आंबेडकरी गीतकार असण्याच भान म्हणजे काय?

अमोल कदम

बाबासाहेब हा एकच शब्द पूर्ण आयुष्याचे काव्य लिहिण्यासाठी सक्षम आहे.मग जर खुद्द बाबासाहेबच गाण्याविषयी किंव्हा गाणी लिहिणाऱ्या-गाणाऱ्या विषयी काही बोलत असतील तर..?

“माझ्या दहा भाषणा बरोबर माझ्या शाहिराचे एक गाणे आहे “, आंबेडकरी चळवळ गाणाऱ्या,लिहिणाऱ्या प्रत्येक कलाकारांना बाबासाहेबानी दिलेला हा जगातील सर्वात मोठा पुरस्कार.आता पुरस्कार म्हटले तर कौतुका सोबत जबाबदारी आलीच. हीच जबाबदारी खांद्यावर घेत तत्कालीन शाहीर मंडळी अगदी प्रामाणिकपणे कोणताही स्वार्थ न बाळगता खेडोपाडी जाऊन आंबेडकरी चळवळीचा प्रचार-प्रसार करत आली. त्यात चळवळीचे गाणं लिहिणं म्हणजे इतकं सोपं नाही.हे सगळ्यांनाच माहीत आहे. २००० साल येई पर्यत बाबासाहेबांच्या गाण्याला कोणत्याच बाबतीत तोड नव्हती.शब्द,चाल,गायन सगळं ठीक राहत असे. म्हणूनच ही गाणी अजरामर आहेत.

जस जसे बाहेरील कला विश्व बदलत गेलं, तसे आम्ही ही आमच्या प्रबोधनात्मक गायनात बदलत गेलो.काही नवीन करण्यात इतके वाहत गेलो की,आम्हाला नवीन जुने यातील फरकच कळला नाही.ट्रेंडच्या नावाखाली कसेही शब्द,उडती चाल,आणि जाणूनबुजून केलेला धांगडधिंगा म्हणजे आपलं गाणं सुपरहिट.अशाच विचारांचे पोस्टर बॉईस कलाकार प्रबोधनकार लेबल लावून फिरत असतात. काही मंडळी खरच अभ्यासात्मक आणि खूप सुरेख गाणी बनवतात, पण त्यांची गाणी फार कमी लोक ऐकतात.माझी अनेक कलाकारांसोबत या बाबतीत चर्चा होते तेंव्हा तोंडा वर वेड्या वाकड्या गाण्याला पसंद न करणारे कलाकार स्वतः त्याच कलरची गाणी रेकॉर्ड करतात आणि मोठ्या हिमतीने ती रिलीज ही करतात. समाजाला जे लागत ते आम्ही पुरवतो असा बालिशपणा जर आपल्या कलाकारांचा असेल,तर ही गाणी ऐकून बाबासाहेब नक्की काय म्हणाले असते.? विचार करा.

एकतर पुन्हा पुन्हा ऐकण्यासारखी गाणी तयार होत नाहीत,त्यात रॉकिंगच्या नावाखाली जुनी श्रवणीय गाणी मोडतोड करून काही स्वयंघोषित रॉकस्टार मंडळी समाजाच्या माथी मारत आहेत. अनेक जण खूप नव्या नव्या विचारांनी प्रेरित होऊन,एक वेगळा दर्जा निर्माण करण्याच्या प्रयत्न करत आहेत. त्यांना खरच सलाम . मान्य आहे की समाजाला गरम (उडत्या चालीची) गाणीच आवडत असतील ही,पण त्यांना दर्जेदार शब्दांची तरी सांगड घाला. मुळात हिंडून-फिरून त्याच त्याच विषयावर अडकणारे गीतकार अजून ही मागणी तसा पुरवठा या मानसिकतेतून बाहेर पडले नाहीत.गायक आकड्यात इतके आकडले की त्याच गाणं ऐकून मला तरी आकडी भरायची वेळ येते.

बाबासाहेबांसारख्या उच्च प्रतीच्या विद्वाना बद्दल गाणी लिहतांना शब्दांचा दर्जा कोणता पाहिजे,याच निरीक्षण,आत्मपरीक्षण,आणि अभ्यास प्रत्येक कलाकाराने केला पाहिजे.कारण सर्वव्यापी फुले शाहू आंबेडकरी चळवळ तळागाळात पोहचवणे हे इतर बहुजन कलाकारा पेक्षा आपल्याला अधिक चांगले कळते. म्हणून अश्याच चांगल्या समजूतीतून आपल्या दिशे पासून हरवलेला आंबेडकरी गाण्याचा दर्जा पुन्हा आपल्या ज्वलंत शब्दांच्या मार्गाने जाईल का..?

अमोल कदम

लेखक गीतकार – कवी असून खालील काही लोकप्रिय गाणी त्यांनी लिहिली आहेत.

भीमराव एकच राजा अल्बम
भीमजयन्ति 125
बाबासाहेब जिंदाबाद
क्रांतिचा नारा हा जयभीम
सम्राट तू अशोका

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*