अश्या किती भिंती उभ्या करणार?

विकास यमुना रंगनाथ ओव्हाळ

अजून किती लपवणार बेईमानी तुमची ?
अश्या किती भिंती उभ्या करणार ?

किती रंगवणार तुमच्या धर्मांध काळपटपणाला ?
तुमच्या भिकार संस्कृतीवर सभ्यतेचे लेप किती फासणार ?

शेण,गोमूत्र माणसा पेक्षा किती दिवस पवित्र राहणार ?
किती दिवस किडलेले कीडे सडलेल्या आंब्यातून जन्माला येणार ?

तुमचा सम-विषम चा पितृसत्ताक ढोल जाहीर कीर्तनात अजून किती बडवणार ?
तुमच्या रामराज्यात मनुस्मृती ला शंभूका पासून रोहित पर्यंत किती बळी द्यावे लागणार ?

देशाबाहेर बुद्ध हसतो मग,
इथेच किती दिवस त्याला पांडव लेण्यात नजर कैद ठेवणार ?

किती दिवस तुम्ही कायदेशीर दरोडे टाकणार ?
नाव, नोटा तर झाल्या बदलून तुमचं मन कधी बदलणार ?

छप्पन इंची भ्रमाचा फुगा अजून किती फुगवणार ?
चोपड्या ‘निर्मल’ बदलल्या तुम्ही, डोळ्याची चिपडं कधी काढणार?

फक्त कपड्यावरुन केली जाते पारख तर,
तुमच्या सारखा फकीर शोधून कुठं सापडणार ?

लाखोंचे मशरूम खाऊन टम्म फुगले गाल,
घामाची मालिश आता तुम्ही आम्हाला शिकवणार ?

विकास यमुना रंगनाथ ओव्हाळ

लेखक व्यवस्थापन क्षेत्रातील पदवीधर असून पुणे येथे कामानिमीत्ताने वास्तव्यास असतात. तसेच ते स्वतः स्वतंत्र स्तंभलेखक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*