फ्रेम विदिन फ्रेम बघितलं असेल, फिल्म विदिन फिल्म बघा

निलेश खंडाळे

तुमच्या क्रश ला पुस्तक वाचायला देताय. रिटर्न करताना जर त्यात फुल सापडलं तर मनात लड्डु फुटणारच ! तिचं देखील आपल्यावर प्रेम आहे असं वाटणारच.
पण तिला ती पुस्तकं, ते साहित्य, ते काव्य, आवडतंय हे कसं कळणार ? ती मानवतावादी विचारांची आहे हे कसं ओळखणार ?
हे ओळखण्याची सिनेमाच्या कॅरॅक्टरची स्वतः ची एक थिअरी आहे …. पुस्तक वाचत असताना ती कोणती वाक्य, शब्द अंडरलाईन करते यावरून तो तिच्या मनाचा ठाव घेत असतो.

” A moment of innocence ” (1996) मोहसेन मखमलबाफ दिग्दर्शित 75 मिनिटांचा पोएटीक अनुभव.
दिग्दर्शक मखमलबाफ ने 17 वर्षाचा असताना शाह राजवटीच्या विरोधात प्रोटेस्ट मध्ये भाग घेतलेला. तेव्हा एका पोलिसासोबत झालेल्या झटापटीत त्याने पोलिसाला भोसकलं होतं.यासाठी त्याला चार वर्षे कारावास भोगावा लागला होता.

मग फिल्म डिरेक्टर झाल्यावर एक 20 वर्षांनी त्याच पोलिसाला घेऊन घडलेल्या प्रसंगाचं आजच्या अनुषंगाने त्याला चित्रण करायचं आहे. आपलं तारुण्य परत एकदा recreate करायचं आहे.
झालं असं की मकमलबाफ ने आपल्या ” सलाम सिनेमा ” चाओपन कास्टिंग कॉल दिलेला. त्याला प्रतिसाद देत तो पोलीस त्या ऑडिशन ला पोहचला. या भेटीनंतर च मकमलबाफ ने या डॉक्यु फिक्शन चा निर्णय घेतला.
याच प्रकारात मोडणारा यशस्वी चित्रपट म्हणजे अब्बास चा क्लोज अप ! मकमलबाफ त्या चित्रपटाचा अविभाज्य भाग होताच.

मकमलबाफ ची पोलिसासोबत झटापट का झाली सांगतो. मकमलबाफ ला त्या पोलिसाची पिस्तुल हिसकावून घ्यायची होती, आणि त्याच पिस्तूलाने हुकूमशहा असणाऱ्या शहा चा खुन करायचा होता. मग पोलिसांचं लक्ष विचलित करण्यासाठी मकमलबाफ आपल्या गर्लफ्रेंड ला तिकडे घेऊन जातो.कारण पोलिसाला ती मुलगी आवडत असते.पण पिस्तुल घेण्यात काय तो यशस्वी होत नाही , आणि शिक्षा मात्र मकमलबाफ आणि त्याची गर्लफ्रेंड अशी दोघांना होते.


मकमलबाफ चं आपल्या गर्लफ्रेंड शी लग्न होऊ शकलं नाही, तिचं लग्न दुसरीकडे झालं.पण चित्रपट करायचा ठरवल्यावर मकमलबाफ ने तिला देखील संपर्क केलेला. पण तो तिच्यासाठी नाही तर तिच्या मुलीने त्याच्या तारुण्यातल्या गर्लफ्रेंड चा रोल करावा यासाठी !!
हे प्रचंड इंटरेस्टिंग वाटलं मला.

विचार करा एक पोलीस आणि फिल्म डिरेक्टर 20 वर्षांनी एकत्र आलेत. काय नॉस्टॅलजिया असावा तो. काय विचार करत असतील दोघे ? घडलेला प्रसंग परत चित्रित होतोय. काय सांगत असतील ते एकमेकांना किंवा त्यांचा अभिनय करणाऱ्या तरुणांना ? निश्चितच आज 20 वर्षांनी त्यांना काहीतरी दुरुस्ती करावीशी वाटत असावी.
आपल्या कॅरॅक्टर चा अभिनय कुणी करावा याचे स्वतंत्र निर्णय दोघांनी घेतलेत. आणि तश्या रीतीने त्या कॅरॅक्टर्सना सूचना देणं देखील चालू आहे.

फ्रेम विदिन फ्रेम हा प्रकार तुम्ही ऐकला असेल. इन द मूड फॉर लव्ह (2000) च्या अनुषंगाने याची भरपूर चर्चा झाली आहे. पण Moment of Innocence ही ” फिल्म विदिन फिल्म ” आहे .

शूट सुरू आहे. मकमलबाफ चा अभिनय करत असलेल्या मुलाला सांगितलं जातं की भोसक आता पोलिसाला , तर तो घाबरून रडत नकार देतो. कॅमेरा मागचा डिरेक्टर त्याला तसं करण्यास कंव्हिन्स करू लागतो. तू जर त्याला भोसकलं तर याने मानवतेचं रक्षण होईल असं सांगतो. मुलाला प्रश्न पडतो याने कसं काय मानवतेचं रक्षण होईल ? सिनेमा संपल्यावर वर एक प्रेक्षक म्हणून तुम्हाला तर चिक्कार प्रश्न पडणारेत.
पण नेहमीप्रमाणे, या ambiguous इराणी ट्रीटमेंटने पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली की तुम्ही प्रचंड सुखावणार आहात.

युट्युब वर हा चित्रपट उपलब्ध आहे.

निलेश खंडाळे

लेखक पुणे येथे वास्तव्यास असून ते शॉर्ट फिल्ममेकर तसेच Kiaro Films चे संस्थापक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*