डॉ सुनील अभिमान अवचार
समकालीन व्यक्तिपूजेच्या वादळवाऱ्यात
मी करतो आहे संवाद
एक क्षणी
जो क्ष आहे जीवन-मरणाच्या दारावर
शेवटचा श्वास घेत
या पिढीने लावला जरी असला
रे–बॅनचा गॉगल
बोलत असली ब्लकबेरी मोबाईलवर
आपल मत व्यक्त करीत असली ब्लॉगवर
तिने मल्टीकल्चरचा स्वीकारला असेल वसा
तरी तिच्याजवळ नाही ओरडण्यासाठी घसा
तसे पहिले तर या पिढीला
सायबर एजची पिढी म्हणतात
परंतु धर्माच्या अविवेकाने
ती कुजण्याचे शक्यता आहे
डेबू,आपला दहासूत्री कार्यक्रम
आमच्या संघर्षशील जीवनाची सनद आहे
भूक लागली तर पाव–पिझ्झा आहे
शिक्षण घण्यासाठी एज्युकेशन हब आहे
तहानलेल्याना बिसलरीचे पाणी आहे
निराधारांना विराधार योजनेचा आधार आहे
पण
या सर्वंपर्यंत पोहोचण्यासाठी
हीही पिढी थकून जाईल का
अशी मला दाट शंका आहे
डेबू,
एक वेळ नाहीतर पुन्हापुन्हा कीर्तन
आठवत असतो
आणि नव्या आरिष्ट
सामोरा जात आसतो
नवे आरिष्ट
ग्लोबलायझेशन,सेझ यातून काढायचे आहे मार्ग
त्याच्या मगरमिठीतून व्हायचे आहे मोकळे
तुमच्या कीर्तनात गुंग झालेले लोक
म्हणणार आहेत मुठी आवळून
तोंडाच्या मुसक्या सोडून
पाठीवरचे जू उतरवून
नव्या आकाक्षाना घातलेला कोलदांडा मोडून
‘आम्ही आमचा वापर होऊ देणार नाही
आणि व्यवस्थेचा कुरूप मुखवटा
ओरबाडल्याशिवाय राहणार नाही !’
बोलाऽऽ गोपालाऽऽ गोपालाऽऽ
डॉ सुनील अभिमान अवचार
लेखक हे समकालीन कवी- चित्रकार असून मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. ‘ग्लोबल वर्तमानाच्या कविता’, ‘केंद्र हरवत चाललेल्या वर्तुळाचा परीघ’, हे त्यांचे महत्वाचे कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत.’Our WORLD is Not for SALE ‘आणि ‘We, the Rejected People of India’ हे त्यांच्या मराठी कवितेचे इंग्रजीत अनुवाद झालेले काव्यसंग्रह आहेत. अवचार यांचे साहित्य जात, लिंग, वर्ग भेदाच्या मुक्तीदायी अवकाशासाठी उभे राहणारे आहे.
- तो दम ‘आंबेडकरवादी’ नावातच आहे… - April 21, 2021
- मुंबईची धारावी - March 4, 2021
- डेबूजी:गाडगेबाबा - February 23, 2021
Leave a Reply