सिनेमाचा ब्राह्मणी गेझ (gaze) आणि प्रतिनिधित्व

दिक्षा सरोदे ‘बधाई दो’ सिनेमा बघितला आणि आयुष्याची २ तास ३० मि. वाया घातली. सिनेमामध्ये स्ट्रेट कलाकारांनी समलिंगी पात्र साकारली आहेत. एक चित्रपट टिम ज्यात LGBTQIA+ चे एकही प्रतिनिधित्व नाही अशी टिम जेव्हा समलैंगिगतेवर चित्रपट बनवते तेव्हा सिनेमात समलैंगितेप्रती केलेली रुढीबद्धता दिसून येते. चित्रपटात राजकुमार राव ने समलैंगिक आणि गर्विष्ठ […]

हा “फुगीरपणा” सगळ्यांमध्ये यायला हवा!

निलेश खंडाळे धनुष चा , मारी सेलवाराज कृत ” करनन ” बघितला.बघताक्षणी जे सुचलं ते आहे तसं लिहितोय. मी लहानपणी अनेक वेळा महार लय फुगीर असतात असं खाजगीत ऐकत आलोय.इतर आणि स्वतः च्या जातीकडून. फुगीर म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे हे तेव्हा समजत नव्हतं.पण जसं समजायला लागलं तशी माझ्या परीने […]

पलासा १९७८ – जातीय शोषणाविरुद्ध धैर्य आणि बंडाची गाथा

जे एस विनय मला काही दिवसांपूर्वी अ‍ॅमेझॉन प्राइम वर तेलुगू चित्रपट पलासा १९७८ पाहण्याची संधी मिळाली. मी महाराष्ट्राचा असलो तरी मला वेगवेगळ्या भाषांमध्ये जाती-विरोधी निवेदनावरचे चित्रपट पहायला आवडतात. काही मुख्य मुद्द्यांकडे जाण्याचा प्रयत्न करू.आंध्र प्रदेश राज्यातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील पलासा नावाच्या छोट्या गावात हा सिनेमा सेट करण्यात आला आहे. बहुजन आणि […]

भावे मावशींनी कोणाला निर्दोष दाखवण्याचा अट्टाहास केला?

पूजा वसंत ढवळे भावे मावशीचा ‘कासव’ आणि त्यातील विकृत करून दाखवला गेलेला रोहित वेमुलाचा चुकीचा संदर्भ… सुमित्रा मावशींचा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त कासव सिनेमा अगदी अलीकडेच पाहण्यात आला. तो यासाठी पहिला की भावे मावशीचं हिरो-वर्शीप माझ्या डोक्यावर फार पूर्वी पासून गारूड घालून होतं…म्हणून परवा मावशी गेल्याची बातमी वाचून हळहळ वाटली आणि महत्वाची […]

भावेंचा ‘कासव’ आन आंबेडकरी चळवळीचा ‘पँथर’ रोहित वेमुला

प्रशांत उषा विजयकुमार कासव हा 2017 मध्ये प्रदर्शित झालेला सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांचा चित्रपट ज्याला केंद्र शासनाचा सुवर्णकमळ विजेता पुरस्कार मिळाला आहे. असो मला इथं पूर्ण चित्रपटावर चर्चा करायची नाहीये ती चर्चा अनेक ठिकाणी केली आहे ती जाऊन वाचू शकता. इथे मी फक्त कासव मधल्या रोहित वेमुलाच्या Visual […]

अँड लाईफ गोझ ऑन…

निलेश खंडाळे विचार करा तुमचं घर भूकंपाने उध्वस्त झालंय. तुम्ही घरासमोर बसलाय. अचानक कुणी तरी माणूस कार मध्ये येतो आणि तुम्हाला पत्ता विचारतो .तुम्ही किती उत्स्फूर्तपणे त्याला रिस्पॉन्स द्याल ? अब्बास च्या फिल्म चे कॅरॅक्टर्स आपुलकीने जागेवरून उठतात, प्रतिसाद देतात , जे काय सांगायचं ते सांगतात आणि परत तिथं जाऊन […]

अप्पर कास्ट गेझ मधून आलेला मंडेला!

अरहत धिवरे लॉरा मल्वे या ब्रिटिश फिल्म थेअरीस्टने मीडियातली एक थेअरी मांडली. मेल गेज थेअरी. यात लॉरा म्हणतात, सिनेमात बऱ्याच वेळा स्त्रियांच्या प्रतिनिधित्वाची जी मांडणी केलेली असते ती पुरुषांना हवी तशी किंवा पुरुषांना सुखावणारी असते. म्हणजे कमी कपड्यात असणारी स्त्री किंवा बिकिनी घालून फिरणारी स्त्री मॉडर्न, बोल्ड अँड ब्युटीफुल दिसत […]

बोलीभाषेला डिग्नीटी मिळवून देणारा नागराज अण्णा!

निलेश खंडाळे एखाद्या चित्रपटाचा प्रभाव हा समाजमनावर किती होऊ शकतो याबद्दल सर्वाधिक चर्चा झालेलं वर्ष म्हणजे २०१६. अनेक मतप्रवाह यातून समोर आले. ही घुसळण भूतो न भविष्यती अशीच होती. इतकी टोकदार चर्चा इथून पुढे कधी होईल की नाही माहिती नाही. निमित्त होतं सैराट ! त्या दरम्यान एक सतत वापरलं गेलेलं […]

चिरेबंदी वाड्यात बहुजनांचा ‘मांगीर’

आनंद क्षीरसागर “कोणतीही गोष्ट सांगताना सर्वात मोठा धोका हा एका पैलूने किंवा एकाच वैचारिक दृष्टीने ती गोष्ठ सांगण्यात असतो ”. –चमामांडा नगॉझी अडीचे , कृष्णवर्णीय आफ्रिकी नायजेरियन लेखिका “जो पर्यंत सिंह बोलायला सुरवात करणार नाहीत तो पर्यंत सर्व जग हे फक्त शिकाऱ्याच्या धाडसीपणाचेच गुणगान करत राहील ”- आफ्रिकन स्वाहिली भाषेतील […]

फ्रेम विदिन फ्रेम बघितलं असेल, फिल्म विदिन फिल्म बघा

निलेश खंडाळे तुमच्या क्रश ला पुस्तक वाचायला देताय. रिटर्न करताना जर त्यात फुल सापडलं तर मनात लड्डु फुटणारच ! तिचं देखील आपल्यावर प्रेम आहे असं वाटणारच.पण तिला ती पुस्तकं, ते साहित्य, ते काव्य, आवडतंय हे कसं कळणार ? ती मानवतावादी विचारांची आहे हे कसं ओळखणार ? हे ओळखण्याची सिनेमाच्या कॅरॅक्टरची […]