विकास यमुना रंगनाथ ओव्हाळ
बाप त्यावेळी एका आंबेडकरी पक्षात काम करायचा.. संध्याकाळी येताना पेपर घेऊन यायचा.. पण पेपरात कुठंच त्याच्या पार्टीचं नावं, केलेलं काम काहीच दिसायचं नाही..
मी त्याला इचारलं..
“तुझी पार्टी कुठंच कशी न्ह्याय रं ?,
तुम्ही कधी निवडून बी येत न्ह्याय,
पेप्रात नाव बी येत न्ह्याय,
कुणी तुमचं नाव बी घेत न्ह्याय,
आण तुझ्या पार्टीत सगळी आपलीच माणसं कशी हायती ?
आनं बाकीच्यांच्या पार्टीत म्हार-मांग असत्यात कि..
मंग तुझ्या पार्टीत एखादा “बाकीचा” कसा न्ह्याय ?”
बापानं माझ्या दोन चार प्रश्नांची उत्तर थोड्या त्राग्यानं पण एका वाक्यात देऊन टाकली..
.
.
.
.
.
.
आरं आपल्याला जात आडवी येती!
विकास यमुना रंगनाथ ओव्हाळ
लेखक व्यवस्थापन क्षेत्रातील पदवीधर असून पुणे येथे कामानिमीत्ताने वास्तव्यास असतात. तसेच ते स्वतः स्वतंत्र स्तंभलेखक आहेत.
- आंबेडकर युग… - March 27, 2021
- अश्या किती भिंती उभ्या करणार? - February 23, 2021
- आरं आपल्याला जात आडवी येती! - February 13, 2021
Leave a Reply