इथली एकूण व्यवस्था म्हणजे ब्राह्मणी व्यवस्था!

प्रवीण उत्तम खरात

व्यवस्थेला लोक दोष देत आहेत खरे पण ती “व्यवस्था” कोणती हे फारच कमी लोकांना समजलं आहे बाकीचे नुसत “व्यवस्थेत दोष आहे” हे वाक्य फिरवत बसत आहेत. ती व्यवस्था आहे “ब्राह्मणी व्यवस्था”. ह्या व्यवस्थेचे घटक आहेत ब्राह्मणी संस्कृती, ब्राह्मणी माध्यम आणि ब्राह्मणी राजकारण आणि सत्ताकारण. ह्याव्यवस्थेचा प्रभाव भारतीय समाजावर आहे आणि भारतीय समाजाला ह्या सर्व  घटकांनी (ब्राह्मणी संस्कृती, ब्राह्मणी माध्यम आणि ब्राह्मणी राजकारण आणि सत्ताकारण)  ह्या व्यवस्थेची डागडुजी करण्याची सवय लावली आहे. 

शाहीर संभाजी भगत आपल्या शाहिरीत म्हणतात तस “दुसमान सर्वनाशी तरी गुणगान रे , जाण जाण जाण दुष्मणाला जाण रे” ह्या एका विधानात त्यांनी भारतीय मानसिकतेतील चुक योग्य पद्धतीनी दाखवली आहे.

ब्राह्मणी व्यवस्था हि प्लास्टिक सारखी नुसती दिसायला चांगली आहे. तिच्यात लवचिकता आणता येते ती शोभिवंत करता येते मात्र भारतीय सामाजिक पर्यावरणाला ती दूषित करणारी आहे. ह्या व्यवस्थेत मानवतेचा  दिखावा आहे मात्र  माणुसकीचा ओलावा नाही. ह्या व्यवस्थेत कोणतीच मानवी मूल्य जाणीवपूर्वक सांभाळली जात नाहीत तर ती फक्त दाखवायची म्हणून मिरवली जातात. ह्या व्यवस्थेत व्यक्तीच्या अनुभवांना, जाणिवांना जागा नाही किंबहुना व्यक्ती पेक्ष्या समाज आणि त्यातही विशिष्ट समाज्याच्या सामूहिक भावना महत्वाच्या आहेत. अश्यावेळी व्यक्ती स्वातंत्र्याच्या आणि हक्काच्या नुसत्या गप्पा ठोकल्या जातात पण दैनंदिन परिस्थितीत व्यक्ती पेक्ष्या समाजाला महत्व दिल जात आणि समाजात सुद्धा विशिष्ट समाज किंवा सामाजिक वर्ण व्यवस्थेला महत्व सुद्धा चढत्या क्रमाने दिल जात. म्हणजे ह्या ब्राह्मणी वर्ण व्यवस्थेत सर्वात वर असणाऱ्या समाजाच्या भावना अतिशय महत्वाच्या आणि त्या सांभाळल्या तर समस्त भारतीय सामाजिक भावना सांभाळल्या, त्या खाली येणाऱ्या समाजाच्या भावनांना क्रमाक्रमाने महत्व कमीकमी होत जात.

आज भारतीय परंपरा आणि संस्कृती म्हणून ह्या व्यवस्थेतील ब्राह्मणी माध्यम आणि संस्कृती तुन मिरवली जाणारी कोणतीही परंपरा,सण, घटना किंवा संस्था जर पहिली तर ती रुक्ष आहे तिला शोभिवंत केलं गेलं आहे हे दिसून येईल त्यांत मानवी मूल्यांचा अभाव जाणवेल. ह्या सर्वांचे संदर्भ म्हणून मानवी इतिहासा पेक्षा अलौकीक काल्पनिक इतिहास पुढे केला जातो त्याचा प्रसार केला जातो. इथं मानवी भावनांच प्लास्टिकिकरन केलं जात आहे हे अगदी लहान मुलांनाही समजेल इतकं लख्ख सत्य आहे. 
ह्या व्यस्थेत विविध प्रादेशिक संस्कृतींना, भाषेला, चिकिस्तेला, व्यक्तीच्या मताला, निरीक्षणाला किंवा त्याच्या वैयक्तिक विचारांना प्रकट करण्याचं स्वातंत्र्य नाही. लोकक्रांतीला नवविचारांना इथं रुजू दिल जात नाही. परंपरेच्या गोंडस नावाखाली अमानुषपणाचा सांभाळ केला जातो. व्यक्तीच्या विकासापेक्षा त्याच्या अधोगतीला कारणीभूत ठरून विकृत स्वर्गीय आनंद मिळवायचा प्रयत्न हाच ह्या ब्राम्हणी व्यवस्थेतील कर्म सिद्धांत केला गेला आहे.

प्रवीण उत्तम खरात

लेखक IT Consulting Firm मध्ये  IT Executive म्हणून कार्यरत आहे आणि “बुद्ध फुले शाहू आंबेडकर पेरियार”  विचारांचे अनुयायी आहेत.

1 Comment

  1. Regarding brahminical culture and religion, Experienced author Sanjay Shraman Jothe Sir has written some brilliant articles in Hindi RTI.

    Most of our people observe politics carefully. I know that politics is important but I have more interest in cultural & religious fields. brahmins are not afraid of any political party or any political leader but they are afraid of Babasaheb’s revived Buddha’s Dhamma in my opinion.

Leave a Reply

Your email address will not be published.


*