आंबेडकरी विचारांचा सृजनशील कार्यकर्ता, पुढारी, भाष्यकार प्रा. अविनाश डोळस. औरंगाबाद येथील, मिलिंद महाविद्यालयात विद्यार्थी, प्राध्यापक, मित्र, मराठी विभागप्रमुख म्हणून त्यांचे विस्तृत कार्य. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य आणि विचारधन प्रकाशन समितीचे सदस्यत्व त्यांनी सांभाळले. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्याकडून चळवळीचे नेतृत्व सांभाळायची शिकवण मिळवलेले अविनाश डोळस एक सर्जनशील व्यक्तिमत्व होत. विद्यार्थिदशेतूनच सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक चळवळीमध्ये आपला सहभाग नोंदवत त्यांनी आपली छाप पाडली. विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनात डोळस यांचा विशेष पुढाकार होता, १९९० मध्ये नांदेड इथे झालेल्या पाचव्या अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते, घग्घुस (जि. चंद्रपूर) येथील १२ व्य अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. वैचारिकदृष्ट्या चोख, आणि परखड मांडणी हे अभिव्यक्तीचे चिन्ह होते.
एक प्रतिभावंत साहित्यिक, विचारवंत, फुले-आंबेडकरी चळवळीच्या खंद्या पुढाऱ्यास विनम्र अभिवादन.

Leave a Reply