चल हूँ की, चल हूँ सखी.. अब नाहीं अनपढ़ रहवै..

शाळकरी मुलगी, स्थळ: गेवराई तांडा
School girl: Georai Tanda

जातीवादाची पाळंमुळं इथल्या जमिनीत खोलवर रुजलेली आहेत, त्याची झळ लहान मुलांना बसली नाही असं अजिबात नाही. बिहारमधल्या गया जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातली ८-९ वर्षांची चिमुकली शाळेत होणार भेदभाव सांगते, दलित-महादलित म्हणून हिणवल्या गेलेल्या समाजात बंधनमुक्त होण्याचं प्रचंड मानसिक बळ आहे. आपल्या गाण्यातून ती तीच या जातीच्या जोखडातून उन्मुक्त होण्याचं स्वप्न गातेय..

ती म्हणतेय, प्रगतीची वाट शोधण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही
कळीचा प्रश्न आहे तो शिक्षणाचा
पण आता चिंता नाही, गावात शाळा आलीये, मोफत वह्या-पुस्तकं मिळतील सांगतायेत, शिक्षकही शाळेत येणार आहेत, शिकायला मिळणार आहे…चल ग मैत्रिणी..चल गावात शाळा आलीये

 

(हा ऑडिओ २०१२ सालचा आहे, जातीय आधारावर शाळेत होणारे भेदभाव या संदर्भात क्षेत्रकार्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांनी दलित समाजातील ८-९ वर्षांच्या मुलीचे हे गाणे रेकॉर्ड केले होते, ज्या गाण्यात ती आपल्या शिक्षण घेण्याच्या प्रबळ इच्छेची अभिव्यक्ती करते)

सौजन्य : अक्षत कृष्णा, शंकर कोकणे.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*