सागर अ. कांबळे
तुम्हाला ताकद आणि सत्ता जर जातीमुळे मिळत असेल तर आम्ही जातीचे नाव घेऊन का न बोलावं?
ब्राह्मण असल्यामुळे मिळणारी अकॅडमिक मधली सत्ता तुम्हाला सांस्कृतिक वर्चस्व मिळवून देते. तुम्हाला पाहिजे तशी भेसळ ज्ञानाच्या माहितीच्या साहित्याच्या नावाखाली करून देते.
निओलिबरल भांडवलशाहीला जात नाही का ब्राह्मण बनिया आगरवाल गुप्ता पारशी मारवाडी?
गावांमध्ये असलेला तुमचा मुजोरपणा, रस्ता, जमीन, पाणी, खुर्ची, देऊळ हे सगळं तुमच्या मराठा जातीमुळे मिळतं.
आम्ही जातीचे नाव घेऊन का न बोलावं?
शोषक व्यवस्था, वर्चस्व काय हवेतून येतेय काय?
साला इथं पाण्याला जात आहे
पिकाला जात आहे
जमिनीला जात आहे
पैशाला जात आहे
संगीताला जात आहे, पुस्तकांना जात आहे
कातडीला जात आहे, प्रेमाला जात आहे
माणसालाच जातीचं नाव कसं नाही? ही माणसं कशीकाय जातीमुक्त झालीत अचानक?
हॅशटॅगCasteIsCenturiesOldThingम्हणे
सागर अ. कांबळे
लेखक राज्यशास्त्र विषयाचे पदवी व पदव्युत्तरसाठी अध्यापन करतात.

Leave a Reply