जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) online कसे मिळवाल?

अपेक्षा पवार

Caste Validity Certificate संदर्भात खुप संभ्रम दिसून येत आहेत.अलीकडच्या काळात कोणत्याही शैक्षणिक कोर्सेस साठी “caste validity certificate” हे अत्यंत महत्वाचे तितकेच गरजेचं आहे.. माझ्या धम्म बांधवाना स्वानुभातून काही माहिती देण्यासाठीचे हे लिखाण. I hope ह्यातुन तुमची सगळ्यांची मदत होईल.


1.Caste validity करिता सध्या Online application साठी खालील website आहेे.

https://bartievalidity.maharashtra.gov.in/

2.वर दिलेल्या लिंक वर जाऊन अर्जकर्त्याने New User म्हणुन स्वतःला register करावे लागते.

3. Register केल्यावर अर्जकर्त्याला User Id आणि Password मिळतो तो लक्षात ठेऊन त्याचा वेळोवेळी login करण्यासाठी उपयोग करावा.


4.अर्जकर्त्याला कोणत्या कारणासाठी caste validity certificate ची आवश्यकता आहे ह्या साठी पर्याय दिलेले आहेत 1.Education 2.Election 3.Service 4.Others त्या पैकी आपल्याला हवा असलेला पर्याय निवडावा 


5. Application form विचारलेल्या माहिती नुसार भरावा आणि ज्या कारणासाठी caste validity करत आहोत त्यासाठी लागणारी Documents list “Download” ह्या पर्याया मध्ये PDF मध्ये Format नुसार दिलेली आहेत. ते forms download करून भरावेत.


6. Documents/ Forms च्या scan केलेेल्या copies Application form मधेच upload कराव्यात (त्या कशा upload करायच्या ह्याबद्दलची मााहिती “Help” ह्या पर्यायामध्ये दिलेली आहे.

7. Application form final submit झाल्यावर तुमच्या ई-मेल ID वर तुम्हांला Application form ची एक प्रत प्राप्त होते त्यात नमूद केलेल्या तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचा पत्ता दिलेला असतो. त्या पत्त्यावर application form आणि upload केलेले सगळे documents /Forms च्या झेरॉक्स कॉपी (Attested copies) स्वतः जाऊन  30 दिवसाच्या आत submit कराव्यात.

8. तुमच्या submit झालेल्या Application Form चं status तुम्ही online track करू शकता.

9. Online Validity Certificate महिन्याभरात तुमच्या Online registered account वर upload होते आणि तुमच्या address वर पोस्टाने पोचते केले जाते.

अपेक्षा पवार

लेखिका B.A (Polictical Science) ,MBA – HR, असून BFSI क्षेत्रात Recruitment Specialist म्हणून कार्यरत आहेत. त्या शिवाय त्या एलएलबी चे शिक्षण पूर्ण करत आहेत.






2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*