डॉ सुनील अभिमान अवचार
आम्ही काही ही करू शकतो
दलितांचा डेटा जमा करून त्याच्यावर संशोधन करू शकतो
त्याचे लेखन अनुवादित करू शकतो
त्यांचे चित्र काढू शकतो
त्यांचे गाणे म्हणू शकतो
त्यांच्यावर चित्रपट काढू शकतो
त्यांचा अभिनय करू शकतो
आम्ही काही ही करू शकतो
त्यांचे खोटे कास्ट सर्टिफिकेट मिळवून
त्यांच्या नौकऱ्या बळकावू शकतो
त्यांच्या स्टेजवर मिरवू शकतो
त्यांचा माईक हिसकून घेऊ शकतो
त्यांना विकासाच्या नावाने विस्थापित करू शकतो
त्यांना देश ,राज्य , गाव बहिष्कृत करू शकतो
नदी नाल्याचे ,विहीरीचे पाणी भरण्यास मज्जाव करू शकतो
शिक्षणासाठी बंदी लादू शकतो
नक्षलवादी ठरवू शकतो
देशद्रोही म्हणू शकतो
त्यांना गुन्हेगार म्हणून जेल मध्ये सडवू शकतो
आम्ही काहीही करू शकतो
आम्ही जयभीम म्हणू शकतो
आम्ही आरक्षणाचा तिरस्कार करू शकतो
पण आम्ही युगा युगाचे ब्राम्हणत्व सोडू शकत नाही !
आम्ही इतरांना माणूस समजत नाही!
डॉ सुनील अभिमान अवचार
लेखक हे समकालीन कवी- चित्रकार असून मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. ‘ग्लोबल वर्तमानाच्या कविता’, ‘केंद्र हरवत चाललेल्या वर्तुळाचा परीघ’, हे त्यांचे महत्वाचे कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत.’Our WORLD is Not for SALE ‘आणि ‘We, the Rejected People of India’ हे त्यांच्या मराठी कवितेचे इंग्रजीत अनुवाद झालेले काव्यसंग्रह आहेत. अवचार यांचे साहित्य जात, लिंग, वर्ग भेदाच्या मुक्तीदायी अवकाशासाठी उभे राहणारे आहे.
- तो दम ‘आंबेडकरवादी’ नावातच आहे… - April 21, 2021
- मुंबईची धारावी - March 4, 2021
- डेबूजी:गाडगेबाबा - February 23, 2021
Leave a Reply