिक न्यायावर आधारित होती तर कमंडल यांनी रामजन्मभूमी मंदिराने हिंदू च्या धार्मिक भावना जागृत केल्या. याचा प्रभाव जनमानसावर मंडल चळवळ पेक्षा जास्त झाला एवढेच नाही तर ओबीसी समुहाचा आरक्षणाचा मुद्दा बाजूला राहीला आणि संपूर्ण लक्ष राम मंदिराकडे वेधले गेले. या मंदिर आंदोलनाला उजव्या विचारसरणीचे धार्मिक आवरण असून देखील त्याचे समर्थक एक तार्किक युक्तिवाद मांडताना दिसत आहेत की, ऐतिहासिक चूक सुधारण्यासाठी त्यांचे हे आंदोलन आहे . त्यांचा युक्तिवाद असा आहे की मुस्लिम आक्रमकांनी आणि राज्यकर्त्यांनी राम जन्मभूमीसह अनेक हिंदू मंदिरे नष्ट केली होती तर मग, आधुनिक धर्मनिरपेक्ष राज्यात या ऐतिहासिक अन्यायाला संपवून त्याला पुन्हा मुळ स्वरुपात आणण्यात गैर काय आहे?

दुर्दैवाने फार कमी उदारमतवादी, धर्मनिरपेक्षतावादी आणि पुरोगामी यांनी या तर्कावर असा प्रतिसाद दिलेला दिसून येतो की, केवळ ऐतिहासिक पुराणकथा आणि सत्याच्या वादात न पडता भारतात धर्मनिरपेक्षता टिकवून ठेवणे आणि जोपासणे हा त्यांचा मुख्य मुद्दा होता. अशा प्रकारे कोणताही विरोधाभास टाळण्यासाठी त्यांनी ती यथास्थिति कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. या दाव्याला विरोध करण्याच्या प्रयत्नात काही डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी औरंगजेबाला धर्मनिरपेक्ष सम्राट म्हणून दाखविण्यात खूप कष्ट घेतले. औरंगजेब हिंदू मंदिरांना अनुदान देत होता. उज्जैनमधील मंदिर हे त्यापैकी एक आहे. त्या आधी मुघल सम्राट अकबराच्या दिन-ए-इलाही आणि इतर धर्मनिरपेक्ष प्रयत्नांनी मुख्य प्रवाहातील इतिहासात ओळख मिळवली आहे .

मात्र, हिंदू राष्ट्रवाद्यांच्या आरोपांवर मौन धारण करून, मुस्लिम हल्ले आणि हिंदू मंदिरे बळकावल्याचा बहुचर्चित आरोप जनतेनेच नव्हे तर बुध्दीजीवी विचारवंतांनीही सत्य म्हणून स्वीकारला आहे. अलीकडील एका लेखात [i], न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी ते केवळ स्वीकारले नाही तर त्यांनी हे सांगून सिद्ध केले आहे की, ‘अनेक हिंदू मंदिरे मुस्लिम आक्रमकांनी उद्ध्वस्त केली आणि त्यांच्या जागेवर मशिदी बांधल्या‌ आहेत. उदाहरणार्थ, दिल्लीतील कुतुबमिनार जवळील कुव्वत उल इस्लाम मशीद मधे हिंदू कोरीवकाम असलेले खांब आहेत किंवा वाराणसी मधे ज्ञानवापी मशीद ज्याच्या मागील भिंतीवर हिंदू कोरीवकाम आहे किंवा जौनपूरमधील मधे अटाला देवी मशिद. पुढे ते असे म्हणतात की, मग भारताने पुढे जायचे की मागे? आज जर एक हिंदू मंदिर बेकायदेशीरपणे पाडून त्याचे मशिदीत रूपांतर झाले तर त्याचा विरोध झाला पाहिजे. पण जिथे हे कथितरित्या ५०० वर्षांपूर्वी केले गेले होते, तिथे या वास्तूला मूळ हिंदू म्हणून पुर्नसंचयित करण्यात काही अर्थ आहे का?’

याउलट, सुरुवातीपासूनच दलित-बहुजन चर्चे मधील विद्वानाचा युक्तिवाद हा कधीच बचावात्मक नसून, किंबहुना उजव्या विचारसरणीच्या विरोधात ते आक्रमकच होते. महात्मा जोतिबा फुले यांनी लिहीलेल्या गुलामगिरी या ग्रंथात ब्राह्मण आक्रमकांनी स्थानिक जनतेवर हिंसक हल्ले कसे केले, त्यांची जमीन कशी बळकावली आणि त्यांना शूद्र आणि अति-शूद्र असे लेबल लावून कायमचे गुलाम कसे बनवले हे लोकांना पटवून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्राचीन भारतातील जातीय हिंसाचाराचा शोध घेतला आणि त्याद्वारे या निष्कर्षावर पोहचले की, भारताचा इतिहास हा बौद्ध आणि ब्राह्मणवाद यांच्यातील प्राणघातक संघर्षाशिवाय दुसरे काहीही नाही. त्यांनी असे शोधून काढले की, भारताने बौद्धांविरुद्ध अनेक सांप्रदायिक हिंसक आक्रमणे पाहली आहेत आणि बौध्द धर्माला लुप्त केल गेल आहे.

अयोध्येतील वादग्रस्त जागेवर नुकत्याच झालेल्या उत्खननाने हे तथ्य पुन्हा एकदा समोर आले आहे. भाजपच नेतृत्व करणारी हरियाणा सरकार ने आपल्या राज्यात सरस्वती नदी सरस्वतीच्या खुणा शोधण्यासाठी जोरदार प्रयत्न केले पण फक्त पुराणामधे उल्लेख सापडतात जमीनीवर मात्र काहीच अता-पता नाही. परंतु बौद्ध धर्मग्रंथांवर आधारित भारताचा इतिहासाचा शोध घेण्याइतका कोणताही भारतीय इतिहासकार प्रामाणिक दिसत नाही ही शोकांतिका आहे. ब्रिटीश पुरातत्वशास्त्रज्ञ अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी चिनी प्रवाशांच्या लिखाणातून आणि इतर बौद्ध नोंदीं द्वारे भारताचा भूतकाळ शोधला. झुआनझांग यांनी ( ह्वेनसांग) नमूद केलेल्या स्थळांचा शोध घेण्यासाठी कनिंगहॅम नी कष्ट घेतले. कनिंगहॅम[ii] यांना अभ्यासात असे आढळून आले की सध्याच्या अयोध्या शहराला मूळतः साकेत या नावाने ओळखले जात होते. बौद्ध ग्रंथांमध्ये याचा खूप आदर आहे आणि त्याचा उल्लेख झुआनझांग आणि फॅक्सियन (फाहियान)यांनी त्यांच्या प्रवास वर्णनांमध्ये केलेला आहे. झुआनझांग (ह्वेनसांग)च्या मते, बुद्धांनी या शहरात सहा वर्षे घालवली होती. सर्वात प्रसिद्ध बौद्ध उपासिका विशाखा, पूरण वर्धनाशी लग्न करण्यापूर्वी या शहरातील रहिवासी होती. अगदी स्वाभाविकच आहे की, बुध्दाचा साकेतशी या संबंधाने सम्राट अशोकचे सुध्दा लक्ष आकर्षित केलेल होत.

सम्राट अशोकाने साकेत येथे २०० फूट मोठा स्तूप बांधला जो बऱ्याच काळापासून सुरक्षित होता आणि त्याचे वर्णन झुआनझांगने( ह्वेनसांग)केले होते. त्याने एक मठ देखील पाहिला ज्याला कालकादर्मा किंवा पूर्वाद्र्मा म्हणून ओळखले जाते. हे मठ आज मणिपर्वताच्या सध्याच्या जागेच्या ढिगाऱ्याखाली हरवले आहे. पण ही नैसर्गिक प्रक्रिया नव्हती. या विषयी ब्राह्मणांनी कनिंगहॅमला सांगितले की, हा पर्वत वानर राजा सुग्रीव च्या चुकीचा परिणाम आहे. त्याने चुकून मणिपर्वताला याच ठिकाणी पाडला होता. हा तोच पर्वत आहे ज्याचा उपयोग वानरांनी रामाच्या मदतीसाठी केला होता. पण खर हे आहे की, ही माहिती रामाच्या पुराणकथेशी जोडण्याचा ब्राह्मणी प्रयत्न आहे. या कथेची दुसरी बाजू कनिंगघम ला स्थानिकांकडून मिळाली. रामकोट चे मंदिर बांधून घरी परततांना रोज संध्याकाळी या ठिकाणी मजुरांनी आपल्या टोपल्या हलवल्याने हा ढिगारा तयार झाल्याची माहिती त्यांनी दिली. या जागेला आताही ‘झोवा झार’ किंवा ‘ओरा झार’ म्हणजे ‘टोपली हलवणं’ किंवा ‘टोपली खाली करन’असं म्हटले जाते.
यात किंचितही शंका नसावी की, बौद्ध वारसा लपविण्याचा हा ब्राह्मणवादी शक्तींचा मुद्दाम केलेला प्रयत्न होता. कनिंगघम ला नंतर माहिती झाल की, ही एकटी घटना नव्हती, अशीच कथा बनारस, निमसार आणि इतर अन्य बौद्ध स्थळांना लपवण्यात आले आहे. (कनिंगहॅम २०००: ३२३).

साकेत ने ब्राह्मणी शक्तींशी सतत संघर्ष पाहिला होता आणि या प्रक्रियेत त्याची ओळख नष्ट झाली आणि त्याचे नाव अयोध्या असे ठेवण्यात आले होते. या शहरावर पहिला मोठा हल्ला ब्राह्मण पुष्यमित्र शुंगाने मगध साम्राज्यावर विजय मिळविण्यासोबतच केला होता. त्याने शेवटचा मौर्य सम्राट बृहद्रथ चा वध केला आणि बौद्धांविरुद्ध रक्तरंजित अत्याचाराची मोहीम सुरू केली. हे देशासाठी घातक ठरले. बौद्ध विहार, जे सामूहिक शिक्षणाचे केंद्र होते, ते नष्ट केले गेले आणि ब्राह्मणी गुंडांनी भिक्षूंना मारुन टाकले होते या टप्प्याला प्रतिक्रांती म्हणून संबोधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहितात, ‘पुष्यमित्राच्या काळात बौद्धांचा किती निर्दयपणे छळ करण्यात आला त्याचा पुरावा पुष्यमित्राने बौद्ध भिक्खूंबाबत काढलेल्या एका जाहीर आदेशावरुन मिळतो. पुष्यमित्राने प्रत्येक बौद्ध भिक्खूचे शिर आणून देणाऱ्यांस सोन्याची १०० नाणी बक्षीस देणारा आदेश काढला होता. डॉ. हरिप्रसाद शास्त्री देखील उद्धृत करतात की, “सनातनी व कर्मठ शुंग साम्राज्याच्या काळात बौध्दांचा जो छळ झाला, त्याचे वर्णन करण्यापेक्षा कल्पनाच करणे योग्य होईल. चिनी अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे अजूनही बौद्ध, पुष्यमित्राच्या नावाचा उच्चार शाप देऊन करतात.”

तथापि, मुख्य प्रवाहातील इतिहासकार या घटनेची कोणतीही गंभीर दखल घेत नाहीत फक्त बौद्ध विद्वान ही घटना अत्यंत दुःखाने आठवतात. या प्रचंड सांप्रदायिक हिंसाचाराचे अवशेष शोधण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले आहेत. या क्रूर कृत्याचा एक जिवंत पुरावा शांती स्वरूप बौद्ध या विद्वानाने शोधून काढला आहे की, “सध्याच्या अयोध्येला लागून वाहणारी नदी सरयू म्हणून ओळखली जाते. पण शहरात पोहोचण्यापूर्वी आणि ते पार केल्यानंतर त्याला गंडक असे म्हणतात. त्यांचा प्रश्न असा आहे की, या मर्यादित भौगोलिक क्षेत्रात या नदीने आपले नाव कसे काय बदलले ? “
शांती स्वरूप बौद्ध उलगडा करुन सांगतात की, पालीमध्ये तसेच स्थानिक भाषेत ‘सर’ चा अर्थ ‘डोके’ असा होतो. हा संकेत घेऊन ते या निष्कर्षापर्यंत पोहोचले की पुष्यमित्र शुंगांने आपल्या माणसांना बौद्ध भिक्खू आणि जनतेचा शिरच्छेद करण्याचा आदेश दिला होता. सांप्रदायिक आक्रमण इतके अत्याचारी होते की गंडक नदीचा किनारा बौद्धांच्या शिरच्छेदाने भरला होता. त्यानंतर या मर्यादित भौगोलिक क्षेत्रात नदीच्या या भागाला सरयू ‘शिरच्छेदाने भरलेले’ (डोक्याने भरलेले) म्हटले जाऊ लागले. पुढे ते सांगतात की उत्तर प्रदेश च्या सध्याच्या योगी सरकारने या सांप्रदायिक हिंसाचाराच्या खुणा पुसण्याच्या प्रयत्नात सरयू नदीचे नाव बदलवून गंडक ठेवण्याचा ठराव मंजूर केला आहे. यावरुन स्पष्ट दिसून येते की या सांप्रदायिक हिंसेचे निशान मिटविण्याचा हा प्रयत्न आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शहरांचे नामांतर करण्याच्या जुन्या ब्राह्मणी युक्तीचाच ते अवलंब करीत आहे यात काही आश्चर्यजनक नाही.

तथापि, शुंगांचा हल्ला हा बौद्धांवरील सामूहिक हिंसाचाराचा एकमेव प्रसंग नव्हता. पण हा व्यापक स्वरूपाचा प्रथम हल्ला होता, नंतरच्या शतकांमध्येही बौद्ध धर्मावर निरंतर सांप्रदायिक आक्रमणे झालेली आहेत. इतिहासात दंगलीच्या फारच कमी नोंदी उपलब्ध होत्या परंतु हे सर्वज्ञात आहे की हूण (६वे शतक) आणि शशांक (७वे शतक) सारख्या राजांनी बौद्धांवर समान सांप्रदायिक आक्रमण केले. तरीही हे लक्षात घेण्यासारखे आहे की बौद्ध धर्म, संस्कृती आणि सभ्यता भारतीयांमध्ये इतकी खोलवर रुजलेली होती की, अशा सांप्रदायिक आक्रमणा नंतरही बौध्द धर्म संपुष्ट‌ करणे शक्य नव्हते. हा मुद्दा द्विज इतिहासकारांनी सुध्दा दुर्लक्षित केला आहे. परंतु आधुनिक लेखक ‘मुद्राराक्षस’ आणि ‘गेल ओमवेट’ हे दोनच विद्वान होते ज्यांनी या बाजूला समोर आणले.

बुद्धाचा व्यापक लोकप्रियतेचा प्रतिकार करू शकणारा कोणताही देव ब्राम्हणांकडे नसणे हे ब्राह्मणांसमोरील सर्वात मोठे आव्हान होते. बुध्दाची व्यापक लोकप्रियता असल्यामुळे बौद्ध स्थळांचा नाश, बौद्ध विचारवंत, जनतेची हत्या आणि पायाभूत सुविधांची प्रचंड हानी होऊनही बौध्द धर्मावर मर्यादित परिणाम झाला असला तरी जनसमुदाय च्या मनातून मात्र बुध्दाचा प्रभाव संपवू शकले नाही. आता पर्यंत केवळ ब्राह्मणवादाचे अतिरेकी वर्चस्व सिद्ध झाले, परंतु त्याची सामाजिक मान्यता अद्याप सिद्ध होणे बाकी होते.

म्हणून, सामाजिक श्रेष्ठत्व मोठ्या प्रमाणावर मिळविण्याच्या प्रयत्नात त्यांनी नवीन डावपेच आखले. बुद्धाचा मुकाबला करण्यासाठी एक मध्यवर्ती व्यक्तिमत्त्व निर्माण करण्यासाठी ब्राम्हणांनी साकेतमध्ये रामाची आख्यायिका तयार केली आणि बुध्दांचे अवशेष ला नष्ट करण्याच्या हेतूने साकेतचे नाव बदलून अयोध्या केले गेले आणि अशाच प्रकारे भगवान कृष्णा ला मांडण्यात आले आणि त्याच नाव प्रसिद्ध बौद्ध शहर मथुरा सोबत जोडण्यात आले.

साकेतमध्ये रामाचा कृत्रिम इतिहास निर्माण करण्यात ब्राम्हण राजा विक्रमादित्य (स्कंदगुप्त ) ४५५-४६७ ई.पर्यंत शासन केले, याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने खोडकरपणे अशोकाचे अनुसरण केले – अशोकाने आपल्या काळात बुद्धाशी संबंधित सर्व स्थळांचे पुनरुज्जीवन केले तसेच विक्रमादित्य ने केले. विक्रमादित्यचे कार्य मात्र इतिहासावर आधारित नसून खोटा इतिहास रचण्याचा प्रयत्न होता. विक्रमादित्य ने साकेत शहर, शुंग च्या प्रतिक्रांती मुळे ज्याला मुळ नाव गमावून अयोध्या म्हणून ओळखले जाऊ लागले, त्याचे रामकरन करुन रंगवण्यात आले. आणि तीन महान स्तूपांना त्यांची ओळख लपवण्यासाठी मणि पर्वत, कुबेर पर्वत आणि सुग्रीव पर्वत अशी नावे देण्यात आली. रामकोटच्या मंदिराच्या बांधकामामुळे बौद्ध स्थळ जमिनीच्या ढिगाऱ्याखाली कसे लपवले गेले याची चर्चा आपण आधीच केली आहे. रामाशी असलेले त्यांचे नाते दाखवून आणखी अनेक मंदिरे बांधली गेली. संपूर्ण भारतभर ८४ हजार स्तूप बांधणाऱ्या अशोकाशी स्पर्धा करण्याच्या प्रयत्नात, विक्रमादित्य ने एकट्या अयोध्येत ३६० मंदिरे बांधली.
मात्र, त्यावेळी ही रणनीतीही फारसा प्रभाव पाडू शकली नाही. त्याचे स्पष्ट कारण असे की, तोपर्यंत रामाच्या आख्यायिकेला फारशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. लोकांना ब्राह्मणी देवस्थानांना भेट देण्याची सवय नव्हती, कारण बौद्ध लोक स्तूपांवर धार्मिक अभ्यास करत होते. जनमाणस स्तूपांची पूजा करायचे अशा वेळेला राम मंदिर मधे जाण्याचा प्रश्नच येत नव्हता. परिणामी, भक्ता विना मंदिरांची अवस्था जर्जर झाली आणि येत्या काही वर्षांत विक्रमादित्याचा राम स्थळांना पुननिर्माण करण्याचा प्रयत्न स्वाभाविकपणे नष्ट झाला.

अलेक्झांडर कनिंगहॅम च्या म्हणण्यानूसार ‘सातव्या शतकापर्यंत विक्रमादित्यच्या मूळ मंदिरांपैकी तीनशे हून अधिक मंदिरे अगोदरच नाहीशी झाली होती तथापि, तेव्हा बौद्ध स्मारके सुस्थितीत असल्याचे दिसून येते. बनारस सारख्या शहराप्रमाणेच बौद्ध भिक्षूंची संख्या मोठ्या प्रमाणात होती.’

ब्राह्मणांना त्यांच्या धर्माला सामाजिक मान्यता मिळवून देण्यात सातत्याने अपयश आल्याने शेवटी त्यांना त्यात क्रांतिकारी बदल घडवून आणणे भाग पडले. जसे आपण सुरुवातीला बघितल की, ब्राह्मणवादाची त्यावेळची सर्वात मोठी कमतरता ही होती की बुद्धाचा मुकाबला करू शकेल अशी कोणतीही एक देवता यांच्याकडे नव्हती ज्याला भारतभर आणि इतर राष्ट्रांमध्येही जनता स्वीकारेल आणि आदर्श मानेल. आपण बघितल की, त्यांनी रामाला अयोध्या मधे स्थापित करण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु वेळेनुसार राम एक कमजोर पात्र सिध्द झाला जो बुध्दाचा मुकाबला करण्यात अपयशी ठरला म्हणून अयोध्येतील रामाच्या खोटा इतिहास शेवटी अपयशीच ठरला. ब्राम्हणवादी धर्माचा दुसरा अडथळा म्हणजे त्यांचा पारंपारिक यज्ञ अनुष्ठान ज्यामध्ये प्राण्यांची, विशेषतः गायी आणि बैलांची सामूहिक हत्या होती . हा यज्ञ केवळ ब्राह्मणांसाठी फायदेशीर होता जे कष्टकरी जनतेच्या प्राप्त उत्पन्नाचा उपभोग घेत होते परंतु ते कृषीप्रधान समाजाला महागात पडत होते. त्यांना पशुबळी विशेषता: बैल आणि गाय जे शेतीसाठी एक उपयोगी संपदा होते, त्यांचा बळी देणे सहन न होण्यासारखे होते. या कारणांनी ब्राम्हणवाद जनमानसात जागा करु शकला नाही.

ब्राह्मणवादाच्या अपयशाने शेवटी त्यांना बौद्ध धर्माचे अनुकरण करण्यास भाग पाडले. तथापि, मूळ बौद्ध धर्मात (बौद्ध धर्माचे अशोक रूप), ज्यामध्ये जन शिक्षण आणि समाजकल्याण समाविष्ट आहे, ब्राह्मणांसाठी अनुकरण करण्यासारखे यज्ञ विधी काहीही नाही. खरे तर सामाजिक भान आणि कल्याण हे ब्राह्मणवादाच्या विरुद्ध होते. तथापि, महायानात त्यांना आशा सापडली. हा बौद्ध संप्रदाय ब्राह्मणांना अनुकरण करण्याची भरपूर संधी देतो. महायान मधे बुद्धाच्या प्रतिमेची पूजा, बोधिसत्वाची सुंदर संकल्पना, जप, आणि बुद्धाची गीतात्मक उपासना करणे (जी अर्थातच थेरवाद परंपरेतही लोकप्रिय होती) आणि शाकाहार यामुळे ब्राह्मणांना एकप्रकारे संधी उपलब्ध करून दिली. त्यांनी महायानातील जवळजवळ प्रत्येक विधी घटक उधार घेऊन त्याचा स्वीकार केला आणि त्यात त्यांनी ब्राह्मणवादाला जोडले. त्यांना आपली संस्कृती आणि तत्व सोडावे लागले. ब्राम्हणांना त्यांची स्वतःची ओळख लपवावी लागली ही साधी-सोपी गोष्ट नव्हती. ब्रह्मा, इंद्र, अग्नी, वायू, मित्रा, नासत्य इत्यादी त्यांच्या वैदिक देवतांना सोडने आणि बुद्धाचा मुकाबला करण्यासाठी त्यांच्या जागी मानवी चेहरा आणण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. आपण चर्चा केली होती की या प्रयत्नात त्यांनी दोन नवीन मानवी देव निर्माण केले – राम आणि कृष्ण.

अयोध्येमधे केल्या गेलेले प्रयत्न हे संरचना च्या स्वरुपात आपला धर्म थोपवल्याने तिथे रामाच्या फारच मर्यादित परिणाम झाला चूक लक्षात आल्यावर त्यांनी आता रामावर चरित्रात्मक कथा विकसित करण्याचा एक नवीन दृष्टीकोन स्वीकारला. सुरुवातीला केवळ उच्चभ्रू वर्गातच त्याचा प्रचार केला जात असे. बहुधा त्यांचा ट्रिकल-डाउन सिद्धांतावर विश्वास होता. म्हणजे प्रथम उच्चभ्रू वर्गा चे मन बदलने नंतर हळूहळू ही मानसिकता खालच्या वर्गापर्यंत पोहचवने. गुप्त काळ (३२०-५५० ई.) हा ब्राह्मणी ग्रंथनिर्मितीचा शास्त्रीय युग असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळेच आधुनिक द्विज इतिहासकार या कालखंडाला सुवर्णयुग म्हणतात. पण या काळात ग्रंथ हे उच्चभ्रू वर्गापर्यंत सीमित होते म्हणून राम जनमानसात लोकप्रिय नाही होवू शकले. मुगल काळ सम्राट अकबराच्या(१५५६-१६०५) राजवटीत रामाला नंतर सर्वाधिक लोकप्रियता मिळाली जेव्हा अयोध्येतील ब्राह्मण तुलसीदास यांनी स्थानिक बोलीमध्ये रामाचे चरित्र रामचरितमानस रचले. तेव्हा मात्र लोकांच्या मनावर अचूक प्रभाव पडला. या पुस्तकात त्यांनी ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व सांगण्याची एकही संधी सोडली नाही.

अशा प्रकारे बुद्धाच्या जागी राम बसवायला दोन डझनहून अधिक शतके लागली. इतिहासकार ज्युलिया शॉ [ v] यांच्या मते, रामाच्या प्रचीतीला राजपूत काळात (१२ व्या शतकापासून) सुरुवात झाली होती. पण त्या बेकर यांच्या अभ्यासाचा हवाला देऊन म्हणतात की, ‘रामाच्या रंगात रंगून जाण्याची प्रक्रिया १५ व्या आणि १६ व्या शतकाच्या नंतरच्या पुनरावृत्तीतच समोर येते जेव्हा हे जुने स्थळ ‘राम च्या रंगात रंगून गेले. यात तुलसीदास च्या रचनेची महत्वपूर्ण भूमिका आहे. बेकर च्या मते, १०व्या शतकात राम च्या जन्माचा दावा केला गेला नव्हता…१८व्या शतकात पोहचेपर्यंत अयोध्याला राम जन्म च्या स्थळाशी जोडले गेल आणि तेव्हा पासून हे एक अखिल भारतीय स्तरावर रामाच तीर्थस्थळ म्हणून ओळखल जात आहे.

एक-दोन अपवाद वगळता, ११व्या आणि १२व्या शतकापर्यंत- भारतात कुठेही, स्वतंत्र आणि व्यापक राम पंथाचा पहिला पुरातत्त्वीय आणि शाब्दिक पुरावा उदयास आला नाही. त्यामुळे, जन्मभूमीवरील १०व्या शतकातील राममंदिराच्या अद्याप पुष्टी न झालेल्या पुराव्यांशिवाय, ११व्या आणि १२व्या शतकापर्यंत अयोध्या आणि राम यांच्यातील पहिल्या थेट संबंधांबाबत तर्क करता येणार नाही आणि यात आश्चर्यकारक काहीच नाही. याची निर्मीती या क्षेत्रामध्ये राजपूतांच्या (राजस्थानातील एक रियासत कुळ) मोठ्या प्रमाणात वस्ती झाल्यामुळे झाली… हिंदू मंदिर बांधणीवर मुघलांनी बंदी घातल्यानंतर १८व्या शतकापर्यंत पुरातत्व विभागातील अंतर असूनही, याच काळात अयोध्या एक मंदिराच्या स्वरूपात विकसित झाला. (बेकर १९८६)

अशा प्रकारे ब्राह्मणवादाचा चौदाशे वर्षांहून अधिक काळचा सातत्यपूर्ण धूर्त आणि हिंसक सांप्रदायिक अजेंडा आहे ज्याचा परिणाम म्हणून बौद्ध धर्म आणि अन्य छोटे स्थानिक धर्म भारतातून नामशेष झाले. भारतीय जनता, जे बौद्ध संस्कृति विशेषतः अशोकाच्या वेळी ८०%साक्षर आणि शिक्षित बनली होती ज्याच प्रमाण आपल्याला अशोक च्या विभिन्न शिलालेखातून प्राप्त होते. विहारां वर आक्रमणाने सर्वसामान्य जनतेला शिक्षणापासून वंचित करण्याचा मोठा धक्का होता यामूळे भारतीय अक्षरशः निरक्षर आणि अज्ञानी बनण्यास भाग पाडले गेले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सत्याकडे द्विज इतिहासकारांपैकी कोणीही याकडे लक्ष दिले नाही. त्यांच्या दृष्टीने ही केवळ धार्मिक हिंसा होती.

मागच्या वर्षी, सुप्रीम कोर्ट च्या निर्णयानंतर जेव्हा अयोध्येच्या वादग्रस्त जागेवर झालेल्या उत्खननाने रामाचा अयोध्येशी संबंध नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध होते. हे केवळ बौद्ध स्थळ आहे यात किंचितही शंका नाही. उत्खननातून प्राप्त धम्मचक्र, कमळ चिन्ह, स्तंभ आणि इतर कलाकृती ही बौद्ध अवशेष आहेत त्यांची उपस्थिती स्पष्टपणे दर्शवते की ह्या जागी मूळतः एक बौद्ध विहार होता. जी ब्राह्मणी शक्तींनी बळकावली आणि नुकसान केले. या उत्खननाने राम जन्मभूमी आंदोलनाची निरर्थकता आणि मुस्लिमांविरुद्ध भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचा खोटा प्रचारही सिद्ध झाला. या पुराव्याने धर्मनिरपेक्ष शक्तींना हिंदू राष्ट्रवादाच्या खोट्या कथनाचा पर्दाफाश करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

या जागेला ऐतिहासिक महत्त्व आहे आणि हा केवळ बौद्धांचा वारसा नाही तर तो जागतिक वारसा आहे. पण दुर्दैवाने पुरोगामीपैकी फारच कमी लोकांनी त्यांची चिंता व्यक्त केली आहे. हे मनोरंजकात्मक आहे की, अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर उजव्या वीचारसरनीच्या( दक्षिण पंथी) शक्तींनी अयोध्या तो एक झांकी है, काशी मथुरा बाकी है (काशी मधील ‘बाबरी मशीद पाडणे ही फक्त सुरुवात आहे , मथुरा अशाच नशिबाची वाट पाहत आहे’) अशी घोषणा दिली. या ठिकाणी नुकत्याच झालेल्या उत्खननाने याला नवा आणि योग्य अर्थ दिला आहे. जर काशी, मथुरा येथे कोणतेही उत्खनन केले गेले तर हिंदू धर्माची मिथक पुन्हा नष्ट होईल.

Reference

[i] The Ayodhya Verdict is Based on a Strange Feat of Logic, The Wire, 11 Nov/2019

[ii] Alexander Cunningham (2000), Four Reports Made during the Years 1862-63-64-65

[iii] Dharma Grantho ka Punarpath

[iv] Buddhism in India

[v] Shaw J (2000), Ayodhya’s sacred landscape: ritual memory, politics and archaeological ‘fact

[vi] Bakker, H.T. 1982. The rise of Ayodhya as a place of pilgrim-age, Indo Iranian Journal 24: 103-26.

~~~

लेखक – डॉ. रत्नेश कातुलकर
हा लेख इंग्रजी भाषेत राउंड टेबल इंडिया मधे प्रकाशित झाला आहे.
लेखकाची प्रकाशित पुस्तके
1)डॉ.आंबेडकर और आदिवासी प्रश्न (Hindi edition)
2 )बुद्ध का प्रथम उपदेश : धम्मचक्कपवत्तन सुत्त की आधुनिक, व्यवहारिक एवं प्रेरक व्याख्या (Hindi Edition)
3)Prefaces and Forewords of Dr. Ambedkar ( English edition)
4)‘’Outcasts on the Margins: Exclusion and Discrimination of Scavenging Communities in Education” ( English edition)
ratnesh.katulkar@gmail.com

अनुवादक: मिनल शेंडे
लेखक आणि कवियत्री आहेत. फुले, शाहू आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्ता आणि बुध्दिष्ट स्टडीज च्या अभ्यासक आहेत.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*