कुंडली : बहुजनांच आयुष्य उधळून टाकणारं ब्राह्मणी अस्त्र

प्रवीण उत्तम खरात

मुलगा किंवा मुलगी नोकरीला लागले त्याच वय झालं कि आईवडील त्यांच लग्न जुळवण्याचा प्रयत्न करू लागतात. विविध पातळीवर जाहिरात केली कि बघण्याची प्रक्रिया सुरु होते भेटीगाठी आणि मग शिक्षण ,वय , कुटुंब, नोकरी इत्यादी माहितीची देवं घेवाण होऊन पहिली प्रक्रिया पार पडते. दोघांनी इथंच एका भेटीत एकमेकांना आयुष्यभराचा जोडीदार म्हणून सुयोग्य आहे कि नाही हे ठरवायचं (आयुष्यभराचा निर्णय एका दिवसात घेण्याचं कसब😂) कधी कधी मुलगा मुलगी दोघांना इतर भेटी घेण्याची संधी मिळते किंवा घरातील लोक तश्या संधी निर्माण करतात. मुलगी नात्यातील असेल तर जास्त शक्यता असते.

मग चालू होतो बघण्याच्या प्रक्रियेतील दुसरा टप्पा. ज्यात मुलगी किंवा मुलाचे बाबासाहेबाना गद्दार झालेले आईवडील, आप्तस्वकीय किंवा सहकारी किंवा शेजारी कुंडली पहा असा आत्मघातकी सल्ला देतात आणि सुरु होतो आयुष्याच्या कॅनव्हास वर फार सुंदर स्केच वर रंगाचे शिंतोडे उडवण्याचा प्रकार.
लगोलग एक ब्राह्मण शोधला जातो फार कष्ट पडू नयेत म्हणून पानपट्टीच्या टपरी सारख्या जागोजागी ह्याच्या टपऱ्या आहेत आणि जास्त तर WFH पद्धतीनी चालणारे प्रकार आहेत. स्वतःच भविष्यात काय होणार हे आपल्या स्वतःला माहित नसत मात्र एका परोपजीवी ब्राह्मणाला माहीत असत अस मानून जन्मवेळ, तारीख आणि दिवस (भविष्य पाहणाऱ्या विद्वानांना ह्या गोष्टी तरी का मागाव्या लागत असतील असा प्रश्न सुद्धा ह्या गद्दार स्वजातीयांना कसा पडत नसेल 🤔) इत्यादी माहित ह्यांना दिली जाते आणि एकवेळ जपानी सुकोडू कोड सुटेल पण ह्यांनी गिरगवटुन ठेवलेला आयत आणि त्यात लिहलेले आतार्किक अंक आणि ग्रहांची नाव काय दाखवतात हे त्यांना सुद्धा बापजन्मी कधी कळत नाही. अश्या अतार्किक गोष्टी त्याखाली अंक देऊन नंतर शाळेत मारतात तसा शेरा मारून परोपजीवी मोकळे होतात.

बर बहुजनांनो कुंडली बघणारे अर्थ सांगणारे, वापरणारे ब्राह्मण मग तुम्ही कशाला स्वतःचे पैसे खर्च करून स्वतःच्या आयुष्याला घोडा लावता. ज्या गोष्टी त्यांनी त्यांच्या साठी बनवल्यात त्यात तुमची कुंडली ते जुळवतीलच कशी हि सुद्धा अक्कल तुम्हाला आली नाही. प्रेम करताना कुंडली जुळवता काय ? बर एखादा व्यक्ती बेवडा, कामधंदा न करणारा , आईबापाच्या जीवावर खाणार ,चोरी करणारा असा असेल तर त्याच भविष्य खराब असेल हे सुद्धा तुम्ही ठाम सांगू शकत नाही कारण ज्या दिवशी त्या व्यक्तीला आपल्या अधोगतीच जाणीव होईल आणि मग तो प्रगती करण्याची ईच्छा जागृत करेल तर तो सुद्धा स्वतःच भविष्य बदलेल. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच भविष्य हे त्याने घेतलेल्या निर्णयावर , त्याच्या समजदारीवर आणि त्याच्या ईच्छाशक्तीवर अवलंबून असत ते कोण्या परजीवी ब्राम्हणाच्या अतार्किक विधानांवर नसत. कुंडली हे ब्राम्हणाच्या हातातील बहुजन तरुण-तरुणीच वैवाहिक आयुष्य निर्माण होण्याआधीच संपवून टाकायचं शस्त्र आहे. हे होता होईल तितकं लवकर जाणून घेतलं पाहिजे आणि लग्न जुळवण्यासाठी धम्म संस्कार, शिक्षण, नोकरी ह्या बरोबरच मन सुद्धा जुळावी लागतात हे येणाऱ्या पिढीने समजून घ्याव अन्यथा नष्ट होण्यासाठी तयार राहावं.

बाबासाहेब म्हणायचे “Cultivation of Mind should be ultimate aim of human existence.”
ह्याचा अर्थ “मनाची मशागत करणे” किंवा सोप्या भाषेत “मनाची तयारी करणे” हे मानवी अस्तित्वाचे अंतिम उद्दिष्ट असायला हवं.

तुम्हाला न्याय, हक्क आणि अधिकार आणि इतर सर्व बाबीं साध्य करण्यासाठी पहिल्या प्रथम “मनाची तयारी करणे महत्त्वाचं आहे”. मनाची लगाम स्वतःच्या हातात ठेवा. तुमच्या मनावर तुमचं नियंत्रण हवं इतरांचं नाही.

प्रवीण उत्तम खरात

लेखक IT Consulting Firm मध्ये  IT Executive म्हणून कार्यरत आहे आणि “बुद्ध फुले शाहू आंबेडकर पेरियार”  विचारांचे अनुयायी आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*