गोएंकांच्या विपश्यनेचे गौडबंगाल!

राहुल पगारे

महाबोधी विहार संघर्ष आंदोलन करुनही बौद्धांच्या हातात नाही. ट्रस्ट, पुजारी ब्रामणच आहे.

बुद्ध लेण्यांची अवस्था विचित्र झाली. कित्येक ठिकाणी अतिक्रमण, विकृतीकरण, झालं. संवर्धनाचा प्रयत्न उदासिनत अवस्थेत आहे.

भारतीय विद्यापीठांत बौद्ध साहित्य व इतिहासाचा अभ्यास क्षुल्लक म्हणावा इतका पण नाही.

पाली भाषा, साहित्य टिकविण्याचा प्रयत्न नाही.

पुरातत्व विभाग बौद्ध संस्कृतीची मिळालेली अवशेष, पुरावे जाहीर करत नाही. नव्या ठिकाणी उत्खननात कुठे बौद्ध संस्कृतीचे अवशेष मिळायला लागले की लगेच उत्खनन बंद करुन. बाकी व्यवहार अंधारात ठेवला जातो.
नागपूर दीक्षा भूमी आधुनिक बौद्ध संस्कृतीसाठी एक लॅण्डमार्क असताना तिच्या अवतीभवती अतिक्रमण वाढवलं. त्याचाही वेगळा संघर्ष.

मुंबई दादर चैत्य भुमीची ती अवस्था. अजुनही छोट्याशा दीडशेदोनशे स्क्वेअर फूट जागेत खिदपत पडलंय.

भारताची प्राचीन बौद्ध साहित्य, स्थापत्य, सांस्कृतिक वारसा टिकवण्याचा कोणताच प्रयत्न केंद्र सरकार कडुन होत नाही. उलट हर एक प्रकारे मुस्कटदाबी होते. विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव द्यायला पण आम्हाला २० वर्षाचा संघर्ष करुन कित्येकांचे घरे, आयुष्य बरबाद करुन घ्यावे लागले. ही अवस्था आहे बौद्ध संस्कृती व बौद्ध अनुयायांची. अगदी वाईट, विचित्र, चीड आणणारी.

तर दुसऱ्या एका बाजुला एक समांतर बौद्ध संस्कृती सुरु केली ब्राम्हण सवर्णांनी. ज्यांच प्रसाराचा उद्देश बाबासाहेबांच्या सामाजिक संदेशांच्या अगदी उलट आहे. आणि ती विचारधारा केवळ सवर्णांच्या हाती आहे. आणि म्हणुनच तिला आज “राजाश्रय” आहे. ही राजाश्रय असलेली बौद्ध संस्कृती म्हणजे गोयंका ची विपश्यना ! प्राचीन भारतीय बौद्ध वास्तु व स्थापत्य कला व लेण्या धोक्यादायक अवस्थेत असताना त्याला दुर्लक्षित करून बाहेरून म्यानमार, थायलंडच्या डिझाईन बेसवर वास्तु, विहार बनतात. हे एक काऊंटर कल्चर आहे. याही पेक्षा महत्वाचं म्हणजे दीक्षाभूमीवर अतिक्रमण होताना, चैत्यभूमी बुद्ध विचार, संस्कृती पुनर्जीवित करणाऱ्या बाबासाहेबांचं स्मारकाचे अजूनही हेळसांड चालू असताना तिकडे गोयंका विपश्यना परिवार कोणत्याही संघर्ष व जनमागणी शिवाय एका बेटावर दिमाखात गोल्डन पॅगोडा पण बांधतात. कित्येक ठिकाणी विपश्यना केंद्रांसाठी म्हणून शेकडो एकर जमीन पण मिळते. सरकारने देऊ केलेली जमीन, तत्परता, सहाय्य आपण बघु शकतो. १४ एप्रिलची सुट्टी नाकारली म्हणुन बामसेफ सारख्या संघटनेच्या निर्मितीची ठिणगी पडली आणि इकडे सरकार विपश्यनेसाठी नंबर लागला की विनाझंझट १० दिवसाची पगारी सुट्टी मंजुर ही करतात.

पुढच्या पन्नास वर्षांचा विचार केला तर विद्यापीठातून, शैक्षणिक क्षेत्रातुन, साहित्यातून बौद्ध साहित्य, पाली भाषा बाद झालेली असेल. महाबोधी विहार तुमच्याकडे तेव्हाही नसेल. बुद्ध लेण्यांची डागडुजी, संवर्धन न करता विकृत विदृपीकरण होऊन नामशेष करण्याचा प्रयत्न होईल. दीक्षाभूमी, चैत्यभूमी बद्दल ज्ञात अवस्था सर्वांनाच आहे. आणि याच्या जागेवर काऊंटर कल्चर म्हणून बाबासाहेबांना अपेक्षित असलेला बुद्ध व प्राचीन भारतीय बौद्ध साहित्य, वास्तु, संस्कृती म्यानमार किंवा तत्सम महायानी बौद्ध परंपरेतले वास्तु विहार, मूर्त्या आणि विपश्यना पद्धतीने नवी संस्कृती रुजवली जाईल. ज्या गतीने हे काम चाललं ती गती लक्षात घेता पन्नास वर्षांनंतर प्राचीन भारतीय बौद्ध वारसांची जागा विपश्यना घेईल. तेव्हा बौद्ध संस्कृतीचे अस्तित्व विपश्यना म्हणजे धम्म व धम्म म्हणजे विपश्यना झाला तर नवल वाटायला नको.

Ruling class, rulling government जो शोषक आहे तो इतका येडा नाही की ब्राह्मणवाद्यांना आव्हान देणारा बुद्ध स्वीकारतील किंवा ती संस्कृती रुजवतील. उलट आंबेडकरवादी बौद्धांना पर्यायी समांतर प्रतिक्रांतीतल्या गोयकांच्या विपश्यना अधारीत पद्धतीला बौद्ध संस्कृती व परंपरा नावाखाली राजाश्रय देतील. कारण ती power agency सवर्ण ब्राह्मणांच्या हातात आहे. आणि त्यांना अनुकूल पण आहे. कोणत्याही बुद्ध अनुयायी असलेल्या सम्राट अशोका असेल की कनिष्क, हर्षवर्धन असो की सातवाहन यांच्या विरोधात ब्राम्हण न लढताही बौद्धांचं पद्धतशीर इसवी सन ५-१० व्या शतकात हिंदु संस्कृती म्हणून कनवर्जन केलंय. आणि या सांस्कृतिक कन्वर्जनचा पुढचा टप्पा म्हणजे पंढरपूर, उज्जैन, मथुरा, बालाजी मुर्त्यांतर, विहाराचे मंदिरे आणि नालंदा सारख्या विद्यापीठाचा नाश. हा इतिहास डोळ्याखालुन घेतला की बुद्ध ब्राह्मणांच्या हातात देणं किती धोकादायक याचा प्रत्यय येतोय.
विपश्यना करुन गेलेले सवर्ण ब्राम्हण, बनिया व्यवहारिक आयुष्यात बुद्ध स्वीकारीत नाही पण इकडे महाराष्ट्रात बौद्धांनी गोयंका बाबाचे फोटो घरात लावायला सुरुवात केली, काहीनी पत्रीकेवर छापायला सुरुवात केली. विपश्यना मनस्वास्थ्य, धम्म आकलन शिकवते पण मनो विकारातुन “जात” काढायला शिकवत नाही. आमची लढाई जातवर्णव्यवस्थे विरूद्ध बामणी समाज सांस्कृतिक वर्चस्ववादाविरुद्ध, शोषणाविरूद्ध असताना आपण परत एका त्याच agency ला आपल्या घरात घेतोय. गोयकांच्या विपश्यना माध्यमातून बुद्ध व बाबासाहेब सवर्ण ब्राम्हण बनियाच्या घरात पोहचले नाही पण त्यांचा गोयंका मात्र शोषित वर्गातल्या बौद्धांनी डोक्यावर बसवायला सुरुवात केली.

बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या प्रस्तावनेत कार्ल मार्क्स की बुद्धा, बुद्ध आणि त्यांचा धम्म तसेच क्रांती प्रतिक्रांती हे पुस्तके एका ओळीने वाचायला सांगतात. सांगायचा मुद्दा हा की क्रांती प्रतिक्रांतीची समज आपल्यात कमी पडता कामा नये.

राहुल पगारे

लेखक औरंगाबाद येथील रहिवासी असून आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक – कार्यकर्ते आहेत.

4 Comments

  1. Goyankachi vipassana hi buddhkalin parampara ahe. Tyanchya shikwanine buddh , babasaheb brahmnachya dokyat gele ahet. Gharat murtya nasalya aslyane kahi farak padat nahi. Buddh swat murti virodhak hote.

  2. विपश्यना गोएंका यांची आहे असे लिहून त्यांना मोठे करू नका. विपश्यना सिंधुं सभ्यता काळापासून अस्तित्वात आहे

  3. Yes Rahul I agree to this post.
    मी विपश्यना केली होती काही वर्षा आधी..गोयांकाची विपश्यना बुद्ध काळातली असेल याचा काही पुरावा नाही…ती पद्धत वेगळी असू शकते..
    आणि गोयंका प्रवचन देतात तेव्हा सांगतात की तुमचा धर्म बदलायची काहीच गरज नाही फक्त विपश्यना करा..
    Meditation गोयंका ने सांगितलं तसच करायची गरज नाही…

  4. आर्टिकल हिंदी भाषेत लिहित जावे। हि अपेक्षा

Leave a Reply

Your email address will not be published.


*